शेअर मार्केट गुंतवणूक करण्यासाठी उत्तम पर्याय.

आज जगात शेअर बाजारात गुंतवणूक करून किती तरी लोक श्रीमंत झाली आहे. शेअर बाजार  हे एक प्रकारचे बाजारच आहे. आपण कसे बाजारात गेल्यावर वस्तू विकत घेतो त्याचप्रमाणे शेअर बाजारमध्ये देखील व खरेदी विक्री केली जाते. ही खरेदी विक्री आपण एखाद्या कंपनीचे शेअर विकून किंवा विकत घेऊन करतो. 


तुम्ही देखील ह्या शेअर बाजारात गुंतवणूक करून चांगले पैसे कमवू शकता. पण त्यासाठी तुम्हाला शेअर बाजाराचे नॉलेजअसणे आवश्यक आहे. जर तुम्हाला शेअर बाजाराविषयी प्रोपर नॉलेज असेल तर तुम्हाला या शेअर बाजारात चांगलेच यश मिळेल.


१) शिक्षण :- कुठलेही काम करण्यापूर्वी आपल्याला त्या बाबत माहिती असणे गरजेचे असते. जर आपल्याला त्या गोष्टीबाबत माहीतच नसेल तर आपन त्या कामामध्ये अपयशी होऊ. त्यामुळे शेअर बाजारच्या दुन्येत गुंतवणूक करण्यापूर्वी शेअर बाजारचे नॉलेज नक्की घ्या.


२) डीमेट अकाउंट :- शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला डीमेट अकाउंट ओपन करायला लागेल. डीमेट अकाउंट हे कुठल्याही बँकेत तुम्ही सहजरीत्या उगडू शकता. डीमेट अकाउंट उगडण्या साठी तुम्हाला आवश्यक त्या कागदपत्रांची गरज भासेल. तसेच हे अकाउंट तुम्ही ऑनलाईन देखील उघडू शकता.

नोट: डीमेट अकाउंट तुम्ही मोफत मध्ये उगडु शकता पण तुम्हाला वार्षिक मेन्टेनेस फी भरावी लागते. आणि ट्रेडिंग चार्ज हा वेगळा असतो.


३)ट्रेडिंग :- जर तुम्ही चांगल्या प्रकारे शेअर बाजाराचे नॉलेज मिळवले असेल तर तुम्ही प्रत्यक्ष ट्रेडिंगला सुरुवात करू शकता. अन्यथा तुम्ही दलाल ठेवून त्यामार्फत देखील ट्रेडिंग करू शकता. 

 

४) ट्रेडिंगचे प्रकार :- (१) इंट्राडे ट्रेडिंग- या ट्रेडिंग प्रकारा मध्ये तुम्ही जर आज शेअर विकत घेतले तर तुम्हाला आजच शेअर बाजार बंद होण्याअगोदर शेअर विकायला लागतील. अन्यथा तुमची ट्रेडिंग केनसल केली जाते. (२) डिलिव्हरी- या ट्रेडिंग प्रकारात तुम्ही शेअरची मुदत संपेपर्यंत ट्रेडिंग करू शकता.

(३) स्विंग ट्रेडिंग- या ट्रेडिंग प्रकारात तुम्ही १० ते १५ दिवस शेअर बाजारात शेअरची ट्रेडिंग करू शकता.

(४) पसेशनल ट्रेडिंग- या ट्रेडिंग प्रकारात तुम्ही आपल्या मर्जी प्रमणे किती ही वर्षे शेअर ची ट्रेडिंग करू शकता.

(५) दलाल- दलाल हा तुम्हाला सल्ला देण्याचे काम करतो आणि त्याबदल्यात थोडी रक्कम कमिशनच्या स्वरूपात घेतो. उदाहरणार्थ; जर तुम्ही २०० रुपयांचे ५ शेअर विकत घेतले म्हणजे १००० रुपयांचे शेअर तुम्ही खरेदी केले. आणि काही दिवसांनी त्या शेअरची किंमत ही २०५ रुपये प्रति शेअर झाले असता म्हणजे २०५ ×५ = १०२५ रुपये त्याची किंमत झाली असता. तुम्हाला शेअर विकायची इच्छा झाली तर तुम्हाला त्या प्रॉफिट मधून काही रक्कम ही दलालला द्यावी लागेल.


शेअर बाजार हे एक व्यवसाय सारखे आहे. जो व्यक्ती ह्या मधे नॉलेज लावून आणि संयम पाळून गुंतवणूक करतो तो ह्या इंडस्ट्री मध्ये खूप पैसा कमवू शकतो. तुम्ही जेवढा पैसा यामध्ये लावाल आणि जेवढी मोठी गुंतवणूक कराल तेवढे मोठे यश तुमच्या हाती लागेल.


शेअर बाजाराविषयी माहिती ही इंटरनेट वर सहज रित्या उपलब आहे. तसेच शेअर बाजारातविषयी पुस्तके देखील मार्केट मध्ये उपलब्ध आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने