वक्रांगी केंद्र काय आहे? याची शाखा (फ्रेंचाईज) कशी सुरु करावी याबाबत सविस्तर माहिती.

Pixabay


सर्वांना नमस्कार,
वक्रांगी केंद्र हे एक आधुनिक प्रकारचे ऑनलाईन डिजिटल ग्राहक सेवा पुरवण्याचे माध्यम आहे. यामध्ये उदाहरणार्थ; मोबाईल आणि डिश रिचार्ज, वीजबिल, मनी ट्रान्स्फर, एटीएम, बँकेत शून्य रुपयाचे खाते उघडणे इत्यादी खूप प्रकाराच्या सुविधांचा समावेश आहे.


यांच्यामार्फत ऑनलाईन डिजिटल ग्राहक सेवा पुरवून तुम्हीसुद्धा यांच्यासोबत काम करू शकता. त्यामुळे जर तुम्हालाही वक्रांगी केंद्र यांची शाखा (फ्रेंचाईज) सुरू करायची असेल तर आज मी तुम्हाला यांच्या नोंदणी प्रक्रिये बाबत सविस्तर माहिती सांगणार आहे.


१) वक्रांगी केंद्राची शाखा (फ्रेंचाईज) ओपन करण्यासाठी तुमच्याकडे स्वतः च्या मालकीची जागा असणे आवश्यक आहे. जर तुमच्या कडे स्वतः च्या मालकीची जागा नसेल तर तुम्ही जागा भाडेतत्त्वावर घेऊ शकता. यासाठी वक्रांगी केंद्राने जागेनुसार विवध प्लान तयार केले आहेत. यामध्ये जागेनुसार तुम्हाला प्लानची शाखा देण्यात येईल.


२) तर नोंदणी प्रक्रियेसाठी तुम्हाला वक्रांगी केंद्राच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल. तिथे तुम्हाला जागेनुसार विवध प्लान दिसतील. त्यापैकी तुमच्याकडे असलेल्या जागेनुसार तुम्ही प्लान निवडू शकता. प्लान निवडल्यानंतर तुम्हाला अपलाय नाउवर क्लिक करायचे आहे.


३) पुढील पेजवर तुम्हाला एक सबमिशन फॉर्म दिसेल. त्या फॉर्ममध्ये तुम्हाला तुमची वयक्तिक माहिती आणि  जगेविषयी माहिती भरावी लागणार. जसे की तुमचे नाव आणि पत्ता, प्रोफेशन, मोबाईल नंबर, ईमेल आयडी, शिक्षण, जागेचा संपूर्ण पत्ता व जागा कोणाच्या मालकीची आहे. हे भरल्यानंतर फॉर्म सबमिट करा.


४) फॉर्म पूर्णपणे भरून सबमिट केल्यानंतर तुम्हाला पडताळणी आणि कन्फर्ममेशन प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर वक्रांगी केंद्राची टीम ही तुमच्या जागेची पडताळणी करण्यासाठी येतील. वक्रांगी केंद्राच्या टीमकडून पडताळणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुमच्या जागेवर एक आयडी दिले जाते.


५) त्यानंतर तुम्हाला वक्रांगी केंद्राची शाखेला सुरुवात करण्यासाठी अग्रीमेंट आणि उर्वरित डॉक्युमेंट सबमिट करावे लागतील. हे भरल्यानंतर तुमच्या वक्रांगी केंद्राचा एक युनिक आयडी जनरेट होईल. त्यानंतर तुमच्या जागेवर केंद्राची एक डिझाईन तयार करण्यात येईल. व त्यांच्या टीमकडून तुम्हाला काम करण्याची ट्रेनिंग दिली जाते.


ही सर्व नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्ही वक्रांगी केंद्रासोबत शाखा जोडून ऑनलाईन पद्धतीने डिजिटल ग्राहक सेवा पुरवून यांच्यासोबत काम करू शकता.


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने