ग्रामीण भागात प्रॉपर्टी आणि शहरी भागात प्रॉपर्टी या दोघांमध्ये कितपत आहेत फरक?

Pixabay


सर्वांना नमस्कार,
प्रॉपर्टी म्हंटले की आपल्या सर्वांच्या डोळ्यासमोर सगळ्यात आधी जे येते ते म्हणजे घर. प्रत्येक व्यक्तीला वाटते की आपल्या स्वतः च्या हक्काचे घर किमान एक तरी घर असावे. मात्र सध्याच्या घडीला आपण सर्व जण हे घराला घर बघून पाहत नाही तर येणाऱ्या काळाची गुंतवणूक म्हणून याकडे पाहतो.


कारण प्रॉपर्टी म्हंटले की आज नाहीतर उद्या भाव तर वाढणारच आहे. पण बहुतांश लोकांना माहीत नसते की घर कुठे घ्यावे. यामध्ये ग्रामीण व शहरी प्रॉपर्टीचा समावेश आहे. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की ग्रामीण प्रॉपर्टी आणि शहरी प्रॉपर्टी या दोघांमध्ये कितपत फरक आहे.


तर ग्रामीण भागात प्रॉपर्टीचा विचार केला तर सध्याची गाव ही हळूहळू विकसित आणि डिजिटल होऊ लागली आहेत. ग्रामीण भागात सरकार आपल्या प्रकल्पांना जोर देताना दिसत आहे. यामध्ये डिजिटल सेवा, आत्याधूनिक इन्फ्रा स्टर्क्चर, इंटरनेट बाबत विविध सेवा आणि इत्यादी. सुविधांचा समावेश आहे.


यासोबत ग्रामीण भागात बाहेरगावची देखील गुंतवणूक होऊ लागली आहे. त्यामुळे येथे व्यवसाय आणि रोजगार याची उपलब्धता हळूहळू वाढताना दिसून येते. यामुळे जर तुम्ही ग्रामीण भागात गुंतवणूक करणार असाल तर ही गुंतवणूक काही कालावधीने हळूहळू वाढीस लागेल.


याव्यतिरिक्त जर तुम्ही शहरी भागात प्रॉपर्टीचा विचार केला तर सर्वात आधी डोळ्यासमोर येतात ते उंच गगनाला भिडलेले घरांच्या किंमती. कारण यामागे देखील एक कारण आहे ते म्हणजे येथे आधीपासूनच गुंतवणूक खूप मोठ्या पातळीवर झाली आहे. त्याचबरोबर येथील राहणीमान हे उच्च दर्जाचे आणि महागडे असते.


शहरी भागात प्रॉपर्टी घेण्याचा फायदा म्हणजे येथे रोजगार आणि व्यवसाय मोठ्या पातळीवर उपलब्ध आहे. यासोबत येथे आत्याधूनिक इन्फ्रा स्टर्क्चरचा विकास हा मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो. व सर्वात महत्वाचे म्हणजे येथे प्रॉपर्टीचा दर हा दिवसागणिक वाढतच चाललेला आहे.


त्यामुळे जर तुम्ही शहरी भागात प्रॉपर्टीचा विचार केला तर ही गुंतवणूक दिवसागणिक वाढतच जाणार असे म्हणता येईल. तर हे काहीे ग्रामीण भागात प्रॉपर्टी आणि शहरी भागात प्रॉपर्टी यामधील फरक आहेत. यामध्ये एक लक्षणीय बाब म्हणजे प्रॉपर्टी ही कुठेही असू गुंतवणूक महत्वाची असते.


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने