५ पैसा ऑनलाईन ट्रेडिंग सुविधा आणि संपूर्ण माहिती.


सर्वांना नमस्कार,
सध्याच्या काळात शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणे अधिक सोपे झाले आहे कारण आपण आधी कसे संगणकावर किंवा कुठल्या उपलब्ध असलेल्या उपकरणाद्वारे शेअरची खरेदी आणि विक्री करत होतो. परंतु आता शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक खरेदी आणि विक्री  ही तुम्ही देशाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यंतून करू शकता तेही मोबाईलवर एपच्या माध्यमातून आणि घरबसल्या.


ट्रेडिंग करण्यासाठी आज मी तुम्हाला सांगणार आहे की कशाप्रकारे आपण ५ पैसा एपमधे डेमेट खाते उघडायचे तेही एकदम फ्रीमधे त्यासाठी फक्त तुम्हाला पर ट्रेड फी जी आहे ती द्यावी लागते अकाऊंट हे फ्री असते. डिमॅट खाते उघडण्या करिता तुमच्या कडे आधार कार्ड ( मोबाईल नंबर सोबत लिंक असणे आवश्यक आहे) , इन्कम टॅक्स कार्ड, बँक पासबुक किंवा चेकबुक आणि एका कागदावर स्वतः ची सही हे डॉक्युमेंट आवश्यक लागतात आणि ही संपूर्ण प्रक्रिया ही ऑनलाईन आहे.


सगळ्यात आधी तुम्हाला तुमच्या प्रेफर्ड प्ले स्टोअरवर जाऊन ५ पैसा एप इंस्टॉल करायचे आहे. एप ओपन केल्यावर आधी आपले नाव आणि इतर माहिती भरून नोंदणी प्रक्रियेला सुरुवात करा. नेक्स्त्वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचे इन्कम टॅक्स कार्ड नंबर टाकावा लागतो नंबर टाकल्यानंतर प्रोसेस वर क्लिक करा. मग तुम्हाला तुमची काही वयक्तिक माहिती भरावी लागेल जसे पत्ता, नाव, वय, काम, वार्षिक उत्पन्न इत्यादी.


वयक्तिक माहिती भरल्यानंतर नेक्टवर क्लिक करा मग तुम्हाला तुमचे बँक खात्याची माहिती भरावी लागेल ह्या मध्ये तुम्ही ट्रेडिंग करताना जी बँक देणार आहे त्याच बँकेचे डिटेल्स भरा. मग तुम्हाला  सीगमेंट चुस करावा लागतो १) सर्व २) मेऊचल फंड जर तुम्ही ट्रेडिंग करणार असाल तर १ पर्याय निवडा अथवा मेऊचल फंडमध्ये गुंतवणूक करणार असाल तर २ निवडा. त्यानंतर नेक्स्टवर क्लिक करा.


मग तुम्हाला इन्कम टॅक्स कार्ड हातामध्ये पकडून एक १० सेकंडचा व्हिडिओ तयार करून तो अपलोड करायचा असतो. व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्हाला तुमचे सर्व डॉक्युमेंट हे अपलोड करायचे असतात. आणि लास्ट स्टेप ती म्हणजे ई- साईनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला आपले आधार कार्ड नोंदणीकृत नंबर टाकून  वेरीफाय करून घ्यायचे आहे.


ई- साईन झाल्यावर तुमचे डॉक्युमेंट हे ५ पैसा टीम पडताळणी करून तूम्ही दिलेल्या ईमेल आयडी वर परत टाकतील त्यामध्ये तुम्ही चेक केले असता तुम्हाला दिसेल की सर्व डॉक्युमेंटवर ५ पैसा टीमने शिका मारला आहे. त्यानंतर तुम्हाला तुमच्या इमेल  आयडीवर अभिनंदन म्हणून मेसेज येईल आणि  त्यानंतर तुम्ही ५ पैसा मोबाईल एपवर शेअर मार्केट मध्ये शेअरची खरेदी आणि विक्रीला सुरुवात करू शकता.


तर अशाप्रकारे तुम्ही ५ पैसा डिमॅट खाते उघडून तुम्ही शेअर मार्केटमध्ये सहजरीत्या शेअरची खरेदी आणि विक्री करू शकता तेही कधीही आणि कुठेही.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने