मुलभूत गरजा ३+२=५ आहेत.

मानवी जीवनाच्या सुरवातीपसूनच आपल्याला आपल्या ३ मूलभूत गरजा माहीत आहे, अन्न वस्त्र आणि निवारा पण सध्याच्या आधुनिक काळात यामध्ये आणखी दोन मूलभूत गरजांच्या त्यामध्ये समावेश झाला आहे.


तर आपल्याला माहीत आहे की मानवाला जगण्यासाठी अन्नची गरज असते कारण माणूस हा जेवण शिवाय जगू शकत नाही . जर मानवाच्या शारिरला काम करण्यासाठी शरीरात ऊर्जा हवी असेल तर त्याला किमान अन्नाचं आहार घ्यावा लागतो कारण जर शरीरात अन्नाचं नसेल तर त्याला अशक्तपणा जाणवेल आणि तो हळूहळू मरण पावेल.


दुसरं म्हणजे वस्त्र मानवी जीवनाच्या सुरवातीला लोकांना वस्त्र काय आहे हे माहीत नव्हते. हळूहळू जंगलात राहणऱ्या लोकांनी झाडंच्या पानची बनवलेले वस्त्र  म्हणून वापरायला लागले. पण आजच्या आधुनिक युगात वस्त्र हे मानवाची दुसरी मोठी गरज बनली आहे.


सुरवातीच्या काळात लोक ही भटकंती करत असत एका जागेवरून दुसऱ्या जागेवर स्तलांतर करीत असत. त्यामुळे लोकांना निवाऱ्याबाबत माहिती नव्हती पण हळूहळू त्यांना आपल्या जागेविषयी आपुलकीची भावना निर्माण झाली. तसेच त्यांना हवामानातील तीन ऋतूची माहिती मिळाली उन्हाळा पावसाळा आणि हिवाळा म्हणून याच्यापासून वाचण्यासाठी निवारा हे मानवाची मुलभूत गरज बनली आहे.


सध्याच्या काळात निवारा हे प्रत्येक माणसाचे स्वप्नं बनले आहे कारण निवारा घेण्यासाठी घराची किंमत गगनाला भिडल्या आहेत त्यामुळे तेदेखील अशक्य झाले आहे. जगात आजही खूप लोक बिना निवाऱ्याचे जगत आहे.


आता येवूया आपल्या मेन मुद्याकडे ४ थी मुलभूत गरज ही शिक्षण आहे शिक्षणाला पूर्ण जगाने ४ थी मुलभूत गरज म्हणून स्वीकारले आहे कारण शिक्षण आजच्या काळाची गरज आहे. आपली युवा पिढी जेवढी शिकेल तेवढा आपला देश प्रगतीपथावर जाईल अनेक देशांमध्ये शिक्षण हे सक्तीचे केले आहे किंवा मोफत केले आहे जेणकरून लोकांना बेसिक गरज भागवता येईल.


पाचवी आणि शेवटची मुलभूत गरज म्हणजे आरोग्य हे प्रत्येक मानवाची मुलभूत गरज आहे. कारण मानस जगलीच नाही तर देश राहील का? त्यामुळे सगळया देशांनी आपल्या आरोग्य सेवेला प्राधान्य दिले आहे जेणकरून कुठल्याही व्यक्तीला आरोग्याच्या बाबतीत समस्या येवू नये. म्हणून प्रत्येक देशाची सरकार जास्त इस्पितळ आणि आरोग्य सेवा पुरवणारे कर्मचारी यांची  भरती करत असते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने