स्वीगी डिलिव्हरी जॉब बाबत संपूर्ण माहिती.


आज  संपूर्ण भारतात ऑनलाईन फूडला मागणी दिवसागणिक वाढत चालली आहे. यामध्ये स्वीगी  ही कंपनी ग्राहकांना सेवा पुरवण्यासाठी काही कालावधीने नोकरभरती जाहीर करत असते. जर तुम्हाला ही डिलिव्हरी बॉयचा जॉब करायचा आहे  आणि नवीन जॉब जॉईन करायचा आहे तर तुम्ही गोंधळात न पडता कंपनीबाबत खाली काही माहिती दिलेली आहे ती नीट समजून घ्या.


तर सर्वात आधी तुम्हाला जवळच्या  स्वीगी हबमध्ये जाऊन नोकरभरती विषयी चौकशी करावी लागेल. जर नोकरभरती सुरू असेल तर तुम्ही डॉक्युमेंट्स जमा करून आपली नोंदणी करू शकता. नोंदणी करताना तुम्हाला टी -शर्ट आणि बॅगचे ह्या दोन्ही वस्तूचे पाचशे रुपये हे हब मध्ये जमा करावे लागतात पण ही रक्कम तुम्ही काम सोडल्यास परत तुमच्या बँक खात्यात जमा केली जाते .


सर्वात आधी डॉक्युमेंट जमा झाल्यावर तुम्हाला एक ऑनलाईन परीक्षा द्यावी लागते ती परीक्षा एक तास पन्नास मिनिटांची असते. ही परीक्षा पास झाल्यावर हब मेनेजर जी व्यक्ती पास झाली आहे त्यासोबत एक मीटिंग घेतात. आणि त्यांना कामाबद्दल सर्व माहिती देतात त्यानंतर तुमची अजून एक ऑनलाईन टेस्ट घेतली जाते त्यानंतर तुमची आयडी काम करण्यासाठी सक्रीय केली जाते. स्वीगी तुम्हाला दोन  वाहनांवर डिलिव्हरी करण्याची परवानगी देते.


१) बाईक :- बाईकवर डिलिव्हरी करण्यासाठी तुमच्या कडे बाईकची आरसीबुक आणि स्वतः चे ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक आहे तसेच बँक खाते आणि आधार कार्ड, इन्कम टॅक्स कार्ड, पासपोर्ट साईज फोटो इत्यादी डॉक्युमेंट्सची आवश्यकता भासेल.


स्वीगी तुम्हाला तीन शिफ्टमध्ये काम करायचे प्राधान्य देते फुल टाईम, पार्ट टाइम आणि टेम्प्रवरी.  फुल टाईममध्ये सकाळी दहा ते रात्री दहा, पार्ट टाईम मध्ये संध्याकाळी सहा ते रात्री अकरावाजेपर्यंत आणि टेम्प्रवरी मधे फक्त शनिवार आणि रविवार  सकाळी दहा ते रात्री बारावाजेपर्यंत पण यासाठी तुम्हाला फ्लॅट ८० रुपये पर डिलिव्हरी देले जातात आणि यामध्ये इंटेंसिव सुविधा उपलब्ध नाही आहे.


जर तुम्ही फुल टाईम किंवा पार्ट टाईम करत असाल तर तुम्हाला इंटेंसिव सुविधा उपलब्ध असेल. पर डिलिव्हरी करण्यासाठी तुम्हाला १५ ते ८५ रुपयांपर्यंत पैसे देते हा पेमेंट दर गुरुवारी तुमच्या खात्यामध्ये जमा केला जातो. डिलिव्हरी करण्यासाठी तुम्हाला १० किमीपर्यंत जावे लागू शकते पण त्यासाठी कंपनी तुम्हाला पेट्रोल खर्च देते.


२) सायकल :- जर तुमच्याकडे बाईक उपलब्ध नसेल तर तुम्ही सायकलवर सुद्धा डिलिव्हरी करू शकता. त्यासाठी तुम्हाला आधार कार्ड, इन्कम टॅक्स कार्ड, बँक खाते, पासपोर्ट साइज फोटो यांची आवश्यता असेल. सायकल वर सुद्धा पार्ट टाईम आणि फुल टाईम साठी समान वेळ लागू होतो फक्त एक फरक आहे तो म्हणजे सायकल वर डिलिव्हरी मर्यादा ५ किमी अंतराच्या आत असते. आणि त्यासाठी तुम्हाला पर डिलिव्हरी १५ ते ३० रुपयांपर्यंत मिळू शकते हा पेमेंट तुम्हाला गुरुवारी तुमच्या खात्यामध्ये जमा केला जातो.


३) ऑर्डर सन आणि इतर :- बऱ्याच लोकांना प्रश्न  पडतो की जर आपण डिलिव्हरी पीकअप करून निघालो आहे आणि रस्त्यात जर कस्टमर ने ऑर्डर केंसल केली तर काय करावे? त्यासाठी तुम्हाला ते जेवण हे हब मधे घेवून जावे लागणार कारण जर तुम्ही परत रेसटॉरंट्समधे जेवण घेवून गेले तर ते परत घेत नाही म्हणून तुम्हाला ते जेवण हब मधे जमा करावे लागते.


कारण जर कस्टमर ने कॅश ऑन डिलिव्हरी ऑर्डर केली असेल तर तुमच्या खात्यामध्ये ते आपोआप दिसते त्याला फ्लोटिंग कॅश म्हणतात. सणाच्या निमित्ताने कंपनी तुम्हाला अतिरिक्त पैसे कमवायची संधी देते यामध्ये गणेश उत्सव, नवरात्री, दिवाळी , न्यू इअर, इत्यादी सणांचा समावेश आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने