रणनीती आयुष्याची.


आजच्या आधुनिक युगात प्रत्येक मानव हा जीवन जगण्यासाठी धडपन करत असतो. जेव्हा आपण मानव म्हणून जन्म घेतो त्या काळापासून आपल्या जीवनात वेगवेळया गोष्टी घडत असतात. जेव्हा आपण लहान वयात असतो तेव्हा आपल्याला जगाची जास्त माहिती नसते.


पण हळूहळू आपण मोठे होत असताना आपल्याला कळते की बाहेरच्या जगात कितीतरी  स्पर्धा सुरू आहेत. या जीवनाला सामोरे जात असताना अनेक संकटे येत असतात परंतु आपल्याला त्या संकटाला न घाबरता त्या संकटातून कसा मार्ग काढावा याचा विचार केला पाहिजे.


जर तुम्ही अश्या काही संकटात सापडले असाल तर या काही रणनीतीचा वापर करून आपण संकटावर मात करू शकतो. तुम्हा सगळ्यांना माहीत आहे संकट हे कधी विचारून येत नाही किंवा याला वेळ व काळ नसतो ते कधीही येतो. संकट हे आर्थिक नसून नैसर्गिक किंवा मानवनिर्मित असू शकते.


१) पूर्वीच्या काळात महागाई कमी होती पण हळूहळू सगळे देश प्रगती करू लागले त्यानंतर जगात मंदी आणि महागाईचा काळ सुरू झाला.
आर्थिक संकट :- आर्थिक संकटातून जर तुम्हाला बाहेर पडायचा आहे तर तुम्हाला पैशाची चांगली गुंतवणूक करावी लागेल. कारण पैसा हा अशी वस्तू आहेत ज्यांची तुम्ही चांगली बचत केली किंवा गुंतवणूक केली तर तुम्हाला कुठल्याही आर्थिक संकटातून बाहेर काढण्यास मदत करते. 
(१) आपल्या कडे किते पैसे आहे हे आपल्या परिवारा व्यतिरिकत कोणलाही सांगू नका.
(२) गुंतवणूक अशाप्रकारे करा की ज्यामध्ये तुम्हाला फायदा झालाच पाहिजे.
(३) शक्यतो लोन घेणे टाळा.
(४) पैसा मिळवण्याचे वेगवेगळे माध्यमाचा शोध घेणे सुरू करा.
(५) नोकरी करण्याेक्षा व्यावयला प्राधान्य द्या.


२) तुम्हा सर्वांना माहीत आहे नैसर्गिक आपतीचे संकट निसर्गापासून होणाऱ्या बदलामधून होत असते. हे संकट जगाच्या कुठलयाही कानाकोपऱ्यात कधीही येऊ शकते. उधहरणार्थ; भूकंप, चक्रीवादळ, पुर, ज्वालामुखी विस्फोट,  हवामानातील बदल आणि इत्यादी.
नैसर्गिक आपती :- एक लक्षात ठेवा की नैसर्गिक आपती ही कधीही कोणासोबतही होऊ शकते. म्हणून पश्चात्ताप करण्यापेक्षा त्याची उपायोजना कशी आखायची याच विचार करा. या आपतीच्या संकटाला सामोरे जाताना आपल्या घराचा विमा, वाहनाचा विमा, जीवन विमा आणि इत्यादी विमा तसेच इतर उपाययोजना आधीच आखून ठेवा. जेणकरून  संकटाच्या वेळी आपण लवकरात लवकर बाहेर पडू शकतो.


३) मानवनिर्मित संकट हे  मानव स्वतः घडवून आणतात. यामध्ये दहशतवाद, जंगल वणवा, हिंसाचार, सामाजिक अपराध आणि इत्यादी गुन्हे. यांचा समावेश आहे.
मानवनिर्मित संकट :- या संकटाला सामोरे जात असताना आपल्याला स्वतःच्या देशाचे कायदे आणि नियम माहीत असणे गरजेचे आहे. जर तुमच्या हातातून कुठला गुन्हा झाला किंवा तुमच्यावर वरच्यापैकी कुठले संकट आल्यास  तुम्ही स्वतःला निर्दोष करण्यासाठी याची गरज भासेल व आपल्याला हे नियम माहीत असल्यास आपण या संकटावर मात करू शकतो.


एक लक्षात ठेवा  संकट कितीही गंभीर असले तरीही आपल्याला त्यावर मार्ग काढण्याचा पर्याय उपलब्ध असतो. फक्त संकटाच्या समयी आपल्याला तो पर्याय दिसत नाही तो पर्याय आपल्याला शोधून काढायचा असतो.


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने