Top 20 Best Google AdSense Alternative In Marathi - टॉप २० बेस्ट गूगल एडसेन्स अल्ट्रनेटीव इन मराठी.

Pixabay


सर्वांना नमस्कार,
Blog Site ब्लॉग वेबसाईट तयार करून आपण आपल्याला माहीत असलेली माहिती, छंद, कविता आणि इतर काही गोष्टी ह्या लोकांपर्यंत पोहचवण्याचे काम करतो. परंतु एवढा वेळ Blogging ब्लॉगिंगला दिल्यानंतर आपल्याला असे वाटते की आपल्याला आता फूल टाईम ब्लॉगर बनून त्यातूनच अर्थाजन करायला हवे. मग अशावेळी आपण जाहिराती दाखवण्यासाठी Google AdSense गूगल एडसेन्स हा पर्याय निवडतो.


परंतु जर तुम्ही पोस्ट लिहिल्या आणि काही एरर कारणास्तव Google AdSense गूगल एडसेन्सनी तुम्हाला जाहिराती दाखवण्यासाठी मान्यता दिली नाही अथवा वेबसाईट नाकारली तर सर्वांच्या मनात फक्त एकच प्रश्न निर्माण होतो. तो म्हणजे आपण लिहलेले एवढी Information माहिती ही पूर्णपने वाया गेली आणि त्यामुळे बहुतेक लोक ब्लॉगिंग ही अर्ध्यावरच सोडून देतात.


पण तुम्हाला असे न करता सातत्याने Google AdSense गूगल एडसेन्सचे अप्रुवल मिळवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे थोडा वेळ नक्कीच लागेल. पण तुम्ही तुमचे प्रयत्न सुरू ठेवा. आता तुम्हाला असे वाटत असेल की मी गूगल एडसेन्स साठी प्रयत्न तर करतच आहे पण गूगल एडसेन्सची मान्यता मिळेपर्यंत अर्थाजन कसे करावे.


तर यासाठी मी तुम्हाला Top 20 Best Google AdSense Alternative In Marathi गूगल एडसेन्सचे टॉप २० बेस्ट गूगल एडसेन्स अल्ट्रनेटीव सांगणार आहे. ह्या गूगल एडसेन्स अल्ट्रनेटीवचा वापर करून तुम्ही तुमच्या वेबसाईटवर जाहिराती जोडू शकता. २० अल्ट्रनेटीव आहेत तर Article आर्टिकल थोडा मोठा होऊ शकतो व प्रत्येक अल्ट्रनेटीवची  रिक्वरिमेंट ही वेगळी असते त्यामुळे शक्यतो आर्टिकल पूर्ण वाचायचा प्रयत्न करा.


१) Media . Net मीडिया. नेट :-  हे एड नेटवर्क फक्त इंग्रजी भाषेत ब्लॉग असलेल्या वेबसाईटला मान्यता देते. त्यामुळे जर तुमची वेबसाईट ही पूर्ण इंग्रजी भाषेत असेल आणि तुमच्या ब्लॉगिंग वेबसाईटवर अमेरिका, कँनडा, युरोप व Oceania Continent ओशीनिया खंडातील देशातून Traffic ट्रॅफिक येत असेल तर तुम्हाला Media . Net एड नेटवर्कचे अप्रुवल मिळू शकते. नोंदणी करण्यासाठी तुम्ही मीडिया. नेटच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन नोंदणी करू शकता.


२) Propeller प्रोपेलर :- हे एड नेटवर्क तुम्ही सहजरित्या कुठल्याही भाषेच्या वेबसाईटवर वापरू शकता. त्याचबरोबर हे Ad Network एड नेटवर्क वापरण्यासाठी तुमच्या वेबसाईटवर शून्य ट्रॅफिक असेल तरी सुद्धा वापरू शकता अथवा शंभर येत असेल तरी सुद्धा वापरू शकता. फक्त तुम्हाला Propeller प्रोपेलरच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन साईनअप करून Verification Code पडताळणी कोड तुमच्या वेबसाईटवर जोडून तुम्ही जाहिराती दाखवू शकता.


३) Adsterra एड्सटेरा :- हे एड नेटवर्क देखील सोपे आहे वापरण्याठी तुम्हाला Adsterra एड्सटेराच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन साईनअप करून घ्यायचे आहे. त्यानंतर तात्काळ तुम्हाला जाहिरातीचा कोड दिला जातो. फक्त जे Ad Format एड फॉरमॅट जरा वेगळे आहेत. उदाहरणार्थ; पॉपअण्डर, बॅनर इत्यादी. जाहिराती Active सक्रीय करण्यासाठी तुमच्या वेबसाईटवर पाच हजार ते पन्नास हजार एवढे ट्रॅफिक येणे आवश्यक आहे.


४) Clickadu क्लिकआडू :- हे एड नेटवर्क तुम्ही कुठल्याही भाषेच्या Website वेबसाईटवर वापरू शकता. फक्त तुमच्या वेबसाईटवर दररोज पाच हजारचे ट्रॅफिक येणे आवश्यक आहे. तरच तुम्हाला Clickadu एड नेटवर्कचे अप्रुवल मिळू शकते. जर तुमच्या वेबसाईटवर दररोज पाच हजारचे ट्रॅफिक येत असे तर तुम्ही क्लिकआडूच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन Meta Verification Code मेटा कोड पडताळणी करून वेबसाईटवर जाहिरात जोडू शकता.


५) Admaven एडमावेन :- हे एड नेटवर्क देखील सगळ्या भाषेच्या वेबसाईटला मान्यता देते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे Admaven एडमावेनचा CPM Rate सीपीएम रेट हा आठ डॉलर एवढा आहे. जाहिराती दाखवण्यासाठी तुम्हाला एडमावेनच्या अधिकृत वेबसाईटवर भेट देऊन साईनअप करून जाहिरातीचा कोड प्राप्त करून वेबसाईटवर जोडू शकता.


६) Amazon Affiliate Associate  Program अमेझॉन अफीलाईट एडस :- हे एड नेटवर्क कमीशन बेसवर काम करते. उदाहरणार्थ; जर तुम्ही Amazon Affiliate Associate  Program अमेझॉन अफीलाईट एडस नेटवर्कवर साइनअप केले आणि त्यांच्या काही प्रॉडक्टचे कोड हे स्वतः च्या वेबसाईटवर जोडून झाल्यानंतर जे तुमचे प्रेशक आहेत. त्यांनी संबधित प्रोडकट्सच्या जाहिरातीवर क्लिक करून अमेझॉन मार्फत खरेदी केली असता तुम्हाला त्याचा काही भाग हा Commission Base कमीशनच्या स्वरूपात दिला जातो. हे एड नेटवर्क तुम्ही कुठल्याही भाषेच्या वेबसाईटवर वापरू शकता. तसेच नो मिनिमम ट्रॅफिकवर हे एड नेटवर्क कार्यरत आहे.


७) Evadav एवाडाव :- हे एड नेटवर्क तुम्हाला नो मिनिमम ट्रॅफिकवर सुद्धा अप्रुवल देते. तसेच तुमची वेबसाईट ही कुठल्याही भाषेत असेल तरी सुद्धा तुम्हाला मान्यता मिळेल. फक्त तुम्हाला Evadav एवाडावच्या अधिकृत वेबसाईटवर भेट द्यावी लागेल तिथे साइनअप केल्यानंतर लगेचच तुम्हाला जाहिरातीचे कोड मिळतील ते वेबसाईटवर जोडून जाहिराती प्रसिद्ध करू शकता. तसेच एवाडावचा Support सपोर्ट सुद्धा खूप जलद आहे.


८) Adcash एडकॅश :- हे एड नेटवर्क कुठल्याही भाषेच्या वेबसाईटला सपोर्ट करते. तसेच Adcash एडकॅशचे अप्रुवल मिळवण्यासाठी जास्त ट्रॅफिकची गरज देखील भासत नाही. हे एड नेटवर्क विवध पेमेंट मेथड सपोर्ट करते. तुम्हाला जर Adcash एड नेटवर्कच्या जाहिराती स्वतः च्या वेबसाईटवर जोडायच्या असेल तर तुम्हाला एडकॅशच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.


९) MGID एमजीआयडी :- हे एड नेटवर्क फक्त सत्तर भाषा सपोर्ट करते आणि सर्वात महत्वाचे म्हणजे यामध्ये आपल्या मायबोली भाषा Marathi मराठीचा देखील समावेश आहे. त्यामुळे जर तुमची वेबसाईट ही मराठीमध्ये असेल तर तुम्ही निश्चितच ह्याचं फायदा उचलू शकता. दुसरे म्हणजे ट्रॅफिक MGID एड नेटवर्कचे अप्रूवल मिळवण्यासाठी तुमच्या वेबसाईटवर तीन हजारचे ट्रॅफिक येणे आवश्यक आहे. तरच तुम्हाला MGID एमजीआयडीचे अप्रूवल मिळू शकते.


Pixabay


१०) Hilltop हीलटॉप :-  हे एड नेटवर्क मल्टिपल भाषा असलेल्या वेबसाईटला सपोर्ट करते म्हणजे जर तुमचे वेबसाईट कुठल्याही भाषेत असेल तरीसुद्धा तुमच्या वेबसाईटला अप्रुवल मिळेल. फक्त जे Article आर्टिकल तुम्ही लिहिणार असणार ते आर्टिकल मिक्स टॉपिकवर न असेल याची खात्री करून घ्या. Hilltop एड नेटवर्कला ट्रॅफिकचीही जास्त गरज पडत नाही.


११) Taboola टबोला :- हे एड नेटवर्कचे अप्रुवल मिळवण्याकरिता तुमच्या वेबसाईटवर सुमारे पाच लक्ष एवढे ट्रॅफिक येणे आवश्यक आहे. तरच तुम्हाला Taboola टबोला ह्या एड नेटवर्कचे अप्रुवल मिळू शकते. हे एड नेटवर्क सगळ्या प्रकारचे भाषा असलेल्या वेबसाईटला सपोर्ट करते. त्यामुळे जर तुमची Website वेबसाईट वरील प्रमाणे पूर्ण तयार असेल तर तुम्ही नोंदणी करू शकता.१२) Infolinks इन्फोलिंक्स :- हे एड नेटवर्क कुठल्याही भाषेच्या वेबसाईटला मान्यता देते तसेच अप्रुवल घेण्यासाठी तुमच्या वेबसाईटवर ट्रॅफिक असणे आवश्यक नाही. नो मिनीमम ट्रॅफिकवर तुम्ही अप्रुवल मिळवू शकता. फक्त जेव्हा तुम्ही वेबसाईट Verification पडताळणीसाठी पाठवाल तेव्हा एक खात्री करा की तुमची वेबसाईट ही पूर्णपणे तयार हवी. नोंदणी करण्यासाठी तुम्ही Infolinks इन्फोलिंक्सच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन नोंदणी करून जाहिराती प्रसिद्ध करू शकता.१३) Revcontent रेव्हकतेंट :- हे एड नेटवर्क जेव्हा तुमच्या वेबसाईटवर तीस ते चाळीस हजार एवढे ट्रॅफिक येत असेल तर हे एड नेटवर्क तुमच्या वेबसाईटला अप्रुवल देऊ शकते. त्याचबरोबर तुमची वेबसाईट ही पूर्णपणे इंग्रजी भाषेत असायला हवी. जर तुमची वेबसाईट ही वरीलप्रमाणे सर्व बरोबर असेल तर तुम्ही Revcontent रेव्हकतेंटच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन नोंदणी करून स्वतः च्या वेबसाईटवर जाहिराती प्रसिद्ध करू शकता.


१४)  yllix वायलिक्स :- हे एड नेटवर्क कुठल्याही भाषेच्या वेबसाईटला मान्यता देते. तसेच तुम्ही yllix वायलिक्सच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन नोंदणी करून इन्स्टंटली जाहिरातीचा कोड प्राप्त करू शकता. त्याचबरोबर ट्रॅफिक पण शून्य असेल तरी तुम्हाला ह्या एड नेटवर्कचे अप्रुवल मिळेल.


१५) BuysellAds बाय सेल एडस :-   हे एड नेटवर्क कुठल्याही भाषेच्या वेबसाईटला मान्यता देते पण तुमच्या Website वेबसाईटवर किमान चाळीस ते पन्नास हजार एवढे ट्रॅफिक येणे आवश्यक आहे. त्याचबरोबर तुमची वेबसाईट ही पूर्णपणे तयार आणि त्यामध्ये कुठलाही प्रकारचा एरर नसावा याची खात्री करून घ्यावी. नोंदणी साठी तुम्ही BuysellAds बाय सेल एडसच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन नोंदणी प्रक्रिया पूर्ण करू शकता.


१६) Bidvertiser बीडव्हरटायजर :-  हे एड नेटवर्क सगळ्या भाषेच्या वेबसाईटला सपोर्ट करते पण तुमच्या वेबसाईटवर एक चांगल्या प्रतीचे ट्रॅफिक येणे आवश्यक आहे. Bidvertiser एड नेटवर्क तुमच्या वेबसाईटला जोडण्यासाठी बीडव्हरटायजरच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन नोंदणी करून घ्यावी त्यानंतर तुम्हाला एक Verification Code पडताळणी कोड दिला जातो तो साईटवर जोडून वेबसाईटवर जोडून पडताळणी प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी नंतर तुम्ही वेबसाईटवर जाहिराती प्रसिद्ध करू शकता.


१७) Pop Cash पॉप कॅश :- हे एड नेटवर्क कुठल्याही भाषेच्या वेबसाईटला सपोर्ट करते तसेच जर तुमच्या वेबसाईटवर शून्य जरी ट्रॅफिक येत असेल तरी सुद्धा तुम्हाला ह्या एड नेटवर्कचे अप्रूवल मिळेल. फक्त तुम्हाला Pop Cash पॉप कॅशच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन नोंदणी करून घ्यावी लागेल त्यानंतर तुम्हाला Verification Process पडताळणी प्रक्रिया पूर्ण होताच तुम्ही तुमच्या वेबसाईटवर जाहिराती जोडू शकता.


१८) Pop Ads पॉप एड :- हे एड नेटवर्क देखील कुठल्याही भाषेच्या वेबसाईटला सपोर्ट करते त्याचबरोबर जर तुमची वेबसाईट ही सबडोमेनला कनेक्ट असेल उदाहरणार्थ; ब्लॉगस्पॉट .कॉम असे असेल तरी सुद्धा तुमच्या वेबसाईटला मान्यता मिळू शकते. दुसरे म्हणजे जरी तुमच्या वेबसाईटवर ट्रॅफिक कमी असेल तरी सुद्धा तुम्हाला ह्या एड नेटवर्कचे अप्रुवल मिळेल. नोंदणी करण्यासाठी तुम्ही Pop Ads पॉप एडच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन नोंदणी करू शकता.


१९) Revenue hits रीवेणूहिट्स :- हे एड नेटवर्क सर्व प्रकारचे भाषा असलेले वेबसाईटला सपोर्ट करते तसेच हे एड नेटवर्क वेबसाईटवर जोडण्या करिता नो मिनिमम ट्रॅफिक असेल तरी सुद्धा तुम्हाला मान्यता मिळू शकते. फक्त तुम्हाला Revenue hits रीवेणूहिट्सच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन नोंदणी प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी लागेल त्यानंतर तुम्ही तुमच्या वेबसाईटवर जाहिराती जोडू शकता.


Pixabay


२०) Adversal  एडवर्सल :- हे एड नेटवर्क वापरण्यासाठी तुमच्या वेबसाईटवर सुमारे पन्नास ते साठ हजार एवढे ट्रॅफिक तुमच्या वेबसाईटवर येणे आवश्यक आहे. त्याचबरोबर तुमची वेबसाईट ही पूर्णपणे व्यवस्थित असायला हवी. कुठलाही एरर तुमच्या वेबसाईटवर नसावा याची खात्री करून घ्यावी त्यानंतर नोंदणी करण्यासाठी तुम्ही Adversal अधिकृत वेबसाईटवर जाऊन नोंदणी प्रक्रिया पूर्ण करू शकता.


तर अशाप्रकारे तुम्ही Google AdSense Alternative गूगल एडसेन्स अल्ट्रनेटीवचा वापर करून जो पर्यंत तुम्हाला गूगल एडसेन्स अप्रुवल मिळत नाही तोपर्यंत तुम्ही वरील प्रमाणे गूगल एडसेन्स अल्ट्रनेटीवचा वापर करू शकता.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने