गती बदलत्या जीवनाची.

पूर्वीच्या काळी मानवांना वेगा बाबत फार माहिती नव्हती. कुठलेही वाहन नसल्याने मानव पायी प्रवास करत होता त्यामुळे सर्व कामे आणि जीवन हे आरमाने चालले होते. हळूहळू  जगाची प्रगती होऊ लागली आणि या जगात आज वेगाला लोक जास्त प्राधान्य देताना दिसत आहे.


 आजच्या आधुनिक युगात मानवांना सगळया गोष्टी या वेगाने व्हाव्यात असे वाटते. परंतू जास्त वेग हा मृत्तूच कारण देखील होऊ शकतो. जगात आज प्रत्येक माणूस हा प्रवास करण्यासाठी वाहनांवर अवलंबून आहे. याचाच अर्थ वेग हा सर्वत्र सक्रीय आहे.


१) बाइकचा आणि कारचा वेग वाढिण्यासाठी अनेक कंपनी खूप उच्च तंत्रण्याचा वापर करत आहे. तसेच खूप खर्च करून या तंत्रज्ञानाचा वापर स्पर्धांमध्ये सहभाग घेण्यासाठी करत आहे. F १ सारख्या कितीतरी रेस स्पर्धा जगात सुरू आहे. या स्पर्धांमध्ये रेस टीम आणि ड्रायव्हर हे सर्वात वेगाने गाडी चालवतात. यामध्ये ३५० किमी ताशी वेगाने गाडी चालवणे हे खूप अवघड काम असते. एका मशिनला तिच्या उच्च श्रमतेपर्यंत गती वाढवणे ही त्या मशिनची परीक्षा देखील असू शकते.


२)आंतररष्ट्रीय किंवा देशांतर्गत वाहतूक  करण्यासाठी तसेच  कुरियर नेण्यासाठी विमान हे खूप वेगवान वाहन आहे. विमान हे तुम्हाला ६५० ते ७५० किमी ताशी वेगाने तुम्हाला तुमच्या डेसटिनेशन पर्यंत पोहचवतो. हा वेग इतर वाहनाच्या तुलनेत खूप जास्त आहे. विमान हे  एकमात्र असे वाहन आहे जे आकाराने खूप मोठे आहे आणि हवेत खूप गतिशिल आहे.


३) वेगाच्या दुण्येत ट्रेन देखील जास्त मागे नाही. ट्रेन मध्ये ही रोज वेगवेगळे गतीचे प्रयोग होत असतात. ट्रेनची गती वाढिण्याकरिता बुलेट ट्रेन, हायपर स्पीड ट्रेन यासरख्या विविध प्रकल्प वेगवेगळ्या देशाचे सरकार हाती घेत असते. त्यामुळे दैनदिन मानवी जीवन हे अधिक वेगवान होऊ लागले आहे. आता आपल्या जीवनात मंगलेव आणि हायपर लूप वन या दोन नवीन वेगवान ट्रेन लवकरात लवकर दाखल होणार आहे.


४) आंतररष्ट्रीय आणि देशांतर्गत व्यापाराला चालना देण्यासाठी मानवाने समुद्रामध्ये वेग वाढविला आहे. जगात आज जहाज हे व्यपार करण्यासाठी चांगले साधन बनले आहे. समुद्राच्या पाण्यात जहाजची गती निर्माण करून आणि जहाजाला अधिक वेगवान बनवून कचा माल हा एका देशांतून दुसऱ्या देशात आयात निर्यात करणे सोपे झाले आहे.


आज या पृथ्वीवर वेगाबाबत रोज नवीन नवीन प्रयोग आणि तंत्रज्ञान विकसित होत आहे.  जेणकरून मानवी जीवनामध्ये गती येईल आणि मानवी जीवन हे अधिक वेगवान होईल. पण आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की गतीचा जेवढा आपण चांगला वापर करू तेवढी गती  आपल्या सोबत राहील. अन्यथा जर गतीचा मर्यादेपेक्षा अधिक वापर केला तर मानवी जीवनामध्ये गती कमी होत जाईल.


त्यामुळे गतीचा आदर करा प्रतेक त्या मशीनचा आदर करा त्यामध्ये गती आहे आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मधील वाहनाचा आदर करा. या गोष्टी लक्षात ठेवल्या तर मानवी जीवनात गती ही अमर्याद राहील.


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने