how to sell products in flipkart - फ्लिपकार्टवर प्रॉडक्ट्स कसे विक्री करावे आणि याची नोंदणी कशी करावी याबद्दल संपूर्ण माहिती.

Pixabay

सर्वांना नमस्कार,
आपल्या सर्वांना माहीत आहे भारतामध्ये Online E-commerce Platform ऑनलाईन ई- कॉमर्स प्लॅटफॉर्ममध्ये flipkart फ्लिपकार्ट ही एक अग्रगण्य ई- कॉमर्स कंपनी आहे. तसेच flipkart फ्लिपकार्ट मध्ये अमेरिकेतील ऑनलाईन ई- कॉमर्स कंपनी Walmart वॉलमार्टची देखील भागीदारी आहे.


त्यामुळे flipkart फ्लिपकार्टचा व्यवसाय हा भारतीय बाजापेठेतील एक भरभराटीचा व्यवसाय म्हणून ओळखला जातो. त्यामुळे तुम्हाला देखील flipkart फ्लिपकार्ट सोबत व्यवसाय सुरू करायचा असेल तर आज मी तुम्हाला याची नोंदणी प्रक्रिया कशी करावी त्याचबरोबर flipkart फ्लिपकार्टवर स्वतः चे प्रॉडक्ट कसे विक्री करावे याबद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहे.


तर flipkart फ्लिपकार्टवर प्रॉडक्ट्स विक्री करण्यासाठी हे काही महत्तवपूर्ण Documents डॉक्युमेंट्स तुमच्याकडे असणे आवश्यक आहे ते पुढीलप्रमाणे :
१) Pan Card इन्कम टॅक्स कार्ड :- ( पेन कार्ड ) जर तुम्ही स्वतः व्यवसाय करणार असाल म्हणजे तुम्ही प्रोपायटरशिपमध्ये व्यवसाय करणार असाल तर तुमच्या स्वतः चे पेन कार्ड असणे आवश्यक आहे. अथवा जर तुम्ही पार्टनरशिप किंवा जर तुमची कंपनी असेल तर तुमच्याकडे Business Pan Card बिझनेस पेन कार्ड असणे आवश्यक आहे.


२) GSTIN Number जीएसटी नंबर :- flipkart फ्लिपकार्टवर प्रॉडक्ट्सची विक्री करण्यासाठी GST Number जीएसटी नंबर असणे आवश्यक आहे. कारण जरी तुमचे वार्षिक उत्पन्न हे वीस लाख असेल तरी सुद्धा आणि जर तुमचे व्यवसायाचे वार्षिक उत्पन्न वीस लाख नसेल तरी सुद्धा. आता इथे काय होते की जे प्रॉडक्ट्स तुम्ही कस्टमरला विक्री करणार ते पूर्ण भारतातून कुठल्याही राज्यातून ऑर्डर करणार आणि प्रत्येक राज्याचा कर हा वेगळा असतो म्हणून जीएसटी नंबर तुमच्याकडे असणे आवश्यक असते.


२) Aadhar Card, आधार कार्ड, कॅन्सल चेक आणि Proof of Address जागेचा पुरावा :-  ई- केवायसीसाठी आधार कार्ड असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर कॅन्सल चेक अथवा बँक स्टेटमेंट ऑनलाईन पेमेंट व्यवहार स्वीकारण्यासाठी याची आवश्यकता असते. जागेचा पुरावा म्हणजे जर तुमचे स्वतः चे दुकान असेल अथवा जर तुम्ही स्वतः च्या घरातून flipkart फ्लिपकार्ट वर प्रॉडक्ट विकणार असाल तर घराचे डॉक्युमेंट्स उदा; वीजबिल, कर पावती इत्यादी. जर तुमचे दुकान हे रेंटवर असेल तर तुम्हाला रेंट अग्रीमेंटची गरज भासते.


वरील प्रमाणे जर तुमच्याकडे सर्व Documents डॉक्युमेंट्स उपलब्ध असतील तर तुम्ही flipkart फ्लिपकार्टच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन नोंदणी करू शकता. नोंदणी प्रक्रियेमध्ये तुम्हाला तुमची व्यक्तिक माहिती भरून Documents डॉक्युमेंट सबमिट करायचे आहेत. त्यानंतर तुमची माहिती आणि डॉक्युमेंटची फ्लिपकार्टच्या टीमकडून पडताळणी केली जाते. जर तुमची सर्व माहिती बरोबर असेल तर तुम्ही फ्लिपकार्ट सोबत व्यवसाय करून स्वतः चे प्रॉडक्ट Online Selling ऑनलाईन विकू शकता.


flipkart फ्लिपकार्ट ने तुम्हाला मान्यता दिल्या नंतर तुम्हाला किमान एक तरी प्रॉडक्ट लिस्ट करावे लागेल. जेव्हा तुमच्या Online store फ्लिपकार्ट स्टोअर वरून कस्टमरने प्रॉडक्ट खरेदी केल्यानंतर तुम्हाला त्या प्रॉडक्टची काही किंमत ही कमीशनच्या स्वरूपात फ्लिपकार्टला द्यावी लागते. पुढे तुम्हाला प्रॉडक्ट पॅक करून Delivery Logistics डिलिव्हरी लॉजिस्टिक्सला हॅण्डओव्हर करायचे असते. कस्टमरला प्रॉडक्ट मिळाल्यानंतर तुमच्या बँक अकाऊंट मध्ये दहा ते पंधरा दिवसांच्या आत फ्लिपकार्ट पेमेंट करते.


तर अशाप्रकारे तुम्ही flipkart फ्लिपकार्ट सोबत व्यवसाय करून स्वतः चे प्रॉडक्ट्स Online E-commerce Website ऑनलाईन ई- कॉमर्स वेबसाईटवर विकू शकता.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने