YouTube ( युट्यूब ) वर Video ( व्हिडिओ ) कसे बनवावे आणि त्यातून पैसे कमवावे याबद्दल संपूर्ण माहिती.

Pixabay


सर्वांना नमस्कार,
आपल्या सर्वांना माहीत आहे की YouTube ( युट्यूब ) हे जगातील सर्वात मोठे व्हिडिओ Platform आहे. युट्यूबवर रोज कोट्यवधी लोक व्हिडिओ पाहण्यासाठी येतात. पण जर तुम्ही कधी लक्ष ठेवून युट्यूब बघितले असेल तर तुम्हाला त्यामध्ये व्हिडिओ सुरु होताना काही जाहिरात दिसतात त्याआपण कदाचित स्किप करून टाकतो.


परंतु जर त्या जाहिरातमध्ये आपल्या कामाची वस्तूची जाहिरात सुरू असेल. उदा., समजा कपड्याची सेलची जाहिरात तर आपण त्यावर क्लिक करून ती वस्तू पाहतो. आपल्याला त्याच काहीच नुकसान होत नाही फक्त आपण क्लिक केल्याला जाहिरातीवर जाऊन बघतो की कुठली सेल सुरू आहे. मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की ह्या जाहिरात का बरं दाखवत असतील.


तर ज्या मोठ्या- मोठ्या कंपनी असतात ते आपल्या प्रॉडक्टची अथवा सेवेची Advertising ( जाहिरात ) करण्यासाठी यूट्यूब सोबत करार करतात.  यामध्ये जो मोबदला युट्यूबला मिळतो त्याचा काही भाग हा त्याच्या संबधित व्हिडिओ प्रकाशित करणाऱ्या Channel ला मिळतो. त्यामुळे जर तुम्हाला ही स्वतः चे यूट्यूब व्हिडिओ  तयार करून चांगले पैसे कमवायचे असेल तर आज मी तुम्हाला याची संपूर्ण प्रक्रिया सांगणार आहे.


१) तर तुम्हाला सर्वप्रथम हे ठरवावे लागणार की आपल्याला कुठल्या Topics ( टॉपिकवर )अथवा कुठल्या भाषेत  व्हिडिओ तयार करायचे आहेत. कारण जर तुम्ही ही गोष्ट बरोबर समजली नाही आणि कसेही प्रकारचे व्हिडिओ बनविले तर मग तुम्ही तोट्यात जाऊ शकता. याव्यतिरिक्त तुम्ही ज्या गोष्टीमध्ये  हुशार आहात त्यावर व्हिडिओ प्रकाशित केला तर तुम्हाला निश्चितच यश मिळले.


२) जर तुम्ही युट्यूबवर नवीन असाल आणि जर तुमचे बजट हे कमी असेल तर तुम्ही आधी मोबाईल, एडिटिंग एप आणि मायक्रोफोनच्या सहायाने सुरुवात करा. अथवा जर तुमच्याकडे जास्त Budget ( बजट ) असेल तर तुम्ही आणखी काही प्रयोग करू शकता.  साधारणतः सध्या जे युट्यूबर आहेत त्यांनी देखील छोट्यापासुन सुरुवात केली आणि आज ते मोठ्या स्थानावर आहेत.


३) साहित्याने काही फरक नाही पडत फक्त आपल्यातील जी एक Unique ( युनिक )कला आहे ती चांगली असली पाहिजे. एक लक्षात ठेवा की कुठल्याही परस्थितीत कॉपीराईट व्हिडिओ आणि कॉपीराईट संगीत Publish ( प्रकाशित ) करणे टाळा. कारण ह्याने तुमचे युट्यूब अकाऊंट हे कायमचे बंद पडू शकते. काही लोक व्हिडिओला लाईक, विव आणि सबक्राईबरस मिळवण्यासाठी चुकीचा मार्ग निवडतात. पण ह्याने सुद्धा यूट्यूब अकाऊंट बंद होण्याच धोका असतो.


४) तर व्हिडिओ तयार करताना ह्या काही दक्षता पाळा:
(१) कॉपीराईट फ्री Video (व्हिडिओ) आणि Music ( संगीत ) असावे.
(२) व्हिडिओ हा कमीत कमी ५ मिनिटाचा असावा.
(३) व्हिडिओमध्ये नोईस नसावा कारण जास्त नोईसनी दर्शक पटकन व्हिडिओ बंद करतात.
(४) जर तुम्हाला स्वतः चा चेहरा व्हिडिओमध्ये नसेल दाखवायचा असेल तर तुम्ही ते करू शकता पण स्वतः चा आवाज असणे आवश्यक आहे. काही लोक फक्त व्हिडिओ तयार करतात त्यामध्ये न त्यांचा चेहरा असतो ना Voice.
५) व्हिडिओ मध्ये कुठलाही गैरवापर करनारा अथवा हिंसक व्हिडिओ नसावा.
(६) चेनलला ब्रॅण्डिंग आणि लोगो असावा.
(७) व्हिडिओला इंट्रो आणि आऊट्रो असावा.
(८) प्रत्येक व्हिडिओला एक थमनील आणि टॅग असावे.
(९) व्हिडिओला एक चांगली मेन थीम असावी.
(१०) व्हिडिओ ची गुणवत्ता ही किमान ३६० Pixel ( पिक्सेल ) असावी.


५) व्हिडिओ तयार झाल्यानंतर  त्याची जरा सोशल मीडियावर शेअरिंग करावी जेणेकरून तुमचे विव आणि सबसक्राईबर वाढू लागतील त्यानंतर जेव्हा तुमच्या चेनलवर एक हजार सबसक्राईबर आणि चार तासांचा वॉच टाईम पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला युट्यूब  जाहिरात करण्यासाठी आमंत्रण देईल तिकडे तुम्हाला तुमची सर्व माहिती भरून गुगल अॅडसेन्सला रिव्ह्यू करण्यासाठी द्यावी लागेल. जर तुमचा चेनलला Google AdSense ( गुगल अॅडसेन्स ) कडून मान्यता मिळाली तर मग तुम्ही तुम्ही युट्यूबच्या माध्यमातून पैसे कमवू शकता.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने