How To Update Google Sellers. json file गुगल सेलर. जेएसऑन फाईल कसे अपडेट करावे याची सविस्तर माहिती!

Pixabay


सर्वांना नमस्कार,
Google AdSense गूगल एडसेन्सने काही दिवसापूर्वी आपली एक नवीन पॉलिसी अमलात आणली होती. त्यानंतर सगळ्या युट्यूबर किंवा ब्लॉगर ह्यांच्या गूगल एडसेन्स अकाउंटवर Update Google Sellers. json file गुगल सेलर. जेएसऑन फाईल अपडेट करा असा मेसेज दिसू लागला.


त्यानंतर सर्व YouTubers युट्यूबर आणि Bloggers ब्लॉगर ह्यांना एकच प्रश्न पडला की हा प्रॉब्लेम कसा फिक्स करावा. यासाठी आज मी तुम्हाला How To Update Google Sellers. json file गुगल सेलर. जेएसऑन फाईल कसे अपडेट करावे याची सविस्तर माहिती सांगणार आहे.तर सर्वात आधी हे अपडेट काय आहे ते पाहूया. जेव्हा एखादी वेबसाईट किंवा युट्यूब चेनल गूगल एडसेन्सद्वारे अप्रुव होते व त्यावर एडसेन्सच्या जाहिराती दिसू लागतात तेव्हा जे विक्रेते आहेत त्यांना त्या प्रकाशकाला त्यांच्या जाहिरातीवर किती सीपीसी द्यावयाचा आहे व प्रकाशक आणि विक्रेता ह्यामध्ये पारदर्शक कारभार व्हाहा यासाठी गूगल सेलर जेएसऑन फाईल अपडेट करणे आवश्यक आहे.


हे फाइल अपडेट करण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला तुमच्या Google AdSense गूगल एडसेन्सच्या अकाउंटवर जायचे आहे.
तिथे तुम्हाला फाईल अपडेट करण्यासाठी मेसेज दिसेल तिथे तुम्हाला अॅकशनवर क्लिक करायचे आहे. क्लिक केल्यानंतर तुम्ही आपोआप तुमच्या गूगल एडसेन्स खाते सेटिंगवर जाल.


तिथे तुम्हाला विक्रेता माहिती पारदर्शकता असा पर्याय दिसेल. त्यामध्ये तुम्हाला गोपनीय आणि पारदर्शक असे दोन पर्याय दिले असतील त्यामधील तुम्हाला पारदर्शक निवडायचे आहे आणि व्यवसायाचे डोमेन म्हणजे तुमचा वेबसाईट अथवा युट्यूब चेनलचे लिंक टाकून सेव्ह करायचे आहे.सेटिंग सेव्ह केल्यानंतर २४ तासांच्या आत तुम्हाला तो मेसेज आपोआप गायब झालेला दिसेल. तर अशाप्रकारे तुम्ही गूगल एडसेन्स मध्ये गूगल सेलर जेएसऑन फाईल अपडेट करू शकता.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने