इलेक्ट्रॉनिक यशस्वी शासन आणि डिजिटल इंडिया.


सध्याचं जग हे पूर्णपणे बदलले आहे  एक काळ होता जेव्हां इंटरनेट नव्हते पण हळूहळू जगाने प्रगती केली आणि आज प्रत्येक व्यक्ती असा आहे ज्याकडे किमान एक फोन आणि इंटरनेट सुविधा उपलब्ध आहे. सध्याच्याअनेक देशाच्या सरकारने याचाच फायदा उचलत ई- सरकार अर्थातच इलेक्ट्रॉनिक शासन याला प्राधान्य दिले आहे.


हे शासन हे संपुर्णता इंटरनेटद्वारे ऑनलाईन चालवले जाणारे माध्यम आहे. यामध्ये सरकार पूर्णपणे किवा 70% सरकारी कामे ऑनलाईन केली जातात .  यामध्ये पाणीबिल, होमटॅक्स, वीजबिल, घर खरेदी, टेलिफोन बिल याचे कर हे आपण ऑनलाईन भरू शकतो.


इलेक्ट्रॉनिक सरकार हे पूर्णपणे पारदर्शक कारभारासाठी एक उत्तम सरकारी सुविधा पुरिण्यासाठी कार्यरत आहे.  उदाहरणार्थ; एस्टोनिया या देशाने पूर्णतः १००%  इलेक्ट्रॉनिक सरकारला प्राधान्य दिले आहे. या देशात इलेक्शन पासुन सरकारची सगळी कामे ऑनलाईन केली जातात.


तसेच भारत सरकारने डिजिटल इंडिया या इलेक्ट्रॉनिक उपक्रमालाा प्राधान्य दिले आहे. जेणकरून इंटरनेट चा वापर करून भारतामध्ये प्रत्येक व्यक्ती ऑनलाईन इन्फ्रास्ट्रकचर वाढवण्यासाठी सहभागी  होतील.


इलेक्ट्रॉनिक सरकारच्या माध्यमातून देशातील विविध भागात सरकारी योजनाचा लाभ आणि सुविधा पोहचण्यास मदत होते. ड्रायव्हिंग लायसन्स परवाना, इन्कम टॅक्स रिटर्न, आणि पासपोर्ट व्हिसा, सरकारी नोकरी भरती या सुविधा इलेक्ट्रॉनिक सरकारने  पूर्णपणे ऑनलाईन केले आहे.


इलेक्ट्रॉनिक सरकारचे काम सेवा हे प्रत्येक व्यक्ती पर्यंत पोहविण्यासाठी सरकार विविध योजनांची अंमलबजावणी करत असते. तसेच प्रत्येक देशाच्या नागरिकांनी इलेक्ट्रॉनिक सरकरकाच्या माध्यमात सहभागी व्हावे आणि सरकारला सहकार्य करावे. त्यामुळे सध्याच्या घडीला इलेक्ट्रॉनिक सरकार हे खूप महत्त्वाचे समजले जाते.


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने