YouTube चे काही महत्वपूर्ण Search Engine Optimization ( SEO) एसईओ सेटिंग्ज.

Pixabay


सर्वांना नमस्कार,
आपण आपल्या YouTube चेनलला वाढवण्यासाठी खूप प्रयत्न करतो. कारण आपल्या वाटते की आपले चेनल हे YouTube मध्ये ट्रेण्ड व्हावे. आपल्या चेनलवर चांगले ट्रॅफिक, व्हिव यावे आणि त्याचबरोबर आपले सबक्राईबरस वाढवे यासाठी आपण सर्व जण सातत्याने प्रयत्न करत असतो.


पण बहुतेकदा आपल्या चेनलवर चांगले ट्रॅफिक आणि व्हिव येत नाही. त्यामुळे याचे पाहिले कारण असू शकते ते म्हणजे एक तर तुम्ही तुमच्या चेनलवर काही महतत्वपूर्ण एसईओ सेटिंग्ज केली नाही आणि दुसरे म्हणजे जी एसईओ सेटिंग्ज तुम्ही केली आहे ती एवढी जास्त Strong ( स्ट्रोंग ) नसते. त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या चेनलची वाढ करायची असेल तर आज मी तुम्हाला काही महतत्वपूर्ण YouTube SEO सेटिंग्ज सांगणार आहे.


१) चेनलचे नाव :- बरीच लोक ही उत्साहमध्ये येऊन चेनलचे काही पण नाव ठेवून टाकतात. पण त्यामुळे तुमच्या चेनलची वाढ खूप कमी प्रमाणात होऊ शकते. उदाहरणार्थ., Marathi Vinod (मराठी विनोद) आता समजा जर तुम्ही हे नाव ठेवले तर मराठी हा तुमचा मेन कीवर्ड असेल आणि याच्या आधारे तुमचा चेनल हा YouTube Search रेकिंग मध्ये पटकन रेंक होऊ शकतो.


२) व्हिडिओ टायटल :- तुम्ही जो पण व्हिडिओ अपलोड कराल त्याआधी हे सुनिश्चित करा की त्या व्हिडिओचा टायटल हा लांब असला पाहिजे आणि त्यामध्ये चांगली Keyword Placement ( कीवर्ड प्लेसमेंट ) असली पाहिजे जेणेकरून जेव्हा लोक व्हिडिओ शोधतील तेव्हा तो व्हिडिओ त्यांना लगेच सापडेल.३) व्हिडिओ Description  ( डीसक्रीपश्र्न ) :- हे खूप महत्त्वाचे आहे कारण यामध्ये व्हिडिओ संबधित कीवर्ड प्लेसमेंट करू शकता तेही पूर्ण पाच हजार पर्यंत त्याचबरोबर तुम्ही यामध्ये दुसऱ्या व्हिडिओची लिंक देखील समाविष्ट करू शकता. ह्याने तुमच्या चेनलवर ट्रॅफिक बनून राहील.


४) टॅग :- ( Tags ) टॅग असणे देखील आवश्यक असते त्याने संबधित  व्हिडिओ कुठल्या कॅटेगरीमध्ये आहे हे वापरकर्त्याला पटकन कळते.


५) थमनील :- व्हिडिओच थमनील हे असा ठेवा ज्यामध्ये टेक्स्ट असेल आणि जो फोटो Thumbnail साठी वापराल तो कॉपीराईट फ्री ठेवा. ज्याने एक चांगली रेंकिग मिळू शकते.६) चेनल डीसक्रीपश्र्न :- चेनल डीसक्रीपश्र्न ही लांबलचक नसली तरी चालेल फक्त Channel डीसक्रीपश्र्न मध्ये थोडे किवर्ड यूज करा आणि आपले सोशल मीडिया अकाउंटची लिंक जोडून ठेवा.७) लोगो :- तुम्हाला जर तुमचे चेनल हे युनिक आणि दुसऱ्यापेक्षा जरा वेगळे हवे असेल तर स्वतः च्या चेनलचा एक लोगो तयार करा. ह्याने चेनलला एक Casual ( केसुअल )लूक येऊ शकतो.


८) ब्रॅण्डिंग :- चेनलला ब्रॅण्डिंग लावल्याने तुम्हाला तुमचा चेनल हा एक  वेगळा आणि युनिक ब्रँड आहे अशी भावना निर्माण होईल. आणि लोकांना सुद्धा तुमचा Brand ( ब्रँड ) समजण्यास मदत होईल.


९) प्लेलिस्ट :- प्रत्येक व्हिडिओच्या कॅटेगरीची Playlist ( प्लेलिस्ट ) तयार करावी जेणकरून युजर पटकन त्याच्या संबधित व्हिडिओ शोधू शकतो.


१०) स्टोरी, पोस्टर आणि कवर फोटो :-  जे युट्यूब चेनल हे Story ( स्टोरी ) आणि Posters ( पोस्टर  ) साठी पात्र असतील त्यांनी त्याचा नियमितपणे वापर करावा जेणेरून ते युजरच्या संपर्कात राहू शकतो. Cover Photo ( कवर फोटो )पण लावणे चांगले आहे ह्याने एक चांगले लूक येऊ शकते.


तर अशाप्रकारे तुम्ही ही काही युट्यूब ची महत्वपूर्ण SEO Settings ( एसईओ सेटिंग्ज ) चा वापर करून स्वतः चे चेनलचा एसईओ रेंक वाढवू शकता.


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने