सुरक्षा सोशल मीडियाची.


आजच्या आधुनिक युगात आपण प्रत्येकजण मग ते लहान असेल किंवा मोठे सर्वजण हे मोबाईलवर अॅक्टिव  असतात. प्रत्येकजण हे इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक या सोशलमीडियाचा खूप वापर करतात. इंस्टाग्रामवर लोक फोटो टाकतात आणि आपली चांगली प्रोफाइल तयार करतात. ट्विटरवर लोक पॉलिटिक्स आणि बातम्या याचा आढवा घेतात. फेसबुकवर लोक जगातील कुठल्याही कानाकोपऱ्यतील व्यक्तीशी संवाद साधू शकतात आणि मैत्री करू शकतात.


तुमचे इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक चे अकाउंट सुरक्षित अशाप्रकारे ठेवा. सगळयात आधी तुमच्या सगळ्या सोशलमीडियाच्या अकाउंटला पासवर्ड किंवा पिन लावून पासवर्ड प्रोटेक्टेड करा. जेणकरून तुमच्या सोशलमीडियाच्या एपसला तुमच्या व्यतिरिक्त कोणीही हाताळू शकत नाही.


१) इंस्टाग्राम :- इंस्टाग्रामवर आपण आपले अकाउंट हे प्रायव्हेट ठेवाव जेणेकरून  कुठलीही अनोळखी व्यक्तीने तुम्हाला फॉलो केले तर तुम्हाला आधी समजेल. इंस्टाग्रामवर टू- फॅक्टर सेक्युरिटी एनाबल करा. आपले लाईक आणि फॉलोवर्स वाढिण्याकरिता खूप लोक ही थर्ड पार्टी वेबसाईटची मदत घेतात. पण हे चुकीचे आहे यामुळे तुमचे इंस्टाग्राम अकाउंट हे हॅक होऊ शकते आणि तुमचा इंस्टाग्राम डेटा लीक होऊ शकतो. म्हणून शक्यतो अशा चुका करने टाळा.


२) ट्विटर :- ट्विटरवर ही लोक आपले लाईक आणि फॉलोवर्स वाढिण्याकरिता थर्ड पार्टी वेबसाईटची मदत घेतात. पण ट्विटरची एक लिमिट आहे. जर तुम्ही ती लिमिट क्रॉस केली किंवा काही चुकीचे ट्विट केले तर तुमचे ट्विटर अकाऊंट हे सस्पेंड किंवा बेन होऊ शकते. ट्विटरचे  अकाऊंट प्रायव्हेट करा. ट्विटरवर टू- फॅक्टर सेक्युरिटी एनाबल करा. त्यामुळे तुमचे अकाऊंट हे सुरक्षित राहण्यास मदत होईल.


३) फेसबुक :- जगातील खूप लोक फेसबुकचा वापर करत आहे. पण फेसबुक हाताळताना थोडी काळजी घ्यावी. जसे की, आपल्याला जी लोक ओळखत आहे. त्यांनाच फेसबुक फ्रेंड बनवा. अनोळखीलोकांना जास्त फ्रेंड रिक्वेस्ट पाठवू नका कारण फेसबुक खूप सारे फेक अकाउंट अॅक्टिव आहेत.आपली व्यक्तिगत माहिती ही ही फक्त आपल्या पुरतीच मर्यादित ठेवा जेणकरून आपली माहिती ही सुरक्षित राहील.


या काही सोप्या पद्धतीने आपण आपले सोशलमीडिया अकाउंट हे सुरक्षित ठेवू शकतो. फक्त थोडी काळजी घ्या जेणेकरून तुमचा सर्व सोशलमीडिया डेटा हा सुरक्षित राहील.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने