Online Pan Card Apply - पेन कार्ड साठी ऑनलाईन अर्ज कसे करावे याची सविस्तर माहिती.

Photo edited by inshot


सर्वांना नमस्कार,
पेन कार्ड हे Taxpayer करदात्याचे एक महत्त्वपूर्ण कागदपत्र आहे. Pan Card पेन कार्डमुळे व्यापारी आपले कर हे सरकारला देतात त्याचबोबरीने जे व्यक्ती नोकरी करतात त्यांच्या अकाउंट मधून देखील कर वजा होतो. तसेच Bank Account बँक खाते उघडण्यासाठी, Loan लोन साठी, Credit Card क्रेडिटकार्डसाठी व इतर काही शासकीय कामासाठी तुमच्याकडे पेन कार्ड असणे आवश्यक आहे.


पेन कार्ड हे Identity Card ओळखपत्र म्हणून देखील एक चांगले Document डॉक्युमेंट आहे. तुम्हाला जर इतर काही कागदपत्रे बनवायची असल्यास पेन कार्ड हे डॉक्युमेंट दाखवून तुम्ही ते सहजरित्या बनवू शकता. त्यामुळे जर तुम्हाला Online Pan Card Apply ऑनलाईन पेन कार्ड बनवायचे असेल तर आज मी तुम्हाला पेन कार्ड साठी ऑनलाईन अर्ज कसे करावे याची सविस्तर माहिती सांगणार आहे.


१) सर्वात आधी तुम्हाला भारत सरकारच्या NSDL Official Website एनएसडीएल ह्या अधिकृत वेबसाईटवर भेट द्यावी लागेल. तिथे तुम्हाला तुमची राष्ट्रीयता सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर तुमचे संपूर्ण नाव, पत्ता, मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी टाकून केपच्या वेरीफाय करून फिनीशवर क्लिक करायचे आहे. नेक्स्ट पेजवर तुम्हाला तुमची व्यक्तिक माहिती भरावी लागेल.


२) व्यक्तिक माहितीमध्ये तुम्हाला तुमची सर्व पर्सनल माहिती भरावी लागेल. उदाहरणार्थ; डेट ऑफ बर्थ, तुमचे काम, वार्षिक उत्पन्न, प्रोफेशनल माहिती तसेच इत्यादी माहिती भरून पुढे सुरू यावर क्लिक करा. पुढे तुम्हाला तुमचे Documents डॉक्युमेंट्स तयार ठेवायचे आहेत. यासाठी तुमच्याकडे पुढीलप्रमाणे डॉक्युमेंट्स असणे आवश्यक आहे.


३) (१) Identity Proof  आयडेनटी प्रूफ म्हणून Aadhar Card आधार कार्ड, दहावी किंवा बारावी पासींग सर्टीफीकेट, Birth Certificate जन्माचा दाखला आणि इत्यादी डॉक्युमेंटस.
(२) Address Proof एड्रेस प्रूफमध्ये रेशन कार्ड, Passport पासपोर्ट, वीजबिल, Voter ID वोटर आयडी कार्ड, Bank Passbook Or Bank Statement बँक पासबुक अथवा स्टेटमेंट आणि इत्यादी डॉक्युमेंटस.
वरील पैकी प्रत्येकी फक्त एक-एक डॉक्युमेंटस अपलोड करायचे आहेत.


४) डॉक्युमेंटस अपलोड केल्यानंतर तुम्ही लास्ट पेज म्हणजे पेमेंट पेजवर याल. इथे तुम्हाला पेन कार्डसाठी Online Payment ऑनलाईन पेमेंट करायचा आहे. यासाठी शंभर रुपये हे Income Tax Department आयकर विभागाद्वारे आकारले जातात. ऑनलाईन पेमेंट यशस्वी झाल्यानंतर तुम्हाला एक Receipt पावती मिळेल. त्या पावतीची एक प्रिंट काढून घ्या.


५) सात दिवसांनंतर जी Receipt पावती तुम्ही काढली होती. त्यावर एक रेफरन्स नंबर असेल तो रेफरन्स नंबर कॉपी करा आणि परत भारत सरकारच्या NSDL Official Website एनएसडीएल ह्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन E-Pan Download याा डाउनलोड ई- पेन कार्ड हे सर्च करा. ई- पेन कार्ड सापडल्यानंतर Reference number रेफरन्स नंबर आणि मोबाईल नंबर टाकून गेट E-Pan ई- पेन कार्डवर क्लिक केले असता तुमचे पेन कार्ड हे पीडीएफ स्वरूपात डाउनलोड होईल.


तात्पुरत्या स्वरूपासाठी हे E-Pan ई- पेन कार्ड तुम्ही वापरू शकता ह्याची Hard Copy Of Pancard हार्ड कॉपी म्हणजे ओरिजीनल पेन कार्ड हे इंडिया पोस्ट मार्फत पंधरा ते वीस दिवसात तुमच्या अधिकृत पत्त्यावर पाठवण्यात येते. तर अशाप्रकारे तुम्ही Online Pan Card Apply
ऑनलाईन पेन कार्डसाठी अर्ज करून पेन कार्ड मिळवू शकता.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने