अमूल डेअरी प्रॉडक्ट आणि आईसक्रीम ब्रांच याविषयी सविस्तर माहिती.

Pixabay


सर्वांना नमस्कार,
डेअरी प्रॉडक्ट आणि आईसक्रीम हे मानवी जीवनातील दैंनंदिन आहारातील एक अविभाज्य घटक बनले आहे. दररोजच्या जीवनात लागणाऱ्या आहारापैकी एक आहार म्हणून याचा समावेश होतो. डेअरी प्रॉडक्टमध्ये दूध, दही, पनीर, चीज आईसक्रीम तसेच इत्यादी. प्रॉडक्ट्सचा समावेश होतो.


डेअरी प्रॉडक्ट  रोजच्या जीवनात लागणाऱ्या आहारापैकी एक असल्याने हा व्यवसाय खूप फायदेशीर आणि भरभराटीचा आहे असे म्हणण्यात काही हरकत नाही. तर आज मी तुम्हाला अमूल डेअरी प्रॉडक्ट आणि आईसक्रीम ह्याची ब्रांच व नोंदणी प्रक्रिया याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहे.


तर अमूल डेअरी प्रॉडक्ट आणि आईसक्रीम ब्रांच सुरू करण्यासाठी तुमच्याकडे किमान १०० ते कमाल ३०० स्कवेरफूट जागा असणे आवश्यक आहे. कारण जागेच्या बेसवरूनच तुम्हाला कंपनी त्यानुसार प्रॉडक्ट कुठले सप्लाय करायचे हे सुनिश्चित करते.


अमूल डेअरी प्रॉडक्ट ह्याचे जागेनुसर दोन प्रकार आहेत.
१) १०० स्कवेरफूट जागा :- हे ब्रांच तुम्ही कमीत कमी जागेत म्हणजे १०० स्कवेरफूट मध्ये उघडू शकता. यामध्ये तुम्ही अमूलचे मिल्क प्रॉडक्ट्स आणि आईसक्रीम विकू शकता. यासाठी एकूण किमान खर्च हा दोन लाख रुपयांपर्यंत होईल.


२) ३०० स्कवेरफूट जागा :- या
प्रकारची ब्रांच ही ३०० स्कवेरफूट जागेत तुम्ही ओपन करू शकता. ह्या ब्रांचचे फायदे म्हणजे यामध्ये तुम्ही अमूलचे मल्टी प्रॉडक्ट्स विकू शकता. उदाहरणार्थ; दूध, आईसक्रीम, चीज आणि खूप प्रकारच्या प्रॉडक्ट्सचा यामध्ये समावेश होतो. यासाठी एकूण किमान खर्च हा सहा लाख रुपयांपर्यंत होईल.


तर अशाप्रकारे तुम्ही अमूल डेअरी प्रॉडक्ट आणि आईसक्रीम ब्रांच सुरू करू शकता.


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने