What Is Mudra Loan? And How To Apply For Mudra Loan! मुद्रा कर्ज काय आहे आणि ह्या कर्जासाठी कसे अर्ज करावे याची सविस्तर माहिती!

Pixabay

सर्वांना नमस्कार,

Pradhanmantri Mudra Yojana प्रधानमंत्री मुद्रा योजना ही कर्ज योजना   २०१५ पासुन लहान व्यापारी अथवा छोट्या उद्योजकांसाठी सुरू करण्यात आली. ज्यामर्फत लहान व्यापारी अथवा उद्योजक दहालाख रुपयांपर्यंत व्यवसायिक कर्ज काढू शकतात. हे कर्ज ३ वेगवेगळ्या स्कीममध्ये विभागले गेले आहे ते पुढीलप्रमाणे:


१) Shishu शिशू :- यामध्ये ज्या व्यापारी अथवा उद्योजकांना Business व्यवसाय सुरू करण्यासाठी Strating Finance सुरुवाती भांडवलची आवश्यकता असते त्यासाठी पन्नास हजार रुपये एवढी रक्कम ते मुद्रा कर्ज योजनेअंतर्गत काढू शकतात.


२) Kishor किशोर :- या स्कीममध्ये ज्या व्यापारी अथवा उद्योजकांचा Business व्यवसाय हा आधीपासूनच सुरू आहे व त्यांना त्यांच्या व्यवसायासाठी, कर्मचारी, वीजबिल, मशिनरी इत्यादिसाठी अधिक भांडवलची आवश्यकता असते त्यासाठी पाच लाख रुपये ते Mudra Loan मुद्रा कर्ज योजनेअंतर्गत काढू शकतात.


३) Tarun तरुण :- यामधे ज्या व्यापारी अथवा उद्योजकांचा व्यवसाय हा आधीपासूनच सुरू आहे व त्यांना त्यांचा Expandation Of Business व्यवसायाचा अधिकाधिक विस्तार करायचा असेल त्यासाठी ते मुद्रा कर्ज योजनेअंतर्गत दहा लाख रुपयांपर्यंत कर्ज काढू शकतात.


मुद्रा कर्ज काढण्यासाठी तुमच्याकडे पुढीलप्रमाणे डॉक्युमेंट्स असणे आवश्यक आहे.
(१) ओळखपत्र :- पेन कार्ड, वॉटर आयडी कार्ड, आधार किंवा पासपोर्ट.
(२) अॅड्रेस प्रूफ :- वीजबिल, टेलिफोन बिल, राशन कार्ड इत्यादी.
(३) व्यवसाय पुरावा :- दुकानाचे वीजबिल, रेंट अग्रीमेंट, व्यवसाय नोंदणी सर्टिफिकेट.


मुद्रा कर्ज काढण्यासाठी कुठे अर्ज करावे :- प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजनेअंतर्गत कर्ज काढण्यासाठी तुम्ही विवध बँकेत अथवा फाईन्सशिअल संस्थामध्ये जाऊन तुम्ही अर्ज काढू शकता.


तर अशाप्रकारे लहान व्यापारी अथवा उद्योजक Pradhanmantri Mudra Yojana  प्रधानमंत्री मुद्रा कर्ज काढू शकतात.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने