शेअर मार्केट मधील काही चांगले डिस्काउंट ब्रोकर ट्रेडिंग अँप अथवा साईट बाबत सविस्तर माहिती.

Pixabay


सर्वांना नमस्कार,
आपल्या सर्वांना माहीत आहे की आधी शेअर बाजारात शेअरची खरेदी आणि विक्री म्हणजे ट्रेडिंग ही विवध उपकरणाद्वारे होत होती. मात्र आता तंत्रज्ञान हे खूप विकसित झाल्याने शेअर बाजारात खरेदी आणि विक्री ट्रेडिंग ही एक वेगळ्या प्रकाराने आपल्याला अनुभवायला मिळत आहे.


यामध्ये ऑनलाईन मोबाईलद्वारे ट्रेडिंग करून शेअर बाजारात गुंतवणूक करणे हे अधिक सोपे आणि जलद झाले आहे. ह्या अँपची अथवा साइटची विशेषता म्हणजे हे शेअर बाजारात खरेदी आणि विक्री करताना आपल्याला डिस्काउंट देते. तर आज मी तुम्हाला काही ऑनलाईन डिस्काउंट ब्रोकरची माहिती सांगणार आहे.


१) शेअरखान :- ही एक चांगले आणि उत्तम डिस्काउंट ब्रोकिंग साईट आहे. तुम्ही यांच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन डिमॅट अकाउंट बद्दल चौकशी करू शकता. हे शेअरखान डिमॅट अकाउंट उघडण्यासाठी तुमच्याकडे नॉर्मल डॉक्युमेंट्स असणे आवश्यक आहे.


२) अपस्टॉक :- ह्या ट्रेडिंग साइटवर तुम्ही फ्रीमध्ये ऑनलाईन डिमॅट अकाउंट उघडू शकता. यासोबत तुम्हाला एक वर्षासाठी मनीकंट्रोल प्रीमीयम सदस्यता मिळते. यांचा ट्रेडिंग ब्रोकेज हा सुद्धा कमी आहे. अपस्टॉक डिमॅट अकाउंट हे एका दिवसात आपण ओपन करू शकतो.


३) एंजल ब्रोकिंग :- ह्या साइटवर तुम्हाला डिलिव्हरी ट्रेडिंग आणि डिमॅट अकाउंट हे फ्रीमध्ये मिळते. फक्त तुम्हाला इंट्राडे ट्रेडिंग करताना ब्रोकिंग चार्ज द्यावा लागतो. एंजल ब्रोकिंग डिमॅट अकाउंट हे तुम्ही यांच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन उघडू शकता.


४) ५ पैसे :- ह्या ट्रेडिंग साइटवर तुम्हाला डिमॅट अकाउंट फ्रीमध्ये उघडण्याची सुविधा उपलब्ध आहे. ५ पैसे डिस्काउंट ब्रोकरची विशेषता म्हणजे ह्यानी ट्रेडिंग चार्ज हा कमी केला आहे. त्यामुळे हे एक चांगले डिस्काउंट ब्रोकर आहे. ह्या साइटवर प्रीमीयम सपोर्ट उपलब्ध आहे.


५) झेरोडा :- ही सुध्दा एक चांगली डिस्काउंट ब्रोकर ट्रेडिंग साइट आहे. तुम्ही ह्या साइटवर डिमॅट अकाउंट उघडू शकता. यामध्ये ही डिलिव्हरी ट्रेडिंग फ्री आहे फक्त तुम्हाला इंट्राडेचा चार्ज द्यावा लागतो. याव्यतरिक्त तुम्हाला मुचल फंड कमीशनमध्ये चार्ज हा शून्य लागू होतो.


तर हे काही शेअर मार्केट मधील काही चांगले  डिस्काउंट ब्रोकर ट्रेडिंग अँप अथवा साईट आहेत. याद्वारे तुम्ही शेअर बाजारात कमी ब्रोकिंग चार्जमध्ये ट्रेडिंग करू शकता.


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने