लॉकडावून आणि शरीरावर परिणाम? घरातच करा बॉडी मेन्टेन.


सध्या जगभरात लॉकडावून सुरू आहे. लॉकडावूनमुळे जॉब्स आणि उद्योगधंदे बंद आहे. त्यामुळे आपल्या शरीराची होणारी दैनिक कसरत देखील बंद आहे. लॉकडावूनच्या काळात अनेक लोक ही घरीच थांबली आहे व घरी थांबून कशाप्रकारे आपले शरीर हे मेन्टेन ठेवले पाहिजे याचा विचार करीत आहे. त्यांच्यासाठी काही सोप्या एक्सारसाइस आणि काही टिप्स आहेत.

नोट: ह्या एक्सारसाइस आपण घरात करू शकतो. त्यासाठी घराबाहेर जाण्याची गरज भासत नाही.


१) सूर्यनमस्कार रोज सकाळी उठून एकदा तरी सूर्यनमस्कार करावा. सूर्यनमस्कारमधे १२ आसने असतात. सूर्यनमस्कार केल्याने आपल्या शरीरात सकारात्मक ऊर्जा  निर्माण होते.


२) प्राणायाम दिवसातून किमान एकदातरी प्राणायाम करावा जेणेकरून आपली श्वसनसंस्था ही सुरळीत सुरू राहते. जर तुम्ही हार्टचे रुग्ण असाल तर प्राणायाम हे तुमच्यासाठी उतम आसन आहे.


३) सकाळी उठल्यावर योगाची सवय लावा जेणेकरून तुम्ही दिवसभर काम केले नाही तरीसुद्धा तुमच्या शरीरात ही ऊर्जा कायम राहील. जर तुम्ही सुरवातीपसून योगा सुरू करणार असाल तर पहिल्या दिवशी योगा कमी करा. कारण पहिल्या दिवशी जर तुम्ही स्वतःच्या बॉडीवर जास्त स्ट्रेस दिला तर तुम्हाला  दुसऱ्या दिवशी जास्त त्रास सहन करावा लागेल.


४) लॉकडावूनच्या काळात आपण सर्वजण आळशी  झालो आहोत. घरी कुठलेच काम नसल्याने आपण मोबाईल, टीव्ही, संगणक, व्हिडिओगेम इत्यादी. यांचा अतिवापर करतो. त्यामुळे आपल्याला डोळ्यांचे आजार होऊ शकतात. म्हणून शक्यतो या उपकरणाचा अतिवापर टाळावा. जेणेकरून तुमच्या दैंनदीन जीवनावर याचा परिणाम कमी होईल.


५) लॉकडावून दरम्यान फॅट वाढणे हे तर साहजिक गोष्ट आहे. पण त्यावर दुर्लक्ष करू नका.लॉकडावूनच्या काळात आपले खानपान हे व्यवस्थित करा. जेणेकरून तुम्हाला गॅस आणि एसिडीटी यासारख्या समस्या येणार नाही आणि तुमची पचनक्रिया ही सुरळीत सुरू राहील.


६) सतत झोपणे टाळा लॉकडावूनमधे सर्वजण घरी जास्त काम नसल्याने अनेक लोक ही झोपून राहतात. त्यामुळे झोपेचा आजार होऊ शकतो  व दैंनदीन जीवनावर याचा परिणाम होऊ शकतो.


तर अशाप्रकारे तुम्ही या काही महत्त्वाच्या गोष्टी करून आपली जीवनशेली सुरळीत ठेवू शकता. तर घरीच रहा, आपली आणि आपल्या परिवाराच्या  आरोग्याची काळजी घ्या.


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने