झीरो बेलेन्स बचत बँक खाते उघडा तेही घरबसल्या आणि संपूर्णतः ऑनलाईन बिना डॉक्युमेंटशिवाय.


सर्वांना नमस्कार,
आपल्या सर्वांना माहीत आहे की पूर्वीच्या काळात  किंवा सध्याच्या काळात ही बँक खाते उघडण्यासाठी आपल्याला बँकेत जावे लागते दोन ते तीन फेऱ्या फक्त डॉक्युमेंटसाठी माराव्या लागतात. वयस्कर माणसांना ह्याचा खूप त्रास सहन करावा लागतो. त्यासाठी आज मी तुम्हाला सांगणार आहे की कशाप्रकारे आपण सर्वजण घरबसल्या झीरो बेलेंस बचत खाते उघडू शकतो तेही संपूर्णतः ऑनलाईन आणि घरबसल्या तसेच डेबिट कार्ड व चेकबुक सुविधा सोबत.


झीरो बेलेंस बचत खाते उघडण्यासाठी तुमच्याकडे इन्कम टॅक्स कार्ड आधार कार्ड हे दोन डॉक्युमेंट असणे आवश्यक आहे. तसेच आधार कार्ड हे तुमच्या चालू मोबाईल नंबरशी लिंक असणे आवश्यक आहे कारण याद्वारे तुमचे बँक खाते अॅक्टिवेट होते. जर तुमच्याकडे मोबाईल नंबरशी लिंक नसलेले आधार कार्ड असेल तर तुमची नोंदणी पूर्ण होणार नाही. यासाठी तुम्हाला आधी स्वतः चे मोबाईल नंबर आधार कार्डवरवर अपडेट करावे लागेल.


१) तर सुरुवात करूया आधी तुम्हाला फिन्केअर बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर जायचे आहे त्यानंतर तिथे दोन खाते पर्याय तुम्हाला दिसतील.(१)१०१ खाते (२) १०१ प्राधान्य खाते. जर तुम्हाला झीरो बेलेंस बचत खाते उघडायचे असल्यास १०१ निवडा अथवा अधिक सुविधाकरिता १०१ प्राधान्य खाते उपलब्ध आहे. सगळ्यात आधी तुम्हाला तुमची संपूर्ण माहिती भरायची आहे आणि जे नाव तुमच्या इन्कम टॅक्स कार्डवर असेल ते नाव जसे त्या तसे संपूर्ण भरावे. त्यानंतर तुम्हाला इन्कम टॅक्स कार्ड नंबर टाकायला सांगतील तर त्या ठिकाणी स्वतःचा इन्कम टॅक्स कार्ड नंबर टाका आणि पडताळणी करून घ्या.


२) त्यानंतर तुमचा आधार कार्ड नंबर किंवा आधार कार्ड विआयडी नंबर टाका आणि एसएमएस वर क्लीक करा तुमच्या रजिस्टेड नंबरवर तुम्हाला एसएमएस येईल तो भरा. आणि प्रोसेसवर क्लिक करा त्यानंतर तुमचा आधार कार्डचा पत्ता हा तुमच्यासमोर स्क्रीनवर दिसेल तुम्ही वाटल्यास तोच ठेवू शकता अथवा राहत्या घरचा पत्ता देऊ शकता. कारण देलेल्या पत्यावर तुमचे चेकबुक आणि डेबिट कार्डची डिलिव्हरी केली जाते.


३) नेक्स्टवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमची काही प्रोफेशनल माहिती भरावी लागते. ज्यामध्ये तुमचे वार्षिक उत्पन्न, तुम्ही काय करता, वैवाहिक स्टेट्स, आईच नाव आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमच्या जवळची फिन्केअर बँकेची ब्रांच यांची तुम्हाला लिस्ट दिसेल. त्या प्रमाणे तुम्ही आपल्या घराजवळीलच ब्रांचं निवडा जेणेकरून तुम्हाला कुठलीही अडचण आल्यास तुम्ही लवकरात लवकर बँकेत पोहचू शकता. पुढे नोमिनी निवडण्याचे ऑप्शन दिसेल ते तुम्ही स्वतः च्या मर्जी प्रमाणे भरू शकता.


४) सबमिटवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचे खाते उघडले म्हणून मेसेज येईल आणि तुम्हाला संपूर्ण ई-केवायसी करण्यासाठी अॅपॉइन्मेंट घ्यायला सांगतील. पण ते करण्यासाठी तुमच्याकडे एक वर्षाचा कालावधी दिला जातो एक वर्षाच्या आत तुम्हाला ई-केवायसी करणे आवश्यक असते. ई-केवायसी करण्यासाठी तुम्हाला फक्त दोन डॉक्युमेंट लागतील आधार कार्ड आणि इन्कम टॅक्स कार्ड.


५) सगळी माहिती संपूर्ण झाल्यानंतर तुम्ही तुमची बचत खाते संख्या आणि कस्टमर आयडी डेशबोर्ड वर पाहू शकता. आणि मोबाईल एपच्या मध्यामातून किंवा व्हॉटसअप द्वारे बँकिग करू शकता. खाते उघडण्याच्या दहा ते पंधरा दिवसांच्या आत तुमचे डेबिट कार्ड हे तुमचा पत्यावर पोहचवले जाते व मोबाईल एपच्या मध्यामातून तुम्ही चेकबुकसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता.


तर अशाप्रकारे तुम्ही घरबसल्या झीरो बेलेंस बचत बँक खाते उघडू शकता तेही जलद, आरमदायी आणि  बिना कुठल्याही काटकसरशिवाय.


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने