२०,००० रुपयांच्या गुंतवणूकमधे सुरू करा हे प्रॉफिटेबल व्यवसाय.


१) चहाची टपरी :- चहाची टपरी एक उत्तम व्यवसाय आहे जो फक्त १०,०००  रुपयांची गुंतवणूक करून सुरू करता येईल. या व्यवसायात तुम्हाला फक्त बीएमसी च्या जागेचा टॅक्स भरावा लागेल. फक्त एक लक्षात ठेवा की हा व्यवसाय तुम्ही अश्या ठिकाणी करा जिथे कर्मचारी शेत्र असेल जेणेकरून तुम्हाला दिवसभर ग्राहक मिळत राहतील.


२) पेपर स्टॉल :- पेपर स्टॉलला पार्ट टाईम जॉब म्हणून आपण सकाळी तीन ते चार तास काम करू शकतो कारण या व्यवसायात तुम्हाला १०,००० च्या आत गुंतवणूक करावी लागते आणि पेपरच्या वेगववेग्याळा व्हरायटी असतात. म्हणून फक्त चार तास काम केले तरी आपल्याला चांगले प्रॉफिट होहू शकते.


३) ब्रेकफास्ट फूड :- ब्रेकफास्ट स्टॉल मध्ये आपण पोहा, इडली, डोसा, शिरा, उपमा, साबुदाणा खिचडी आणि इत्यादी. सकाळी पार्ट टाईम काम करुन आपण चांगले प्रॉफिट कमवू शकतो. फक्त तुम्हाला एक रहदारीचा शेत्र शोधावा लागेल उदाहरणार्थ; रेल्वे स्टेशन, मॉल, गार्डन, बस स्थानक आणि इत्यादी. या कामात तुम्हाला किमान १५,००० ते २०,००० ची गुंतवणूक करावी लागेल.


४) फ्रँकी स्टॉल :- फ्रँकी स्टॉल आतापर्यंत सर्वात गजबजलेला व्यवसाय पैकी एक आहे. जर तुम्ही या व्यवसायात गुंतवणूक केली तर तुमचा प्रॉफिट हे १० पट्टीने वाढेल कारण सध्याच्या आधुनिक काळात नवीन पिढी ही जास्त जंकफूडला प्राधान्य देताना दिसत आहे. सुरवातीला तुम्ही स्वतः हा व्यवसाय सुरू करा नंतर जर तुम्हाला वाटत असेल की ग्राहक जास्त येत आहे तर तुम्ही कर्मचारी ठेवू शकतात. या व्यवसायासाठी तुम्हाला किमान १५,००० ते २०,००० रुपयांची गुतवणूक लागेल.


५) वडापाव गाडी :- वडापाव तुम्हा सगळ्यांना माहित आहे. मुंबईत आणि महाराष्ट्रात वडापावला जास्त मागणी आहे तुम्ही हा व्यवसाय तुमचा जॉब झाल्यावर सायंकाळी पार्ट टाईम करू शकता. वडापावला जास्त मागणी ही रहदारीच्या शेत्रात असते. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला किमान १०,००० ते१५,००० रुपयांची रक्कम लागेल.


६) लिंबूपाणी किंवा जुस स्टॉल :- लिंबूपाणी किंवा जुस  या व्यवसायाला सगळया ऋतुमध्ये मागणी असते विशेषतः उन्हाळ्यात सगळ्यात जास्त मागणी असते. रेल्वे स्टेशन, बस स्थानक आणि इत्यादी गर्दीच्या ठिकाणी हा व्यवसाय खूप प्रॉफिटेबल असताना दिसत आहे. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला किमान १०,००० ते १२,००० रुपयांची गुंतवणूक करावी लागेल.


७) अंडापाव आणि भुर्जीपाव :- अंडापाव आणि भुर्जीपाव हा व्यवसाय तुम्ही सायंकाळी किंवा रात्री पार्ट टाईम करू शकता. हा व्यवसाय करण्यासाठी तुम्हाला किमान १०,००० ते १५,००० रुपयांची रक्कम लागेल. गर्दीच्या किंवा रहदारीच्या ठिकाणी हा व्यवसाय खूप यशस्वी ठरताना दिसून येत आहे.


८) चायनीज फूड स्टॉल :- चायनीज फूड स्टॉल हा फ्रँकी सारखाच गजबजेल्या व्यवसाय पैकी एक उत्तम व्यवसाय आहे. यामध्ये तुम्ही मंचुरियन , चायनीज भेळ, चायनीज नुडल्स, सूप इत्यादी पदार्थ विकू शकता या सर्व पदार्थांना जास्त मागणी आहे. तुम्ही हा व्यवसाय पार्ट टाइम किंवा फुल टाईम करू शकता. या व्यवसायासाठी किमान १५,००० ते २०,००० रुपयांची गुंतवणूक करावी लागेल.


९) इन्मोटिशन ज्वेलरी :- इन्मोटिशन ज्वेलरी हा व्यवसाय तुम्ही डायरेक्ट कंपन्यांकडून माल विकत घेऊन विकू शकता किंवा कंपनीला विकू शकता. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला किमान १०,००० ते १५,००० रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. हा व्यवसाय तुम्ही फुलं टाईम किंवा पार्ट टाइम करू शकता.


१०) मेनबती किंवा अगरबती :-  मेनबती किंवा अगरबती हा व्यवसाय तुम्ही घरबसल्या पार्ट टाइम किंवा फुल टाईम करू शकता. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला  किमान १०,००० रुपयांची  रक्कम गुंतवणूक करावी लागेल. हा व्यवसाय तुम्ही डायरेक्ट कंपनीला विकून करू शकतात किंवा स्वतः विकू शकता.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने