अमेझॉन अफिलाईट मार्केटिंग संपूर्ण माहिती आणि नोंदणी प्रक्रिया.


सर्वांना नमस्कार,
आपल्या सर्वांना माहीत आहे की अमेझॉन हे एक ऑनलाईन शॉपिंग पोर्टल आहे. पण त्याचबरोबर अमेझॉन
तुम्हाला वेबसाईट मार्केटिंग करण्याची संधी देते. म्हणजे जे अमेझॉनचे प्रॉडक्ट आहे ते तुम्ही स्वतः च्या वेबसाईटवर लावले असता त्या प्रॉडक्ट्सच्या मोबदल्यात अमेझॉन तुम्हाला पैसे देते.


यामध्ये जर तुम्ही अमेझॉनचे एक वस्तू उदाहरणार्थ; कपडे ही वस्तू तुम्ही तुमच्या वेबसाईटवर लावली आणि जर एखाद्या ग्राहकांनी ती वस्तू तुमच्या वेबसाईटवरून पाहून विकत घेतली तर तुम्हाला त्या वस्तूच्या बदल्यात अमेझॉन पैसे कमवायची संधी देते. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की कशाप्रकारे आपण अमेझॉन अफिलाईट मार्केटिंग सोबत नोंदणी करून पैसे कमवू शकतो.


सुरुवातीला तुम्हाला अमेझॉन अफिलाईट मार्केटिंगच्या अधिकृत वेबसाईटवर जायचे आहे. वेबसाईटवर आल्यावर तुम्हाला दोन पर्याय दिसतील (१) साइन इन (२) साइन अप.
तर तुम्ही आधीपासून जर अमेझॉन एप हा वापरत असाल तर तुम्हाला त्याच ईमेल आयडी आणि पासवर्ड
सोबत साइन इन करा.


अथवा जर तुम्ही याआधी जर अमेझॉन एप वापरले नसेल तर तुम्ही साइन अप करून घ्या. साइन इन किंवा साइन अप केल्यानंतर तुमच्या समोर एक क्रिएट अकाऊंट म्हणून डेशबोर्ड दिसेल. त्यामध्ये तुम्हाला तुमची वयक्तिक माहिती भरायची आहे. उदाहरणार्थ; नाव, राहता पत्ता आणि इतर अन्य माहिती.


माहिती भरल्यानंतर तुम्हाला यूएस टॅक्स पर्सन आहे की नाही हे विचारणार. जर तुम्ही यूएस नागरिक असाल तर तुम्हाला 'येस' करावे लागणार अथवा जर तुम्ही यूएस नागरिक नसाल तर तुम्हाला 'नो' करावे लागणार. ही माहिती भरल्यानंतर नेक्सटवर क्लिक करा.


पुढच्या पेजवर आल्यावर तुम्हाला तुमची वेबसाईट किंवा एप याचे नाव आणि यूआरएल भरावे लागणार. यूआरएल टाकल्यानंतर प्रोसेसवर क्लिक करा. नेक्स्ट पेजवर तुम्हाला तुमच्या वेबसाईट बद्दल माहिती सबमिट करावी लागेल. उदाहरणार्थ; वेबसाईट कुठल्या टॉपिकवर आहे आणि वेबसाईटची कॅटेगरी.


त्यानंतर तुम्हाला तुमच्या वेबसाईटवर कुठल्या प्रकारची जाहिराती करायची आहे त्याची कॅटेगरी निवडावी लागेल. तसेच अन्य इतर काही माहिती भरावी लागेल. त्यानंतर तुम्हाला कंपनीचे अग्रीमेंट वाचून त्यावर क्लिक करायचे आहे आणि फिनिशवर क्लिक करायचे आहे.


त्यानंतर तुम्हाला डेशबोर्डवर अभिनंदन असा मेसेज दिसेल. त्यामध्ये तुम्हाला तुमची अमेझॉन अफिलाईटची आयडी दिसेल आणि त्याच्या खाली काही सूचना दिल्या असतील जसे; १८० दिवसात तुमच्या आयडीवरून किमान ३ प्रॉडक्ट सेल झाले पाहिजे, तुम्हाला २४ तास अमेझॉन अफिलाईटची सुविधा असेल.


सर्वात लास्ट स्टेप तुम्हाला पेमेंट आणि टॅक्स बाबत माहिती भरावी लागणार. नाऊवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमची सक्रीय बँक खाते माहिती आणि इन्कम टॅक्स कार्ड नंबर टाकावा लागतो. पेमेंट कन्फर्म केल्यानंतर जर तुम्ही किमान १०००+ रुपये जमा केले असतील तर ती रक्कम एनईफटी द्वारे तुमच्या खात्यात जमा केली जाते.


संपूर्ण माहिती सबमिट केल्यानंतर तुम्ही तुमच्या अमेझॉन अफिलाईट सेंट्रलवर लॉगिन करा. डेशबोर्डवर तुम्हाला प्रॉडक्ट दिसतील किंवा तुम्ही स्वतः तुमच्या मर्जी प्रमाणे प्रॉडक्ट निवडू शकता. प्रॉडक्टवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला कुठला फॉरमॅट हवा आहे तो निवडा उदाहरणार्थ; एचटीएमएल कोड, डायरेक्ट लिंक इत्यादी पर्याय उपलब्ध आहेत.


ज्या प्रॉडक्टचे कोड अथवा डायरेक्ट लिंक तुम्ही घेतले आहे ते तुमच्या ब्लॉगर किंवा वर्डप्रेस च्या एचटीएमएल मध्ये संपादित करा. कोड संपादित केल्यानंतर तुमच्या वेबसाईटवर जाऊन प्रॉडक्ट दिसत आहे की नाही याची खात्री करून घ्या. जर प्रॉडक्ट दिसत नसतील तर तुम्ही अमेझॉन हेल्प सेंटर मध्ये जाऊन समस्याचे निराकरण करू शकता.


तर अशाप्रकारे तुम्ही अमेझॉन अफिलाईट मार्केटिंगच्या माध्यमातून सरळ आणि सोप्या प्रकारे पैसे कमवू शकता.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने