फोटो विका आणि पैसे कमवा तेही डॉलरमधे.


पूर्वीच्या काळात  फोटोग्राफी ही फक्त स्टुडिओ पर्यंत मर्यादित होती. लोकांना जर फोटो काढायचा असेल तर स्टुडिओ मध्ये जाऊन फोटो काडवा लागायचा.पण आजच्या आधुनिक युगात बरेच लोकाकडे स्वतःचे कॅमेरे आहेत. त्यामुळे फोटोग्राफीच्या शेत्रात आज जगात अनेक लोकांना नवीन नवीन संधी आणि रोजगारची हमी मिळत आहे.


फोटोग्राफीच्या च्या शेत्रात आज नव्याने निर्माण झालेली संधी महणजे ऑनलाईन फोटोग्राफी. ह्या इंडस्ट्रीमध्ये काम करण्यासाठी तुमच्या कडे कॅमेरा आणि संगणक असणे आवश्यक आहे. तसेच फोटोग्राफी स्किल्स देखील असणे गरजेचे आहे.तर ऑनलाईन फोटोग्राफी म्हणजे आपण स्वतः क्लिक केलेले प्रीमियम फोटो हे एखाद्या कंपनीला विकणे आणि फोटोच्या बदल्यात मोबदला मिळवणे.


तुमच्या कडे वरील दिल्याप्रमाणे जर सर्व साहित्य उपलब्ध असेल आणि फोटोग्राफी स्किल्स असतील तर तुम्ही ऑनलाईन फोटोग्राफीच्या च्या जगात पाऊल ठेवू शकता. आणि एक प्रोफेशनल फोटोग्राफर म्हणून चांगले इन्कम कमवू शकता. त्यासठी पुढे काही उदाहरणे दिलेले आहेत.


१) श्टरस्टॉक फोटोग्राफी :- ह्या वेबसाईट किंवा एप वर भेट देऊन सर्वात आधी आपले नोंदणी करून घ्या. नोंदणी यशस्वीरित्या झाल्यावर आपण आपल्या कॅमेऱ्याने क्लिक केलेले प्रीमियम फोटो हे अपलोड करू शकता. फोटो अपलोड करताना फोटोची माहिती, स्थळ, वेळ, टेग इत्यादी माहिती व्यवस्थित भरा आणि रीव्ह्यू करण्यासाठी आपले फोटो अपलोड करा. त्यानंतर श्टरस्टॉक टीम तुमचे फोटो तपासेल आणि तुम्हाला ईमेलद्वारे तुम्हाला उपडेट देईल. तुमच्या फोटोला परवानगी मिल्यानंतार तुम्ही पेमेंट टॅबवर जाऊन आपल्या पेमेंट बाबत माहिती देऊ शकता.


२) ५०० पी एक्स प्राईम फोटोग्राफी :- ह्या वेबसाईट वर सर्वात आधी आपण भेट देऊन नोंदणी पूर्ण करून घ्या. नोंदणी झाल्यांतर आपले फोटो हे अपलोड करण्यापूर्वी खात्री करा कि आपले फोटोची माहिती आणि कीवर्ड हे बरोबर असणे आवश्यक आहे तसेच फोटो पूर्णपणे ओरीजीनल आणि कॉपीराइट फ्री असावे . फोटो अपलोड झाल्यानंतर तुमचे फोटो हे ५०० पी एक्स प्राईम ची टीम तपासेल. फोटो रीव्ह्यू झाल्यानंतर तुम्हाला कळवण्यात येईल आणि तुम्हाला ५०० पी एक्स प्राईमचे लायसन्स मिळेल. लाईसंस मिल्यावर तुम्ही आपले फोटो हे वेबसाईटला विकू शकता आणि चांगली कमाई करू शकता.


३) समगमग प्रो फोटोग्रफि :- ह्या वेबसाईट वर जाऊन आपण आपली नोंदणी प्रक्रिया पूर्ण करून घ्या. नोंदणी झाल्यानंतर तुमचे फोटो हे वेबसाईट वर अपलोड कण्यासाठी सबमिट करा. सबमिट केलेले फोटो हे ओरिजिनल असायला हवे आणि फोटो हे उत्तम क्विलटी चे असायला हवे. त्यानंतर समगमग प्रो ची टीम तुमचे फोटो तपासून तुम्हाला कळवेल  जर तुमचे फोटो टीम कडून अप्रुव झाले तर तुम्ही ह्या वेबसाईट सोबत काम करून चांगले पैसे कमवू शकता.आ


४) आयस्टॉक फोटोग्राफी :- ह्या वेबसाईट भेट देऊन आपली नोंदणी करून आपली माहिती वेबाईटवर भरा. आपले फोटो चे लूक हे प्रीमियम आणि बेस्ट क्विल्टी असणे आवश्यक आहे. त्यानंतर तुम्ही फोटो हे रीव्ह्यू करण्यासाठी आयस्टॉक टीमला सबमिट करू शकता. परवानगी मिळाल्यानंतर तुम्ही आपली कामाईला सुरवात करू शकता.


५) क्रेसट स्टॉक फोटोग्राफी :- ह्या वेसाईट वर जाऊन तुम्ही नोंदणी प्रक्रिया पूर्ण करून घ्या. एक उत्तम आणि  ओरिजनल क्विलटी फोटोला लवकर अॅप्रुव मिळते. नोंदणी झाल्यावर फोटो सबमिट करा. तुमचे अकाऊंटची पडताळणी झाल्यावर तुम्हाला क्रेसट स्टॉक ची टीम कळवेल. पडताळणी प्रक्रिया पूर्ण झाल्यावर तुम्हाला  क्रेसट स्टॉक करून लायसन्स दिले जाईल. त्यानंतर तुम्ही फोटो विकून पैसे कमवू शकता.


फोटोग्राफीच्या जगात पाऊल ठेवताना थोडी दक्षता बाळगा जेणेकरून तुमचे अकाउंट हे लवकर अप्रुव् होईल आणि तुमचे काम हे लोकापर्यंत पोहचून तुमची कमाईला सुरुवात होईल. आणखी एक गोष्ट ती म्हणजे वरील सर्व वेबसाईट वर कॉपीराट फ्री फोटो अपलोड करा अन्यथा तुमचे अकाउंट हे बंध होऊ शकते. म्हणजे काही टाकलं ते १०० टक्के ओरिजनल आणि तुम्ही स्वतः कॅमाऱ्याने क्लिक केलेले हवे.


तर अशाप्रकारे तुम्ही फोटोग्राफीचा दून्येत आपले स्वतःचे फोटो टाकून चांगले प्रॉफिट कमवू शकता आणि आपली कला ही लोकं पर्यंत पोहचवू शकता .


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने