मराठी ब्लॉग आणि सुरुवात?


सर्वांना नमस्कार, 
आज मी तुम्हाला सांगणार आहे की कशाप्रकारे आपण सर्व मराठी मध्ये ब्लॉग लिहून पैसे कशाप्रकारे कमवू शकतो. आता ब्लॉग म्हटले की सगळ्यात आधी तुम्हाला ब्लॉग सुरु करण्यासाठी दोन पर्याय उपलब्ध आहेत. १) वर्डप्रेस २) ब्लॉगर ह्या एका पैकी एक ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करू शकता.


जर तुम्ही ब्लॉगिंगला सुरुवात करत असाल तर तुम्ही आधी सबडोमेन वापरूनच सुरुवात करा आणि एक महत्त्वाचं म्हणजे जो ईमेल आयडी तुम्ही वापरणार असाल तो चालू असायला पाहिजे. आणि तुमच्या ब्लॉगिंग अकाऊंट आणि गुगुल सर्च कन्सोल मधेही हाच ईमेल आयडी वापरा जेणेकरून तुम्हाला भविष्यात ब्लॉगिंग किंवा एडसेन्स संधर्भात कुठलीही समस्या येणार नाही.


ब्लॉगिंग करताना तुमचे ३०-४० पोस्ट पूर्ण लिहून झाले असतील आणि प्रत्येक पोस्टची लांबी ही १०००+ अक्षरे असतील तर तुम्ही गुगल एडसेन्स साठी अपलाय करू शकता. पण एक लक्षात ठेवा अपलाय करताना तुमचे ब्लॉग पोस्ट हे सहा महिने जुने असायला हवे आणि एक प्रीमियम मोबाईल फ्रेंडली टेम्पलेट असायला हवी. त्याचबरोबर अबाऊट एज, कॉन्टॅक्ट एज, प्रायवर्सी पॉलिसी आणि डिस्क्लेमर हे पेज असणे आवश्यक आहे हे पेज नसतील तर तुम्हाला एडसेन्स अप्रुव तर भेटते पण चांस हा १०% इतकाच असतो.


याव्यतरिक्त तुम्हाला कस्टमडोमेन घेण्याची काहीही गरज नाही कारण जर तुमचे पोस्ट हे १००% युनिक असेल आणि कॉपीराइट फ्री असेल तर तुम्हाला एडसेन्स अप्रुव देते. पण तुम्हाला जर सबडोमेन सोबत एडसेन्स अप्रुव नसेल मिळेल तर तुम्ही स्वतः चे कस्टम डोमेन वापरू शकता. एडसेन्स अप्रुव मिळवण्यासाठी आपली साईट ही गुगल सर्च कन्सोल आणि गुगल एनटीलेटिक्स मधे  समाविष्ट करून घ्या त्यामुळे तुम्ही युजर नुसार एडला तयार करू शकता.


दुसरी आणि महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या ब्लॉग पोस्टला अधिक प्रीमियम बनवण्यासाठी किमान एक किंवा दोन फोटोचा वापर नक्की करा. जे पोस्ट असतील त्या संधर्भातील फोटो टाका जेणेकरून ब्लॉग पोस्ट ही थोडी युनिक दिसते. फोटो निवडताना हे डाईरेक्ट गुगलवरून डाऊनलोड करणे टाळा आणि पिक्साबाय, अनस्पलेश इत्यादी वेबसाईट वरून डाऊनलोड करा ह्या वेबसाईटवर १००% कॉपीराईट फ्री फोटोज् उपलब्ध आहेत.


तुम्ही जर १०-१५ पोस्टचे टॉपिक स्वतः तयार केले आणि नंतर जर तुम्हाला काहीच सुचत नसेल तर तुम्ही टॉपिक जनरेटर साईट जसे हबस्पॉट, फॅटी जोई, उबर सजेस्ट आणि ईतर काही टॉपिक जनरेटर साईट गुगलवर उपलब्ध आहेत. तसेच साईटला एसईओ फ्रेंडली बनवण्याकरिता बेटर कीवर्ड जनरेटर चाही वापर करू शकता जसे की कीवर्ड टूल, वर्ड स्ट्रीम, गुगल ट्रेण्ड आणि वर्डट्रॅकर इत्यादी वेबसाईट उपलब्ध आहेत.


तर अशाप्रकारे तुम्ही ब्लॉग सुरु करुन पैसे कमवू शकता पण एक गोष्ट लक्षात ठेवा की एडसेन्स हे तपासत नाही की तुमच्या वेबसाईटवर ट्रॅफिक किती आहे. एडसेन्स चेक करते ते पोस्टची क्वालिटी आणि जर तुम्ही १००% नवीन आणि युनिक पोस्ट ब्लॉगरवर टाकत असाल तर एडसेन्स तुम्हाला लवकरात लवकर अप्रुवल देईल.

6 टिप्पण्या

 1. छान माहीती दिलीत, मराठी कीवर्ड्स शोधन्यासाठी कोणतं टूल वापरतात...

  उत्तर द्याहटवा
  प्रत्युत्तरे
  1. मराठी मध्ये जास्त कीवर्ड उपलब्ध नाही. म्हणून मी सर्व्हे घेऊन लोकांचे मत आधी जाणून घेतो त्यानंतर त्यावर आर्टिकल तयार करतो.

   हटवा
 2. मला ब्लॉग वर कथा लिहायच्या आहेत त्यासाठी योग्य फ्री थीम कुठली असेल?

  उत्तर द्याहटवा
  प्रत्युत्तरे
  1. कथेसाठी तुम्ही काही सिंपल फ्री थीम वापरू शकता. अशा थीम गूगलवर सहज उपलब्ध आहेत.

   हटवा

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने