शेअर बाजारात प्राइज एर्निंग रेशीओ का आहे महत्वाचे?


सर्वांना नमस्कार,
आपल्या सर्वांना माहीत आहे की शेअर बाजारात ट्रेडिंग ही आपल्या पैशाची गुंतवणूक लागलेली असते आणि ट्रेडिंग करताना आपण हे काम खूप जपून करतो. उदाहरणार्थ:, कँडल, रिसर्च, शेअरची आधीची हिस्टरी आणि बरेच काही पण या सर्वात आपण एक महत्त्वाची गोष्ट विसरतो ती म्हणजे प्राइज एर्निंग रेशीओ.


तर आज मी तुम्हाला सांगणार आहे प्राइज एर्निंग रेशीओ काय आहे आणि हे का महत्त्वाचे आहे. तर आपण जेव्हाही शेअर बाजारात ट्रेडिंग करतो तेव्हा आपल्याला शेअरचा जास्त अंदाज नसतो म्हणजे शेअरचा भाव कधी वर चढेल आणि कधी खाली पडेल.


भविष्यात जर काही करनात्सव शेअर बाजारात मंदी आली तर तुम्हाला त्या हिशोबाने ट्रेडिंग करता यावी म्हणून प्राइज एर्निंग रेशीओ महतावचे समजले जाते. तर भारतीय शेअर बाजार हा दोन भागात आहे एक निफ्टी आणि दुसरे संसेक्स हे तुम्हाला माहीत आहे पण याचा प्राइज एर्निंग रेशीओ हा १० ते ३० च्या सुमारास असतो.


जेव्हा याचा प्राइज एर्निंग रेशीओ हा १० ते १५ असतो तेव्हा शेअर बाजारात ही तेजी असते आणि गुंतवणूक करण्यासाठी चांगले अनकुल परिस्तिथी असते. मात्र याउलट जर प्राइज एर्निंग रेशीओ हा २५ ते ३० ह्या रेंजमधे गेला असता ह्या काळात गुंतवणूक ही अतिशय काळजीपूर्वक करायची असते. कारण ह्या काळात शेअर बाजार हा खूप जोरात खाली पडायची संभावना असते.


उधहरणार्थ:, जर तुम्ही प्राइज एर्निंग रेशीओ हा १० ते २० असेल तर १० रुपयांमागे तुम्हाला १ रूपया मिळतो म्हणजे १०% परतावा पण प्राइज एर्निंग रेशीओ हा जर २० ते ३० दरम्यान असेल तर तुम्हाला ३० रुपयांमागे हा १ रुपया मिळतो.


आता तुमच्या मनात प्रश्न पडला असेल की प्राइज एर्निंग रेशीओ हा कसा तपासावा आणि कधी काळजीपूर्वक गुंतवणूक करण्यासाठी परिस्थिती अन कुल आहे. तर मग तुम्हाला जास्त चिंता करण्याची गरज नाही कारण हा प्राइज एर्निंग रेशीओ तुम्ही घर बसल्या मोबाईल किंवा संगणकावर पाहू शकता.


प्राइज एर्निंग रेशीओ हा पाहण्यासाठी तुम्हाला आधी आपले इंटरनेट ब्राऊझर ओपन करून एनएसई इंडिया ही वेबसाईट सर्च करायची आहे. सर्च केल्यानंतर तुम्हाला डेशबोर्डवर चेक करायचे आहे प्राइज एर्निंग रेशीओ ( पी. ई.) वर क्लिक केल्यानंतर तुम्ही कालपासून ते २००० सालपर्यंत सर्व महिन्याचे प्राइज एर्निंग रेशीओ तपासू शकता.


तर अशाप्रकारे तुम्ही तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करण्याआधी मार्केटचा प्राइज एर्निंग रेशीओ बघू शकता आणि जेव्हा शेअर बाजार हे गुंतवणूक करण्यासाठी एक चांगली अनकुल परिस्थिती असेल तेव्हा एक चांगली गुंतवणूक करू शकता.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने