Zomato वर रेसटॉरंट्स आणि घरगुती किचन याचा व्यवसाय कशाप्रकारे प्रस्थापित करावा आणि याची Registerrion ( नोंदणी ) कशी करायची याबद्दल सविस्तर माहिती!

Pixabay


सर्वांना नमस्कार,
आपल्या सर्वांना माहीत की आज लोक  Online Food ऑर्डरिंगला जास्त प्रमाणात प्राधान्य देताना दिसत आहे. भारतासारख्या देशात हा व्यवसाय रेसटॉरंट्स आणि घरगुती किचनचा व्यवसाय करणाऱ्या व्यवसायिकांना अधिक प्रमाणात व्यवसायचा विस्तार करण्यासाठी संधी तसेच नवीन उद्योग देण्यात मदत करतो.


तसेच सध्या जे रेसटॉरंट्स आणि घरगुती किचनच्या माध्यमातून व्यवसायिक हा व्यवसाय करीत आहेत. त्यांना ह्या माध्यमाद्वारे अधिक चांगला नफा ते कमवत आहे. त्यामुळे जर तुम्ही तुमचा स्वतः चा रेसटॉरंट्स किंवा घरगुती किचनचा व्यवसाय Zomato सोबत करण्याच्या तयारीत असाल तर आज मी तुम्हाला Zomato मध्ये Online नोंदणी करून आपण आपल्या व्यवसायाचा कशाप्रकारे विस्तार करू शकतो.


याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहे. यासाठी तुमच्याकडे काही महत्वपूर्ण Documents ( कागदपत्रे ) असणे आवश्यक. यामध्ये पुढीलप्रमाणे:
१) Shop ऍक्ट लायसन्स.
२) GSTIN नंबर.
३) फूड लायसन्स.
४) जर तुम्ही व्यवसाय स्वतः करणार असाल तर स्वतः चे Pan Card अथवा जर तुम्ही कंपनीसोबत करणार असाल तर मग कंपनीचे Business Pan Card असणे आवश्यक आहे.


१) Zomato मध्ये तुमच्या रेसटॉरंट्स अथवा घरगुती किचनची नोंदणी करण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला Zomato व्यवसाय च्या अधिकृत वेबसाईटवर भेट द्यावी लागेल. त्यानंतर तुम्हाला एड अ रेसटॉरंट्स वर क्लिक करावे लागणार. पुढच्या पेजवर तुम्हाला एक Registerrion ( नोंदणी ) फॉर्म दिसेल. यामध्ये तुम्हाला तुमच्या रेसटॉरंट्स किंवा किचनचे नाव लिहायचे आहे.


२) व्यवसाय कुठल्या City आणि Country  मध्ये करणार आहे त्या शहराचे आणि देशाचे नाव टाकावे. पुढे तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी टाकावा. त्यानंतर तुम्हाला तुमच्या व्यवसाय विषयी माहिती भरावी लागणार. उदाहरणार्थ: तुम्ही कुठल्या प्रकारचे अन्न विकता, पेमेंट कशामार्फत घेता, व्यवसाय सुरू असलेले दिवस आणि वेळ इत्यादी माहिती भरल्यानंतर फॉर्म एकदा तपासून सबमिटवर क्लिक करा.


३) यानंतर तुम्हाला तुमचे सर्व Documents ( कागदपत्रे ) तयार ठेवायचे आहे. मग तुमचा फॉर्म हा Zomato ची टीम मार्फत तपासला जातो आणि मग तुम्हाला कंपनीकडून अधिकृत फोन अथवा ईमेल द्वारे पुढील माहिती कळवली जाते. तर अशाप्रकारे तुम्ही Zomato सोबत स्वतः चा रेसटॉरंट्स किंवा घरगुती किचनचा व्यवसाय वाढवू शकता.


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने