पेयूमनी सोबत मर्चंट नोंदणी करून ऑनलाईन किंवा ऑफलाईन पैशाचे व्यवहार कसे स्वीकारावे? याबाबत सविस्तर माहिती!


सर्वांना नमस्कार,
ऑनलाईन पेमेंटला आज जगात सर्वलोक भरभरून प्रतिसाद देत आहे. कारण ऑनलाईन पेमेंटमुळे आपल्याला सोबत कॅश ठेवण्याची गरज भासत नाही. तसेच ऑनलाईन पेमेंट माध्यम हे २४×७, जलद, सुरक्षित आणि इतर सुविधासोबत काम करते.


जर तुम्हाला तुमचा ऑनलाईन किंवा ऑफलाईन व्यवसाय सुरू करायचा असेल किंवा व्यवसाय सुरू असेल. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की कशाप्रकारे आपण पेयूमनी हे पेमेंट गेटवे वापरून ऑनलाईन किंवा ऑफलाईन पैशाचे व्यवहार स्वीकारू शकतो.


१) सर्वात आधी तुम्हाला पेयूमनीच्या अधिकृत वेबसाईटवर भेट देऊन साईनअप करावे लागणार. साईनअप केल्यानंतर तुम्हाला तुमची जनरल माहिती भरावी लागते उदाहरणार्थ; मोबाईल नंबर, ईमेल आयडी, नाव आणि पत्ता. हि माहिती भरल्यांतर नेक्सटवर क्लिक करा.


२) त्यानंतर तुम्हाला तुमच्या व्यवसाय  संबधित माहिती भरावी लागणार जर तुमचा व्यवसाय हा ऑनलाईन असेल तर ई- कॉमर्स निवडा अथवा ऑफलाईन रिटेलर निवडा. जर तुम्ही स्वतः व्यवसाय चालवत असाल तर इंडुविसल निवडा अथवा पार्टरशिप किंवा कंपनी निवडा. पुढे तुमच्या व्यवसायाची कॅटेगरी आणि व्यवसायाचा पत्ता टाकावा आणि सबमिटवर क्लिक करा.


३) पुढच्या पेजवर तुम्हाला तुमच्या स्वतः चे किंवा कंपनी असेल तर कंपनीचे इन्कम टॅक्स कार्ड नंबरचे संपूर्ण नाव आणि इन्कम टॅक्स कार्ड नंबर टाकावा लागणार. सेम टू सेम इन्कम टॅक्स कार्ड माहिती भरावी जेणेकरून पेयूमनीची टीम डॉक्युमेंट पडताळणी करून लवकरात लवकर अप्रुव देऊ शकते. माहिती भरल्यानंतर पुढच्या पेजवर क्लिक करा.


४) आता तुम्हाला तुमच्या बँक खात्या विषयी माहिती भरावी लागणार. पण ह्यामध्ये जे तुम्ही इन्कम टॅक्स कार्डवर नाव टाकले होते त्याच नावाने तुमचे बँक खाते असायला हवे. उदाहरणार्थ; जर तुम्ही स्वतः चे इन्कम टॅक्स कार्ड असेल तर त्याच नावाने बँक खाते असायला हवे आणि जर तुमचे कंपनीचे इन्कम टॅक्स कार्ड असेल तर तुम्हाला कंपनीच्या नावाने बँक खाते असायला पाहिजे.


५) त्यानंतर तुम्हाला तुमच्या वेबसाईट किंवा दुकानाविषयी लिंक अथवा माहिती भरावी लागणार. पुढे तुम्हाला साईन परवानगी म्हणजे (अथॉरिटी), जे प्रॉडक्ट तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन विकता, संपर्क पत्ता आणि फोन तसेच नियम व अटी इत्यादी. माहिती भरून सबमिटवर क्लिक करा. मग  तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट सबमिट करावे लागतील.


६) डॉक्युमेंटमध्ये तुम्हाला (१)इन्कम टॅक्स कार्ड. (२)अड्रेस प्रूफ मध्ये आधार कार्ड, पासपोर्ट, रेशन कार्ड किंवा वीजबिल इत्यादी. (३) बँक खाते माहिती केंसल चेक, पासबुक, बँक स्टेटमेंट. (४) ई-साईन साठी मोबाईल नोंदणीकृत आधार कार्ड. (५) सर्वात लास्ट सर्व्हिस अग्रीमेंट. ही माहिती भरल्यानंतर ई-साईन साठी क्लिक करा.


७) ई-साईनच्या पेजवर आल्यानंतर तुमच्या नोंदणीकृत आधार कार्ड मोबाईल नंबरवर एसएमएस येईल. तो नंबर टाकल्यानंतर अभिनंदन तुमचे खाते हे सक्रीय करण्यासाठी आणि तुमच्या डॉक्युमेंटची पडताळणी झाल्यावर ७२ तासाच्या आत तुमचे खाते हे व्यवहार स्वीकारन्यासाठी सक्रीय केले जाईल. असा मेसेज तुम्हाला तुमच्या पेयूमनी डेशबोर्डवर दिसेल.


ह्यानंतर ७२ तासांनी तुमचे डॉक्युमेंट
पेयूमनीने अप्रुव केल्यानंतर तुमच्या डेशबोर्डवर तुम्हाला तुमचा मर्चंट आयडी आणि एपीआय की दिसेल. एपीआय की तुम्ही तुमच्या वेबसाईटवर ऑनलाईन पद्धतीने पेमेंट स्वीकारण्यासाठी लावू शकता तसेच तुम्हाला ऑफलाईन पेमेंट
स्वीकारण्यासाठी स्टोअर कोड दिला जातो.


जर एखाद्या ग्राहकांनी ऑनलाईन पेमेंट केला असता ३ दिवसाच्या आत तुमच्या नोंदणीकृत बँकेत पेमेंट जमा केला जातो. तर अशाप्रकारे तुम्ही तुमच्या ऑफलाईन किंवा ऑनलाईन व्यवसायाला चालना देण्यासाठी पेयूमनी या पेमेंट गेटवेचा वापर करू शकता आणि पेमेंट स्वीकारू शकता.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने