typinghouse.com website review. - टायपिंगहाऊस डॉटकॉम वेबसाईट खरी आहे की खोटी?

Pixabay

सर्वांना नमस्कार,
Typing Job टायपिंग जॉब म्हंटले की त्यामध्ये ऑनलाईन अथवा ऑफलाईन अशा दोन्ही प्रकारच्या टायपिंग जॉबचा समावेश होतो. हा जॉब विवध पर्यायामध्ये उपलब्ध आहे. उदाहरणार्थ: डाटा एंट्री, ईमेल आणि एसएमएस सेंडींग, कॉपी पेस्ट अशा कितीतरी प्रकारचे काम ह्या टायपिंग जॉबमध्ये सामावले आहेत.


ऑफलाईन मध्ये हे काम तुम्हाला स्वतः कागदावर किंवा पुस्तकावर लिहून संबधित कंपनीमध्ये सबमिट करायचे असते. पण हे काम ऑनलाईन पद्धतीने करताना पैसे मिळतील की नाही याची जास्त प्रमाणात खात्री नसते. त्यामुळे आज मी Typing House website review. - टायपिंगहाऊस डॉटकॉम वेबसाईट खरी आहे की खोटी? याची सविस्तर माहिती सांगणार आहे.


तर तुम्हाला Typing House टायपिंगहाऊस डॉटकॉम मध्ये टायपिंग जॉब उपलब्ध आहे. असे मेसेज सोशल मीडियावर खूप येत असतील अथवा जॉब रेफरलची लिंक येत असेल. मग तुम्ही जेव्हा टायपिंगहाऊस वेबसाईट उघडता तेव्हा जर तुम्ही वेबसाईट नीट लक्ष देऊन बघितली असता तुमच्या लक्षात येईल की वेबसाईट किती Low Quility साध्या पद्धतीची आहे.जर तुम्ही नोंदणी केली अथवा नोंदणी करत असताना तुम्हाला त्या वेबसाईट वर Google Ads गूगल एड देखील दिसतील. तुमची नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लगेचच तुम्ही टायपिंग जॉब नाही करू शकणार. कारण आधी तुम्हाला पाच लोकांना रेफर करावे लागेल व प्रत्येक रेफरवर तुम्हाला ५० रुपये मिळतील. मग
Typing House टायपिंगहाऊस बोलेल की पाच लोकांना रेफर केल्यानंतर त्यांनां देखील नोंदणी करणे बंधनकारक आहे.


त्यानंतर तुम्ही Typing House टायपिंगहाऊस वर विश्वास ठेवून पाच मित्रांना रेफर करणार. रेफर केल्यानंतर तुमच्या Typing House टायपिंगहाऊस डेशबोर्डवर विवध प्रकारचे टायपिंग जॉब तुम्हाला दिसतील ते वरीलप्रमाणे पण त्यानंतर ते काम करण्यासाठी कंपनी तुम्हाला आणखी चाळीस लोकांनां रेफर करायला सांगेल मगच तुमचे विवध प्रकारचे काम हे सुरु करू शकता.


मग तुम्ही कसेबसे करून आणखी चाळीस लोकांनां वेबसाईट रेफर करणार. त्यांची नोंदणी झाल्यानंतर तुमच्या Typing House Deshbord टायपिंगहाऊस डेशबोर्डवर तुम्हाला ५०×४० = २००० रुपये दिसतील पण जसेच तुम्ही पैसे काढण्यासाठी जाल तिथे तुम्ही कमीतकमी ५००० रुपये काढू शकता. असे तिथे लीहले असेल. तर तुम्हाला तिथेच काम बंद केले पाहिजे कारण ही Typing House 100% Fraud And Scam Website टायपिंगहाऊस वेबसाईट १००% फ्रॉड आहे.जर तुम्ही Typing House टायपिंगहाऊस ला पेमेंट बाबत ईमेल केला असता तुम्हाला त्याठिकाणी कुठलाही रिप्लाय येणार नाही. कारण ही कंपनी १००% फ्रॉड आहे. फक्त तुम्ही नोंदणी करून अधिक लोकांना रेफर करून तेही लोक ह्या स्कॅममध्ये फसावे व गूगल एड पाहून कंपनीला पैसे मिळावे असे या Typing House टायपिंगहाऊस चे उद्दीष्ट आहे. त्यामुळे तुम्ही ह्या फ्रॉडपासुन दोन हात लांबच राहावे.कारण ही कंपनी तुम्हाला कुठलाही पेमेंट देणार नाही वरून तुमचा वेळ देखील वाया जाईल आणि ज्या लोकांना तुम्ही रेफर केले होते ते लोक देखील तुम्हाला मेसेज करून सतवतील म्हणून अशा वेबसाईटच्या भानगडीत पडू नये. तर अशाप्रकारे आपण Typing House website review. पाहिला यामध्ये हे सिद्ध होते की ही वेबसाईट खोटी आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने