वस्तू आणि सेवा यांची ऑनलाईन अथवा ऑफलाईन जाहिरात (अड्व्हरटाईजिंग) कशी करावी याबद्दल सविस्तर माहिती.

Pixabay


सर्वांना नमस्कार,
वस्तू आणि सेवा ही एक अशी गोष्ट आहे ज्यामुळे आपण आपली सेवा आणि आपले वस्तू ग्राहकांपर्यंत पोहचवू शकतो. पण ही सेवा अथवा वस्तू जर तुम्हाला आणखी मोठ्या संख्येने ग्राहकांपर्यंत पोहोचवायची असेल त्यासाठी गरजेची आहे ते म्हणजे जाहिरात (अड्व्हरटाईजिंग).


जाहिरात ही एक अशी गोष्ट आहे की ती ग्राहकांना तुमचे वस्तू आणि सेवा घेण्यासाठी आकर्षित करते. तर आज मी तुम्हाला वस्तू आणि सेवा यांची ऑनलाईन अथवा ऑफलाईन जाहिरात (अड्व्हरटाईजिंग)  कशाप्रकारे करावी याबद्दल सविस्तर माहिती.


१) ऑनलाईन जाहिरात :- ही जाहिरात प्रकार खूप प्रसिद्ध असल्याने आजच्या आधुनिक काळात ह्या जाहिरात प्रकारला मोठ्या पातळीवर मागणी आहे. दुसरे कारण म्हणजे आज जगात बहुतेक लोकांकडे मोबाईल, दूरदर्शन, संगणक, इंटरनेट सुविधा असल्याने ह्या जाहिरात प्रकारचा जास्त प्रमाणात प्रसार झालेला दिसतो.


यामध्ये बातमी चेंनल, विवध चित्रपट आणि मालिका चेंनल, फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर, युट्यूब, विवध वेबसाईटवर लावलेले जाहिरात अड्स नेटवर्क. आणि असंख्य अशा जाहिरातींचा समावेश ह्या ऑनलाईन जाहिरात (अड्व्हरटाईजिंग) प्रकारात येते.


२) ऑफलाईन जाहिरात :- ही जाहिरात प्रकार खूप जुन्या जाहिरात प्रकारापैकी एक आहे. यामध्ये सर्वात प्रसिद्ध जाहिरात म्हणजे वृत्तपत्र मार्फत जाहिरात करणे. कारण जगात खूप साऱ्या लोकांना दररोज वृत्तपत्र वाचण्याची सवय असते. त्यामुळे ही एक चांगली सुविधा आहे.


दुसरे म्हणजे टेम्प्लेट बनवून जाहिरात करणे, बॅनर अथवा होल्डींग मार्फत जाहिरात करणे, सार्वजनिक वाहतूक उदाहरणार्थ; ऑटोरिक्षा, रेल्वे, बससेवा, टेक्सी आणि इतर काही वाहतूक सुविधांवर जाहिरात करणे, विवध खेळ आणि स्पर्धेत जाहिरात करणे असे खूप काही जाहिरातींचा ऑफलाईन अड्व्हरटाईजिंगमध्ये समावेश आहे.


तर अशाप्रकारे आपण आपले सेवा अथवा आपले वस्तू जाहिरातीमार्फत जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहचवू शकतो.


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने