Wefast India Private Limited Courier Job - वीफास्ट इंडिया प्रायव्हेट लिमटेड कुरियर जॉब आणि नोंदणी प्रक्रिया बद्दल सविस्तर माहिती!

 

Pixabay


सर्वांना नमस्कार,
आपल्याला जर एखादे पार्सल हे एखाद्या प्रदेशात किंवा संबंधित शेत्रात त्वरीत त्याच दिवशी दोन ते तीन तासात पाठवयचे असेल तर मग आपल्याकडे जास्त Options ( पर्याय ) उपलब्ध नसतात शिवाय सेम डे डिलिव्हरी पेक्षा मग आपण वाटतेल त्या किंमतीमध्ये पार्सल पाठवायला तयार असतो.


Wefast Same Day Delivery वीफास्ट ( कुरियर ही अशीच एक सेम डे डिलिव्हरी सेवा ) आहे जी पुढील प्रदेशात कार्यारत आहे.
(१) मुंबई
(२) दिल्ली
(३) हैद्राबाद
(४) अहमदाबाद
(५) सुरत
(६) चेन्नई
(७) कोलकाता
(८) पुणे
(९) गोवा
(१०) चंदिगढ


त्यामुळे जर तुम्ही ह्या प्रदेशात राहत असाल आणि तुमच्याकडे स्वतः ची बाईक असेल किंवा तुमच्या प्रदेशात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असेल उदा., बस, ट्रेन, टेक्सी  तर मग तुम्ही हा कुरियर जॉब करू शकता. यासाठी आज मी तुम्हाला याची संपूर्ण नोंदणी प्रक्रिया सांगणार आहे. संपूर्ण नोंदणी प्रक्रिया ही ऑनलाईन असणार आहे त्यामुळे Article ( आर्टिकल ) पूर्ण वाचून घ्या आणि त्याची पूर्ण नोंदणी प्रक्रिया समजून घ्या.


आर्टिकल पूर्ण वाचण्यापूर्वी हे सुनिश्चित करा की तुमचा फोन हा Android ( अँड्रॉइड ) असला पाहिजे Apple iPhone ( एपलचा ) असेल तर मग तुम्ही नोंदणी नाही करू शकणार याची खात्री करून घ्यावी. पुढील साहित्य असणे आवश्यक आहे.
(१) अँड्रॉइड फोन
(२) इन्कम टॅक्स कार्ड ( Pan Card )
(३) अड्रेस पुरावा उदा., आधार कार्ड, वीजबिल, वोटर आयाडी कार्ड इत्यादी.
(४) Selfie ( सेल्फी )
(५) जर स्वतः ची बाईक असेल तर Driving license ( ड्रायव्हिंग लायसन्स) आणि RC Book ( आरसी बुक)


१) तर हा जॉब करण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला तुमच्या Play Store ( प्लेस्टोअरवर ) भेट द्यावी लागेल आणि तिथे वीफास्ट कुरियर जॉब असे टाईप करून एप इंस्टॉल करून घ्यावा. इंस्टॉल झाल्यानंतर तुमच्या समोर दोन पर्याय दिसतील (१) साईन इन (२) रजिस्टर तुम्ही रजिस्टरवर क्लिक करा मग तुम्हाला तुमचा Region (प्रदेश ) निवडावा लागेल.


२) प्रदेश निवडल्यानंतर मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी टाकून अग्रीमेंट वाचून नेक्स्टवर क्लिक करावे. मग तुम्हाला तुमची सर्व वयक्तिक माहिती भरावी लागणार ही माहिती भरल्यानंतर वरती जे डॉक्युमेंट दिले आहे ते टाकून रिकवेस्ट ओटीपीवर क्लिक करावे. आता तुमची नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला एक Test ( टेस्ट अर्थात परीक्षा ) द्यावी लागेल.


३) ही परीक्षा जास्त कठीण नाही तर सोपी असते त्यामुळे पेनिक होऊ नये. या टेस्टमध्ये तुम्हाला डिलिव्हरी संबधित काही प्रश्न विचारले जातात. ह्या टेस्टची उत्तरे देऊन झाल्यानंतर उत्तरे सबमिट करून टाकावी. उत्तरे सबमिट केल्यानंतर तुम्हाला १२ ते २४ तासाच्या आत कंपनी कडून एक फोन येईल.


४) कंपनी कडून जेव्हा तुम्हाला फोन येईल तेव्हा तो फोन तुम्हाला उचलणे भागच आहे. कारण जो पर्यंत तुम्ही फोन नाही उचलनार तो पर्यंत तुमचे वीफास्ट अकाऊंट हे सक्रीय होणार नाही. त्यामुळे कुठल्याही परस्थितीत कंपनीचा फोन Receive ( रिसीव्ह ) करा. फोन रिसीव्ह केल्यानंतर तुम्हाला काही माहिती दिली जाईल आणि तुम्हाला तुमचे खाते हे सक्रीय करण्यात आले आहे असा मेसेज दिसेल.


५) तुमचे वीफास्ट खाते हे सक्रीय झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या Deshbord ( डेशबोर्डवर ) ऑर्डर दिसायला सुरुवात होईल. मग तुम्ही जवळ असलेली ऑर्डर पीकअप करू शकता. ऑर्डरचे वजन हे कमीत-कमी  एक किलो असते आणि जास्तीत जास्त वीस किलो असते. ऑर्डर पीक करण्यासाठी तुम्हाला ऑर्डरमध्ये कस्टमरचा पत्ता आणि मोबाईल नंबर दिला असतो.


तर अशाप्रकारे तुम्ही वीफास्ट सोबत सेम डे डिलिव्हरी चे काम करू शकता.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने