भाजी आणि फळे विकण्याचा व्यवसाय कितपत आहे प्रॉफिटटेबल याबाबत सविस्तर माहिती.


सर्वांना नमस्कार,
भाजी आणि फळांचा व्यवसाय हा एक असा व्यवसाय आहे ज्याला सीजन नसतो तो बाराही महिने सक्रीय असतो. म्हणून ह्या व्यवसायात उद्योजक सगळ्या ऋतूमध्ये भरभरून कमाई करतात. तसेच हा व्यवसाय एक प्रकारचा भरभराटीचा व्यवसाय म्हणून याची ओळख आहे.


त्यामुळे ह्या व्यवसायात जर तुम्ही गुंतवणूक करणार असाल तर ही एक उत्तम गुंतवणूक तुमच्यासाठी फायदेमंद ठरू शकते. त्यासाठी आज मी तुम्हाला सांगणार आहे की भाजी आणि फळांचा व्यवसाय हा कशाप्रकारे आपण सुरू करुन अथवा सुरू असेल तर कशाप्रकारे त्याला प्रॉफिटटेबल करू शकतो.


तर सर्वात आधी तुम्ही जर पूर्णपणे नवीन असाल आणि जर तुमचे बजट देखील कमी असेल तर तुम्ही मार्केट मध्येबसून हा व्यवसाय सुरू करू शकता. अथवा जर तुमचा व्यवसाय हा जुना असेल आणि दुकानात असेल तरीसुद्धा हा व्यवसाय प्रॉफिटटेबल ठरू शकतो. फक्त करण्याची इच्छा पाहिजे मग तुम्ही कुठेही व्यवसाय करू शकता.


भाजी आणि फळंचा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला आधी अशा मार्केटचा तपास घ्यावा लागेल. जे मार्केट हे तुमच्या परिसरात असेल आणि सर्वात महत्वाचे म्हणजे जिथे होलसेल भावात चंगल्या प्रकारचा माल मिळेल. जेणकरून तुम्हाला मालाची वाहतूक करण्यास अधिक सोयीस्कर होईल.माझ्या माहितीनुसार नवी मुंबई येथील एपीएमसी मार्केट व पुणे येथील मार्केट यार्ड हे दोन होलसेल मार्केट मला माहीत आहे. पण तुम्ही तुमच्या माहीत असलेल्या नजिकच्या मार्केटमधून होलसेल भावात भाज्या आणि फळे विकत घेऊ शकता. यामध्ये श्यकतो एक किंवा दोन होलसेलरस निवडा जेणेकरून भविष्यात पुढे जाऊन तुम्हाला त्यांचा अधिक सपोर्ट मिळू शकतो.


हा व्यवसाय करण्यासाठी अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचा व्यवसाय काय आहे हे शासनाला दाखवण्या करिता अन्न-धान्य व्यवसाय परवाना हे असणे आवश्यक आहे. हा व्यवसाय परवाना तुम्ही नजिकचा कुठल्याही कॉमन सर्व्हिस सेंटर मधून मिळवू शकता. तसेच हा परवाना तुम्ही सरकारच्या अधिकृत वेबसाईटवरून मिळवू शकता तिथे उपलब्ध आहे.


तर अशाप्रकारे तुम्ही भाज्या आणि फळांचा हा प्रॉफिटटेबल व्यवसाय करून अधिक नफा मिळवू शकता.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने