अन्न-धान्य सुरक्षा लायसन्स ऑनलाईन नोंदणी प्रक्रिये बाबत सविस्तर माहिती.


Pixabay


सर्वांना नमस्कार,
आपल्या सर्वांना माहीत आहे की आज जर तुम्हाला अन्न-धान्य निगडित कुठलीही वस्तू विकायची असेल तर त्यासाठी सरकारचे अन्न-धान्य सुरक्षा लायसन्स तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. यामध्ये उदाहरणार्थ; ग्रोसरी दुकान, किराणा दुकान, फूड स्टॉल आणि इतर व्यवसायाचा सामावेश आहे.


तर ही काही उदाहरणे आहेत. यामधे व्यवसाय हा कुठल्याही खान-पान विषयी तुमचा असेल मग ते तुम्ही अगदी छोट्या पातळीवर करत असाल किंवा मोठ्या पातळीवर यांनी काही फरक पडत नाही. फक्त अन्न-धान्य सुरक्षा लायसन्स असणे बंधनकारक आहे. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की अन्न-धान्य सुरक्षा लायसन्सची ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया माहिती.


१) अन्न-धान्य सुरक्षा लायसन्स ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला भारत सरकारच्या अन्न-धान्य लायसन्स ह्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल. वेबसाईटवर तुम्हाला नवीन नोंदणी करण्याचे पर्याय दिसेल. पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला नवीन पेजवर एक छोटासा डिकलेरेश्र्न ओळ दिसेल त्यामध्ये एलाव वर क्लिक करा.


२) पुढच्या पेजवर तुम्हाला तुमच्या व्यवसायाचे राज्य निवडावे लागणार. राज्य निवडल्यानंतर पुढे तुमचा व्यवसाय हा जर हा १ पेक्षा अधिक असेल आणि इतर काही कंपनी किंवा संघटने सोबतच्या नावाने नोंदणीकृत असेल तर 'येस' निवडा अथवा 'नो' निवडा. हे पर्याय निवडल्यानंतर पुढे तुम्हाला व्यवसायाची कॅटिगरी निवडावी लागेल.


३) यामध्ये तुम्हाला सर्व प्रकारचे अन्न-धान्य निगडित कॅटिगरी सापडतील. यामध्ये तुम्ही तुमच्या व्यवसायाची कॅटिगरी निवडू शकता. कॅटिगरी निवडल्यानंतर त्याच्यासमोर तीन रकाने दिले असतील. यामध्ये विवध वार्षिक टर्न ओव्हर आणि त्याबाबत इतर माहिती असते. तुमच्या व्यवसायाचे वार्षिक टर्न ओव्हर किती आहे हे तुम्हाला निवडावे लागणार.


४) कॅटिगरी निवडल्यानंतर नेक्स्टवर क्लिक करा. पुढे तुम्हाला युजर नेम, पासवर्ड, ईमेल आयडी, मोबाईल नंबर, नाव आणि इत्यादि. माहिती भरावी लागणार. ही माहिती भरल्यानंतर सबमिटवर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला तुमच्या इमेल आयडी अथवा मोबाईल नंबरवर एक टीआरएन रेफरन्स नंबर मिळेल. हा टीआरएन रेफरन्स नंबर सेव्ह करून घ्या.


५) रेफरन्स नंबर मिळल्यानंतर तुमचं वेबपेज हे रीडायरेक्ट अन्न-धान्य सुरक्षा लायसन्सच्या लॉगिन डेशबोर्ड वर होईल. यामध्ये तुम्ही आधी भरलेली माहिती टाकून लॉगिन करावे. पुढे तुम्हाला तुमच्या नावाचे डेशबोर्ड दिसेल यामध्ये जो टीआरएन रेफरन्स नंबर तुम्ही सेव्ह केला होता तो टाकावा. नंबर टाकल्यानंतर पुढे तुम्हाला तुमचं अर्ज दिसेल त्यावर क्लिक करा.


६) नेक्स्ट पेजवर तुम्हाला तुमची वयक्तिक आणि व्यवसाय विषयी माहिती भरावी लागणार. यामध्ये तुमचे आणि व्यवसायाचे पूर्ण नाव, तसेच व्यवसाय आणि स्वतः चा पूर्ण पत्ता, कॉन्टॅक्ट डिटेल्स, व्यवसाय सुरुवात करण्याची तारीख आणि इतर काही ही माहिती भरल्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करावे लागतील.


७) डॉक्युमेंटमध्ये तुम्हाला तुमचे ओळख प्रमाणपत्र द्यावे लागेल. यामध्ये वोटरआयडी कार्ड, इन्कम टॅक्स कार्ड, रेशन कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी एक डॉक्युमेंट तुमच्या कडे असणे आवश्यक आहे. हे डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर तुम्हाला पत्ता अपलोड आणि सेल्फ डिकलेरेश्र्न फॉर्म तिथे दिलेला असतो त्याची पीडीएफ फाइल डाऊनलोड करा.


८) पुढे तुमचा व्यवसाय कुठे सुरू होणार आहे याचे डॉक्युमेंट अपलोड करा. यामध्ये तुम्हाला व्यवसायाच्या पत्याचे डॉक्युमेंट अपलोड करावे लागणार. यात वीजबिल, अग्रीमेंट, बँकेचे पासबुक अथवा बँक स्टेटमेंट आणि इतर डॉक्युमेंटचा समावेश आहे. पुढे जे तुम्ही सेल्फ डिकलेरेश्र्न फॉर्म डाऊनलोड केला होता. त्यावर तुमची सही, तारीख आणि प्लेस टाकून पुन्हा अपलोड करा.


९) त्यानंतर पुढच्या पेजवर तुम्हाला फॉर्म 'ए' दिसेल त्याची पीडीएफ फाईल डाऊनलोड करून घ्या. जी फॉर्म 'ए' ची पीडीएफ फाईल तुम्ही डाऊनलोड केली होती त्यावर साइन करून पुन्हा अपलोड करा. यानंतर सगळी माहिती भरल्यानंतर सबमिटवर क्लिक करा. आता तुम्हाला लायसन्स नोंदणी पेमेंट भरावे लागणार हे पेमेंट प्रत्येक राज्यानुसार वेगवेगळे असू शकते.


१०) पेमेंट यशस्वी झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या डेशबोर्डवर एक पेमेंट पावती मिळेल ती पावती सेव्ह करून घ्या. यानंतर १० ते १५ दिवसाच्या कालावधीत तुमचे अर्ज हे अन्न-धान्य सुरक्षा लायसन्सचे कर्मचारी द्वारा चेक केले जाते. या कालावधीत तुम्ही तुमच्या लॉगिन आयडी सोबत साईन इन करून तुमच्या अर्जाचे स्टेट्स पाहू शकता.


जर तुमची सर्व माहिती ही बरोबर असेल तर तुम्हाला अन्न-धान्य सुरक्षा लायसन्स हे ऑनलाईन तुमच्या ईमेल आयडी वर पाठवले जाते. ह्या लायसन्सचे तुम्ही प्रिंट काढून लेमीनेशन करून घ्या. हे अन्न-धान्य सुरक्षा लायसन्स तुम्ही तुमच्या दुकानात लावू शकता. जेणेकरून जर कधी अन्न-धान्य सुरक्षाचे कर्मचारी आले असता.


तुम्ही त्यांनां तात्काळ लायसन्स दाखवू शकता. तर अशाप्रकारे तुम्ही अन्न-धान्य सुरक्षा लायसन्सची नोंदणी ऑनलाईन करू शकता आणि लायसन्स हे प्राप्त करू शकता.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने