झोमेटो डिलिव्हरी जॉब बाबत संपूर्ण माहिती.


सर्वांना नमस्कार,
आज मी तुम्हाला झोमेटो डिलिव्हरी जॉब बाबत माहिती सांगणार आहे पण त्याआधी तुम्ही सर्वांनी माझी आधीची पोस्ट स्वीगी डिलिव्हरी जॉब ही पोस्ट  पाहिली असेलच हे दोघे कंपनी डॉक्युमेंटच्या बाबतीत समान आहे. तर सर्वात आधी जॉब जॉईन करण्यासाठी तुम्हाला जवळच्या झोमेटो हब मध्ये जावे लागेल आणि तिथे वेकॅन्सी बाबत माहिती काढावी लागेल.


नाहीतर तर तुम्ही राहता त्या ठिकाणी कोणी आधीपासून हे काम करत असेल तर तुम्ही रेफर वर जॉईन होऊ शकता. यामध्ये जेव्हा तुमचा मित्र तुम्हाला जॉबसाठी रेफर करेल तेव्हा तुमच्या देलेल्या मोबाईल नंबरवर वेकॅन्सी तुमच्या परिसरात जाहीर झाल्याचा मेसेज येईल. त्यामध्ये मुलाखत होणाऱ्या ऑफिसचा पत्ता, वेळ, डॉक्युमेंट आणि फी याबाबत माहिती असते.


झोमेटोमधे तुम्ही दोनवाहनावर डिलिव्हरी करू शकता एक म्हणजे बाईक आणि दुसरे सायकल परंतु सायकल डिलिव्हरी आता कमीकमी होत आहे. बाईकवर डिलिव्हरी करण्यासाठी तुम्हाला बाईकची आरसीबुक, स्वतः चे ड्रायव्हिंग लायसन्स, बँक पासबुक, २ फोटो , आधारकार्ड आणि इन्कम टॅक्स कार्ड इत्यादी डॉक्युमेंटची आवश्यकता असते.


सायकलवर डिलिव्हरी करण्यासाठी तुम्हाला बँक पासबुक, २ फोटो , आधारकार्ड आणि इन्कम टॅक्स कार्ड इत्यादी डॉक्युमेंटची आवश्यकता असते. डॉक्युमेंट जमा केल्यानंतर तुम्हाला टी- शर्ट आणि बॅग याचे पैसे जमा करावे लागतात हे पैसे पूर्णतः रिफंडेबल असतात. ही रक्कम एक हजार ते दोन हजार एवढी असू शकते. 


पैसे जमा झाल्यावर तुम्हाला लगेचच दीड तासाची परीक्षा द्यावी लागते आणि ही परीक्षा पास झाल्यावर हब मेनेजर कामांबदल सर्व माहिती देतात आणि त्यानंतर तुमची आयडी ही डिलिव्हरी करण्यासाठी सक्रीय केली जाते. कामाची शिफ्ट ही दोन भागात विभागली आहे . फुल टाईम सकाळी दहा ते संध्याकाळी चारवाजेपर्यंत, पार्ट टाईम संध्याकाळी चार ते रात्री दहा वाजेपर्यंत.


बाईकने डिलिव्हरी करण्यासाठी कंपनी तुम्हाला टच पॉइंटचे  वीस रुपये देते आणि डिलिव्हरी पॉइंटचे वीस रुपये देते. या व्यतिरिक्त जर तुम्ही पाच ते सहा किमीपेक्षा पुढे गेले असता कंपनी तुम्हाला पेट्रोल खर्च वेगळा देते. इंटेंसिव हा एक हजार ते दोन हजार पर्यंत असू शकतो. ऑर्डर बाबत माहिती ही स्वीगी सारखीच आहे तुम्ही ती पाहू शकता. 


सणांमध्ये कंपनी तुम्हाला अधिक इंटेंसिव आणि अधिक सर्ज देते त्यामुळे तुम्ही दोन्ही कंपनी सोबत काम करून चांगले पैसे कमवू शकता. तर अशाप्रकारे या दोन्ही डिलिव्हरी कंपनी पार्ट टाईम किंवा फुल टाईम काम करण्यासाठी चांगले पर्याय आहेत. तुम्ही दोघांमधील तुलना करून कुठली कंपनी चांगली आहे आणि तुम्हाला कुठल्या कंपनीसोबत काम करायचे आहे हे निश्चित करू शकता.Post a Comment

थोडे नवीन जरा जुने