ऑनलाईन व्यवसाय सुरू करण्यासाठी काही महत्तवपूर्ण ई- कॉमर्स वेबसाइट्स!

Pixabay


सर्वांना नमस्कार,
आपल्या सर्वांना माहीत आहे की आजच्या काळात लोक ऑनलाईन पद्धतीने मोठ्या पातळीवर शॉपिंग करताना दिसत आहे. याचा दुसरा आणि महत्वाचा फायदा म्हणजे लोकांनी ऑनलाईन पद्धतीने शॉपिंग केल्याने त्यांना डिस्काउंट जास्त मिळतो.


त्यामुळे ऑनलाईन पद्धतीने व्यवसाय हा मोठ्या संख्येने वाढताना दिसून येत आहे. तुमचाही जर व्यवसाय असेल आणि तुम्ही सुद्धा व्यवसाय ऑनलाईन पद्धतीने करण्याच्या विचारात असाल. तर आज मी तुम्हाला ऑनलाईन व्यवसाय करण्यासाठी काही महत्तवपूर्ण ई- कॉमर्स वेबसाइट्सची माहिती सांगणार आहे.


१) शॉपीफाय :-  ह्या ऑनलाईन साइटवर तुम्ही तुमचे प्रॉडक्ट जगभरात कुठेही विकू शकता. शॉपीफायवर नोंदणी करण्यासाठी तुम्हाला यांच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल. नोंदणी करताना तुम्हाला ह्या साइटवर १४ दिवसांचा फ्री ट्रायल दिला जातो. त्यानंतर तुम्ही तुमच्या गरजेनुसार विविध प्लान निवडू शकता.


२) ईकविड :- ही साईट तुम्हाला जीवनभर मोफत प्रॉडक्ट विकण्याची सवलत देते. पण यामध्ये काही निर्बंध आहेत जसे; १० प्रॉडक्ट मर्यादा, सबडोमेन साईट आणि इतर काही याव्यतिरिक्त जर तुम्ही पेड प्लान घेतला तर तुम्हाला खूप सारे सुविधा उपलब्ध होतील. नोंदणी करण्यासाठी यांच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन नोंदणी करू शकता.


३) विक्स :-  विक्सवर नोंदणी प्रक्रिया करण्यासाठी यांच्या अधिकृत वेबसाईटवर भेट द्या. ह्या साईटवर तुम्ही अनलिमीटेड प्रॉडक्ट विकू शकता. फक्त तुम्हाला प्रॉडक्ट विकण्यासाठी सबडोमेनचा वापर करावा लागेल. नाहीतर तुम्ही यांचा सबक्रीप्शन प्लान विकत घेऊन सेल करू शकता.


४) शॉपशस्त्रा :- ह्या साइटवरदेखील तुम्ही अनलिमीटेड प्रॉडक्ट विकू शकता. ही साईट वर्डप्रेसच्या माध्यमाने तयार झालेली असते. त्यामुळे ह्यामध्ये तुम्ही प्लगिनचा वापर करून तुमच्या सोयीनुसार बदल करू शकता. तुम्हाला जर कस्टम डोमेनचा वापर करायचा असेल तर मग तुम्ही प्लानची निवड करून कस्टम डोमेन जोडू शकता.


५) विबली :-  विबलीवर तुम्ही मर्यादित प्रॉडक्ट सेल करू शकता. जर तुम्हाला जास्त प्रॉडक्ट विकायचे असेल तर मग तुम्हाला सबक्रीप्शन प्लान विकत घ्यावा लागतो. ह्या साइटसोबत तुम्ही जगभरात स्वतः चे समान विकू शकता.  याव्यतिरिक्त विबली तुम्हाला अफिलाईट मार्केटिंग करण्याची संधी देते.


तर अशाप्रकारे तुम्ही ऑनलाईन
ई-कॉमर्सच्या माध्यमाने तुमचा व्यवसाय ऑनलाईन करून तुमचे प्रॉडक्ट हे ग्राहकापर्यंत पोहचवू शकता.


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने