३० मिनट योगा आणि आनंदी आयुष्य.

योगाची सुरवात ही प्राचीन भारतीय काळात झाली. सर्वप्रथम भारतात हे व्यायाम सुरू झाले त्यानंतर हळूहळू जगभरात योगाचा विस्तार होत गेला आणि आज जगभरात आंतरराष्ट्रीय योगा दिन हा साजरा केला जातो.  तेव्हापसूनच आज पर्यंत योगाचा प्रभाव हा नवीन पिढीवर पाहायला मिळतो आणि नवीन पिढी ही योगाच्या बाबतीत जास्त सक्रीय असताना दिसते.


योगा हे एक प्रकारचे व्यायाम आहे. दररोज सकाळी किमान अर्धा तास योगा नक्की करावा. योगा केल्याने आपल्या शरीरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. तसेच योगा केल्याने आपली मानसिक आणि शारीरिक श्रमता वाढते आणि आपले शरीर तणावमुक्त राहते. योगा हे आपल्या दैंदिन जीवनाला एक नवीन आशा देते आणि आपले मन व तन निरोगी राहण्यासाठी मदत करते.


तसे पाहता योगाचे प्रकार खूप आहेत पण तुम्हाला सुरुवात करण्यासाठी हे काही योगाची उदाहरणे आहेत. 
१) ताडासन :- ह्या योगा प्रकारात तुम्ही आधी आपले दोन्ही हात वर करा मग आपल्या पायाच्या टाचण्यावर  तोल ठेवून पाच मिनटे उभे रहा.

फायदे- ताडासन  केल्याने आपल्या शरीराचा तोल सुधारतो आणि आपल्या पायाचे साण्यू  बळकट होण्यास मदत मिळते.

 
२) धनुर्ववासन :- ह्या योगा प्रकारात  तुम्ही आधी छातीवर झोपा नंतर आपल्या  हाताला आणि पायाला एकत्र आणून डोके वर उचला हि प्रक्रिया किमान दोन वेळा करा.

फायदे- धनुर्ववासन केल्याने आपल्या हात, पाय आणि छाती या अवयवांचा चांगला व्यायाम होतो.                        
 
३) शिर्सासन :- या योगा प्रकारात तुम्ही आधी आपले दोन्ही हात एकत्र आणा नंतर हात जमीनवर ठेवा आणि आपले शरीर हे वर उचला हे आसन तुम्ही किमान पांच मिनट करा.

फायदे- शिर्सासन केल्याने आपल्या शरीरातील रक्त हे मेंदू पर्यंत पोहचण्यास मदत मिळते आणि आपली रक्ताभिसण संस्था सुरळीत सुरू राहते.


४) ९०° कोन :- ह्या योगा प्रकारात तुम्ही आधी पाठीवर झोपा नंतर आपले  पाय हे ४५° पर्यंत वर उचला. १ मिनट थांबून वर उचलेला पाय हा ९०° म्हणजे वर नेऊन जमीन ला टच करा. हे आसन तुम्ही ५ ते ७ मिनट करू शकता.

फायदे-  ९०° कोन हे योगासन केल्याने पाठीचे स्नायू हे बळकट होतात तसेच तुमचे मांडी आणि पाय देखील बळकट होण्यास मदत मिळते.


५) वृषासन :- ह्या योगा प्रकारात तुम्ही आधी दोन्ही पायावर उभे रहा मग आपले हात हे वर उचलुन जोडा नंतर आपला एक पाय हा दुसऱ्या पायावर ठेवा आणि ५ मिनिट उभे रहा.

फायदे- वृषासान हे योगासन केल्याने  तुमचे श्वसन संस्था सुधारते तसेच तुमच्या स्नायुचा व्यायाम होण्यास मदत मिळते.


तुम्ही कुठलाही योगा प्रकार करू शकता योगा प्रकार करण्यापेक्षा योगा करणे महतत्वाचे आहे. योगा केल्याने आपले आयुषमान वाढते तसेच जीवन हे निरोगी राहण्यास मदत मिळते. श्वसन संस्था आणि रक्ताभिसण संस्था सुधारल्याने नवीन नवीन आयडिया आपल्याला सुचतात आणि मनातील तान कमी होऊन चिंता कमी होते.


तर अशाप्रकारे प्रकारे तुम्ही किमान वेळ योगा करून आपले जीवन आनंदमय आणि निरोगी करू शकता. पण एक लक्षात सुरवातीला योगा करताना तुम्हाला थोडा त्रास सहन करावा लागेल. कारण योगाची तुमच्या शरीराला नियमित सवय नसल्याने असे घडणे साहजिक आहे. जसे जसे तुमच्या शरीराला योगाची सवय लागेल तसेतसे तुमचे शरीर हे बळकट बनेल.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने