Mother Dairy Franchise Registerrion Process - मदर डेअरीची फ्रेंचाईज कशी घ्यावी आणि याची संपूर्ण नोंदणी प्रक्रियेबद्दल सविस्तर माहिती

Pixabay


सर्वांना नमस्कार,
आपल्या सर्वांना माहीत आहे की Mother Dairy ( मदर डेअरी ) ही भारतातील तसेच आशिया खंडातील एक अग्रगण्य दुग्धजन्य पदार्थ उत्पादन कंपनीपैकी एक आहे. संपूर्ण भारतात दर दिवशी मोठ्या संख्येने मदर डेअरीच्या दुग्धजन्य पदार्थांची उत्पादन, खरेदी आणि विक्री प्रक्रिया सुरू आहे.


या दुग्धजन्य पदार्थांमध्ये दूध, चीज, बटर, आईसक्रीम तसेच भरपूर अशा दुग्धजन्य पदार्थांचा समावेश आहे. त्यामुळे जर तुम्हालाही Mother Dairy Franchise ( मदर डेअरीची फ्रेंचाईज ) घ्यायची असेल तर मी तुम्हाला याची संपूर्ण Registerrion Process ( नोंदणी प्रक्रिया ) कशी करावी याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहे.


तर मदर डेअरीची फ्रेंचाईज घेण्यासाठी तुमच्याकडे किमान जागा ३०० स्क्वेअर फूट आणि कमाल जागा ५००+ स्क्वेअर फूट असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर जी व्यक्ती किंवा जर तुम्ही Super Market   (सुपर मार्केट) सेलर असाल तर तुम्ही शिक्षित असणे आवश्यक आहे कारण याचा फायदा तुम्हाला पुढे जाऊन होऊ शकतो.


आता महत्त्वाचा मुद्दा म्हणजे Finance (भांडवल ) किंवा (गुंतवणूक ) रक्कम तर ही फ्रेंचाईज घेण्यासाठी तुमच्याकडे किमान पाच लाख ते कमाल दहा लाख रुपये भांडवल अर्थातच गुंतवणूक रक्कम असणे आवश्यक आहे. यामध्ये तुम्ही डीलरशिप अथवा सुपरमार्केट करिता मदर डेअरी फ्रेंचाईज घेऊ शकता.


मदर डेअरी फ्रेंचाईजची नोंदणी कण्यासाठी तुम्हाला आधी यांच्या Official ( अधिकृत ) वेबसाईटवर भेट द्यावी लागेल. तिथे तुम्ही नोंदणी फॉर्म पाहू शकता यामध्ये तुम्हाला तुमचे नाव, पत्ता ( राज्य आणि पिन ) मोबाईल नंबर, ईमेल आयडी, Business Model बिझिनेस मॉडेल, ही सर्व माहिती भरून फॉर्म सबमिट करायचा आहे.


त्यानंतर पुढे काय प्रक्रिया आहे हे समजावण्यासाठी कंपनीकडून समोरून तुम्हाला कॉल येईल अथवा कंपनीकडून ईमेल तुम्हाला मिळेल. तर अशाप्रकारे तुम्ही मदर डेअरीची फ्रेंचाईज घेवू शकता.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने