ओलामध्ये गाडी लावणे अथवा स्वतः चालवणे ह्या व्यवसायबाबत संपूर्ण माहिती!


सर्वांना नमस्कार,
सार्वजनिक वाहतूकमध्ये ओला ही एक चांगली वाहतूक सुविधा असल्याने ह्या वाहतुकीला जास्त प्रमाणात मागणी आहे. त्यामुळे जर तुम्हालाही यांच्यासोबत आपली गाडी लावून अथवा स्वतः चालवून एक चांगला व्यवसाय सुरू करायचा असेल. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की कशाप्रकारे आपण ओला कंपनीसोबत व्यवसाय सुरू करू शकतो.


यामध्ये ओलाचे चार प्रकार आहेत.
१) ओला सोबत ड्रायव्हर म्हणून काम :- यामध्ये ओला तुम्हाला तुमच्या सोयीनुसार शिफ्ट निवडून काम करण्यासाठी मुभा देते. कंपनीचे कमीशन हे कमी असते आणि एर्निंग ही  चांगली असते. तसेच इतर काही तात्काळ सुविधा उपलबध असतात.
यासाठी डॉक्युमेंट- (१) येलो बेज असलेले ड्रायव्हिंग लायसन्स.
(२) इन्कम टॅक्स कार्ड आणि आधार कार्ड.
(३) चालू किंवा राहत्या घराचा पत्ता.
(४) बँक स्टेटमेंट/पासबुक आणि चेक.
(५) साक्षीदार.


२) ओला मध्ये गाडी अॅटेचमेंट :- या प्रकारात तुम्ही तुमच्या स्वतः च्या मालकीची गाडी ही ओला सोबत अॅटेच करू शकता. यामधे ओला ही तुम्हाला ड्रायव्हर प्रोवाईड करून देते. यासाठी ड्रायव्हरच्या पगार आणि कंपनीचे कमीशन कंपनीला द्यावे लागते.
यासाठी डॉक्युमेंट- (१) गाडीचे आरसी बुक.
(२) गाडीचे परमिट.
(३) गाडीचे इन्शुरन्स.


३) ओलाकडून रेंटवर गाडी :-  या प्रकारात तुम्ही स्वतः ओला कडून गाडी हि रेंटवर घेवून काम करू शकता. या प्रकारात काम करण्यासाठी कंपनीचे वेगळे बेनिफिट आहेत. यासाठी तुम्हाला ओला कंपनीमध्ये काही फी
डीपोजिट करावी लागणार. त्यासाठी आवश्यक असणारे डॉक्युमेंट हे तुम्हाला तुमच्या नजिकच्या ओला ऑफिसमध्ये जमा करावे लागतील.


४) स्वतः ची गाडी ओला सोबत दुसऱ्याला चालवायला देणे :- या प्रकारात तुम्ही स्वतः गाडी ही दुसऱ्याला चालवायला देऊ शकता. यामधे ज्या व्यक्तीला तुम्ही गाडी चालवायला देणार आहेत त्यांच्यावर तुम्ही लक्ष ठेवू शकता आणि दोघेही जर सहमतिने काम करणार असतील तर ही एक चांगली गोष्ट आहे. यासाठी जी काही सहकार्य लागेल ते कंपनीमार्फत तुम्हाला मिळते.


तर अशाप्रकारे तुम्ही ओला ह्या सार्वजनिक वाहतूक सोबत गाडी लावून स्वतः चा व्यवसाय वाढवू शकता.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने