विदेशात नोकरी करायची? मग हे नक्की वाचा.


सध्या जगात अनेक देशांमध्ये बेरोजगारीचे प्रमाण हे खूप वाढले आहेत. स्वतःच्या देशात नोकरीची संधी उपलब्ध नसल्याने अनेक लोक ही विदेशात नोकरी करण्यासाठी स्थलांतर करत आहे.  विदेशात चांगली  नोकरी आणि चांगला पगार याचा आमिष दाखवून एजेंट हे लोकांना फसवत आहे. त्यामुळे अशा एजेंटच्या संपर्कात न येता स्वतः नोकरी मिळवण्याचे प्रयत्न करा.


सगळ्यात आधी तुम्हाला कुठली नोकरी करायची आहे आणि कुठल्या देशात करायची आहे हे ठरवा. जेणेकरून तुमच्या मनातला गोंधळ कमी होईल. ज्या देशात नोकरी करायची आहे त्या देशाची माहिती जमा करा आणि त्यावर थोड संशोधन करा. जसे की, तेथील राहणीमान, सोयीसुविधा, देशाची सुरक्षा व्यवस्था, देशाचे बेसिक नियम आणि कायदे इत्यातदी.


डॉक्युमेंट्स हे  सगळे व्यवस्थित असणे गरजेचे आहे. कारण जी फोरेन कंपनी तुम्हाला जॉबसाठी आमंत्रण देईल, तिच्या मार्गर्शनाप्रमाणे आपल्याला डॉक्युमेंट्स तयार ठेवावे लागतात. विदेशात नोकरी करण्यासाठी तुम्हाला नोकरी व्हिसा साठी अपलाय करावा लागेल. कारण जो पर्यंत तुमचा जॉब व्हिसा मर्यादित असेल तोपर्यंत तुम्ही त्या देशात काम करू शकता अन्यथा व्हिसा रीन्यू केला नाही तर तुम्हाला देश सोडावा लागेल.


तुम्ही विदेशात नोकरी करण्यासाठी पोहचला असाल तर तुम्ही ज्या देशाचे नागरिक आहे त्या देशाच्या दूतावास मध्ये जावून आपली नोंदणी आवश्यक करावी. जेणकरून तुम्ही कुठल्या तरी परिस्तिथीत अडकला असाल तर दूतावास तुम्हाला थोडीफार मदत करू शकते.


आपण विदेशात नोकरी करण्यासाठी आलो आहोत हे सदानकदा लक्षात ठेवा. तुमच्या काही चुकीमुळे त्या देशातील नियम आणि कायदे याचे उल्लंगण होणार नाही याची काळजी घ्या. काही देशाचे नियम आणि कायदे हे खूप कठोर आहेत जर तुम्ही गुन्हा केला तर तुम्हाला शिक्षा देखील होऊ शकते.  काहीही काम करण्यापूर्वी त्याबाबत माहिती मिळवा जेणेकरून तुम्हाला जास्त त्रास होणार नाही.


विदेशात नोकरी करत असताना तुमच्यासोबत धोका देखील होऊ शकतो. म्हणून कुठलेही काम तुम्ही निवडले असेल त्याबत खात्री नक्की करून घ्या. संबधित कंपनीची माहिती मिळवा मेडिकल, इन्शुरन्स, बोनस, पीएफ, इत्यादी सुविधा असलेली नोकरी निवडा जेणेकरून तुम्ही जास्त काळ काम करू शकता.


तर या काही गोष्टी तुम्ही विदेशात नोकरी करण्यासाठी गेल्यावर नक्की लक्षात ठेवा. नियम आणि कायदे पाळा सुरक्षितरा रहा.


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने