एसइओ स्टोअर बॅकलिंक क्रिएटर आणि अफीलाईट मार्केटिंग उपक्रम.

Pixabay

सर्वांना नमस्कार,
सध्याच्या काळात ब्लॉगिंगच्या विश्वात बरेच लोक ही आपली वेबसाईट गुगलवर रँक करण्यासाठी आणि वेबसाईटची मार्केटिंग करण्यासाठी खूप प्रयत्न करत असतात. तर त्यामध्ये बॅकलिंकचा आणि मार्केटिंगचा देखील समावेश आहे.


तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की कशाप्रकारे तुम्ही सर्वजण हे एसइओ स्टोअर बॅकलिंक क्रिएटरचा वापर करून बॅकलिंक तयार करू शकता. आणि आपली वेबसाईट ही गुगलवर रँक करू शकता त्याचबरोबरीने स्वतः च्या वेबसाईटची मार्केटिंग सुद्धा करू शकता.


एसइओ स्टोअरवर बॅकलिंक क्रिएटर आणि अफीलाईट मार्केटिंग उपक्रमात सहभागी होण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला यांच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन जर तुम्ही नवीन असाल तर साईन अप करून घ्या. किंवा याआधी जर तुम्ही ही वेबसाईट वापरली असेल साईन इन करून घ्या.


त्यानंतर तुम्हाला तुमच्या एसइओ स्टोअरच्या डेशबोर्डवर वेबसाईट करिता बॅकलिंक तयार करण्यासाठी विविध पर्याय तुम्हाला त्याठिकाणी दिसतील. तुम्ही तुमच्या मर्जीप्रमाणे त्यापैकी कुठलाही पर्याय निवडून बॅकलिंक जनरेट करू शकता.


ह्याची प्रक्रिया अगदी सोपी आहे फक्त तुम्हाला तुमच्या वेबसाईटचे विविध यूआरएल, टॉपिक कॅटेगरी, कीवर्ड आणि इतर माहिती भरावी लागणार. ही माहिती भरल्यानंतर प्रोसेसवर क्लिक करून बॅकलिंक जनरेट करून घ्या.


पुढे तुम्हाला एसइओ स्टोअर अफीलाईट मार्केटिंग उपक्रमात सहभाग घेण्यासाठी तुमच्या एसइओ स्टोअरच्या डेशबोर्डमध्ये सर्वात खाली तुम्हाला जॉईन एसइओ स्टोअर अफीलाईट मार्केटिंग उपक्रम हा पर्याय दिसेल.


ह्या पर्यायावर क्लिक करा मग तुमच्या समोर दोन ते तीन प्रकारचे मार्केटिंग पर्याय दिसतील. यामधे माहिती लिहणे, व्हिडिओ तयार करणे आणि इत्यादी. मार्केटिंगच्या पर्यायाचा समावेश आहे. तर अशाप्रकारे तुम्ही एसइओ स्टोअर बॅकलिंक क्रिएट करू शकता. आणि आपल्या वेबसाईटसाठी अफीलाईट मार्केटिंग उपक्रमामध्ये सहभागी होऊन आपल्या स्वतः च्या वेबसाईटची मार्केटिंग करू शकता.


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने