पूजा साहित्याचा छोटा पण एक फायदेशीर साईड व्यवसाय (बिजिनेस).

Pixabay


सर्वांना नमस्कार,
भारतामध्ये कितीतरी प्रकारचे सन आणि उत्सव साजरे केले जातात. यामध्ये उदाहरणार्थ; गणेश उत्सव, नवरात्री, दीपावली आणि इत्यादी. असे किततरी सन आणि उत्सव साजरे करत असताना लोकांना पूजेची साहित्य ही मोठ्या पातळीवर लागतात.


ह्या पूजेच्या साहित्याला सनात आणि उत्सवमध्ये प्रचंड प्रमाणात मागणी असते. त्यामुळे जर तुम्ही हा व्यवसाय सुरू करू इच्छिता तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की कशाप्रकारे आपण सन आणि उत्सव साठी एक पूजा साहित्य साईड व्यवसाय (बिजिनेस) सुरू करू शकतो.


तर हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुमच्याकडे जर स्वतः चे दुकान अथवा जागा असेल तर किमान वीस ते पंचवीस हजार रुपयांची गुंतवणूक तुम्हाला करावी लागेल. नाहीतर जर तुमच्यकडे स्वतः चे दुकान अथवा जागा नसेल तर तुम्हाला किमान सतर ते ऐंशी हजार रुपयांची गुंतवणूक तुम्हाला करावी लागेल.


कारण जर तुमच्याकडे जर स्वतः चे जागा अथवा दुकान असेल. तर तुम्हाला जागेचे भाडे आणि डीपोसिट नाही भरावे लागणार आणि तुमचा हा खर्च वाचेल. पण याव्यतिरिक्त जर तुमच्यकडे स्वतः चे दुकान अथवा जागा नसेल तर तुम्हाला जागेचे भाडे आणि डीपोसिट भरावे लागणार. हा खर्च तुम्हाला वेगळा लागणार.


आता तुम्हाला व्यवसाय करण्यासाठी तुम्ही हे काही साहित्य विकू शकता. यामध्ये उदाहरणार्थ; कापूर, धूप, विवध प्रकारचे हार, हळदी-कुंकूचे आणि इतर डबे, कापसाची वात, अगरबती, गोडतेल आणि खूप सारे विविध प्रकारचे साहित्य तुम्ही होलसेल भावात आणून रिटेलमध्ये विकू शकता.


दुकान आणि जागेसाठी तुम्हाला एक शॉप ऍक्ट लायसन्स बनवावे लागणार. हे लायसन्स तुम्ही तुमच्या नजिकच्या तहसिलदारच्या कार्यालयात किंवा जवळच्या सर्व्हिस सेंटर मधून अथवा तुम्ही घरबसल्या ऑनलाईन देखील बनवून घेऊ शकता. यासाठी लागणारे डॉक्युमेंट हे तुम्हाला तुमच्या नजिकच्या तहसीलदार कार्यालयात कळतील.


तर अशाप्रकारे तुम्ही होलसेल भावात माल आणून आणि शॉप ऍक्ट लायसन्स बनवून पूजा साहित्याचा छोटा पण एक फायदेशीर साईड व्यवसाय (बिजिनेस) करू शकता.


2 टिप्पण्या

  1. फायदेमंद हिंदी शब्द आहे, मराठीत फायदेशीर म्हणतात. कृपया बदल करावा. बाकी लेख उत्तम. असेच उत्तमोत्तम लेख येऊ द्या!

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. आपण केलेल्या तक्रारी बद्दल धन्यवाद! आपल्या तक्रारीची दक्खल घेउन संबधित आर्टिकलमध्ये बदल करण्यात आला आहे.

      हटवा

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने