अमेझॉन फ्लेक्स पार्ट टाइम डिलिव्हरी जॉब ऑनलाईन नोंदणी प्रकिया याबद्दल सविस्तर माहिती.


सर्वांना नमस्कार,
आपल्या सर्वांना माहीत आहे की अमेझॉन ही कंपनी ऑनलाईन ऑर्डर लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी कुरिअरचा वापर करते. तुम्ही ही या कुरिअर कंपनीसोबत पार्ट टाईम काम करू शकता. त्यासाठी आज मी तुम्हाला सांगणार आहे की कशाप्रकारे आपण अमेझॉन फ्लेक्स सोबत पार्ट टाइम काम करण्यासाठी ऑनलाईन नोंदणी कशाप्रकारे करू शकतो.


१) सर्वात आधी तुम्हाला अमेझॉन फ्लेक्सच्या अधिकृत वेबसाईटवर भेट द्यावी लागेल. वेबसाईटवर आल्यावर तुम्हाला तुमची काही वयक्तिक माहिती भरावी लागणार उदाहरणार्थ; स्वतः चे नाव, मोबाईल नंबर आणि पत्ता ही माहिती भरल्यानंतर गेट दि एपवर क्लिक करा. त्यानंतर एप डाऊनलोड करून इंस्टॉल करून घ्या.


२) अमेझॉन फ्लेक्स हा डाऊनलोड केल्यानंतर तुम्हाला क्रिएट अकाऊंट किंवा साईन इन असे दोन पर्याय दिसतील. यामधे जर तुम्ही अमेझॉन शॉपिंग ही वेबसाईट आधी वापरली असेल तर त्याच ईमेल आयडी आणि पासवर्ड सोबत साईन इन करा अथवा जर तुम्ही अमेझॉन शॉपिंग वेबसाईटवर याआधी तुमचे खाते नसल्यास क्रिएट अकाऊंटवर क्लिक करून साईन अप करून घ्या.


३) पुढे तुम्हाला तुमचे शहर निवडावे लागणार. शहर निवडल्यानंतर अमेझॉन फ्लेक्सचे तुमच्या समोर काही अटी आणि नियम दिसतील. यामधे तुमचे वय हे १८ च्या वर असायला हवे. तुमच्याकडे टू-व्हीलर आणि ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक आहे. बचत किंवा चालू खाते बँक खाते आणि इन्कम टॅक्स कार्ड असायला हवे. जर तुमच्याकडे सर्व डॉक्युमेंट असतील तर प्रोसेस क्लिक करा.


४) पुढच्या पेजवर तुम्हाला तुमची सर्व माहिती सविस्तरपणे भरावी लागणार यामधे तुमचे नाव, वय, संपूर्ण पता, काम आणि इत्यादी माहितीचा समावेश आहे. ही सविस्तर माहिती भरल्यानंतर एकदा काळजीपूर्वक खात्री करून घ्यावी. त्यानंतर नेक्स्ट पेजसाठी क्लिक करा. पुढे तुम्हाला तुमच्या डॉक्युमेंट विषयी माहिती भरावी लागणार.


५) डॉक्युमेंट पेजवर तुम्हाला सर्वात आधी जीएसटी नंबर टाकावा लागेल यामधे जर तुमच्याकडे जीएसटी नंबर असेल तर 'येस' करून नंबर टाकावा जीएसटी नंबर नसेल तर 'नो' वर क्लिक करा. पुढे तुम्हाला इन्शुरन्सचा पर्याय दिसेल यामधे गाडीचे डॉक्युमेंट विषयी माहिती भरावी. त्यानंतर टॅक्स माहितीमध्ये इन्कम टॅक्स कार्ड नंबर आणि बचत किंवा चालू बँक खाते याचे डॉक्युमेंट सबमिट करावे.


ही सर्व माहिती भरल्यानंतर तुम्हाला काही व्हिडिओ हे तुमच्या डेशबोर्डवर दिसतील हे व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही ज्या स्टेप फाईल केल्या आहेत. तिथे हिरव्या रंगाचे टिकमार्क तुम्हाला दिसतील. याचाच अर्थ की तुमची नोंदणी प्रक्रिया ही पूर्ण झाली आहे आणि तुमचे डॉक्युमेंट हे पडताळणी करण्यासाठी अमेझॉन फ्लेक्स टीमकडे  पोहचले आहेत.


अमेझॉन फ्लेक्सची टीम ही २ ते ३ दिवसांत पडताळणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला मेसेज किंवा ईमेलद्वारे कळवते आणि तुमचे फ्लेक्स खाते हे डिलिव्हरी करण्यासाठी सक्रीय करते. तर अशाप्रकारे तुम्ही अमेझॉन फ्लेक्स सोबत ३ ते ४ तास पार्ट टाइम जॉब करू शकता.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने