घरामधे गुंतवणूक? ही काळजी नक्की घ्या!

पूर्वीच्या काळात मानव सतत भटकंती करत होता. तसेच भटकंती करत असताना तो गुहेत राहत असे. त्यामुळे मानवाला घराची जाणीव नव्हती. पण आजच्या आधुनिक युगात मानवांना एका ठिकाणी राहण्यासाठी आणि आपल्या कुटुंबाच्या डोक्यावर निवारा असावा असे प्रत्येक मानवाला वाटते.


आजच्या आधुनिक काळात माणसांना स्वतः च घर घेणं हे खूप कठीण झाले आहे. दिवंसे दिवस वाढती महागाई आणि शहररात उंच गगनाला भिडलेले घरांचे दर हे सामान्य माणसाला परवडत नाही. नोकरीच्या शोधात सामान्य माणस ही शहररात येतात आणि घर घेयायला येत नसल्याने झोपपट्टीमध्ये मध्ये आपले निवास तयार करतात.


तुम्हाला जर शहररात घर घेणं जर परवडत नसेल तर तुम्ही त्या शहरराच्या अवती भोवती कमी किमतीत घर विकत घेऊन त्यात गुंतवणूक करू शकता. घर  कितीही असो फक्त गुंवनुक महत्वाची असते.


१) डिस्कस :- घरात गुंतवणूक करण्याूर्वी आपल्या नातेवाईकांशी आणि सल्लागराशी एकत्र येऊन चर्चा करणे महत्त्वाचे आहे तसेच तुम्ही प्रॉपर्टी सल्लागराचा देखील सल्ला घुवू शकता आणि बजटच्या बाबतीत अर्थ तज्न सोबत चर्चा करू शकता.


२) लोकेशन :- सगळ्यात आधी शहरच्या अवती भोवती असलेली चांगली लोकेशन निवडा जिथे येणाऱ्या काळात विकास होणार आहे. आणि सरकारच्या नवीन योजना देखील ह्याच लोकेशन वर असेल अशीच जागा निवडा जेणेकरून भविष्यात त्या जागेवर नवीन उपक्रम सुरू होतील आणि जागेची किंमत देखील वाढेल.


३) बजट :- घर घेणे हे एक प्रकारचे गुंतवणूक आहे आणि गुंतवणूक करण्यासाठी तुमच्या कडे किमान गुंतवणूक रक्कम असणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ; जर तुम्ही  १०,००,००० लाख रुपयाच्या किंमतीचे घर घेणार असाल तर तुम्हाला त्या किमतीच्या २०% रक्कम म्हणजे २००,००० लाख रुपये रक्कम ही डाऊन पेमेंटच्या स्वरूपात बिल्डरला द्यावी लागेल. जर तुम्ही फायइननेनशियल प्लॅननिंग चांगल्या प्रकारे केली तर तुम्ही  घरामधे चांगल्या प्रकार ची गुंतवणूक करू शकता.


४) वेरिफिकॅशन :- तुम्ही कुठल्याही बिल्डर कडून घर खरेदी असाल तर त्या बिल्डरची माहिती तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे. त्या बिल्डरने आधी केलेले काम आणि आता करत असलेले कामं याबात त्याची हिस्टरी तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे. तसेच त्या बिल्डरने बांधलेल्या बिल्डिंग अथवा घर यांचे कागदपत्रे नीट आहे की नाही याची खात्री करून घ्यावी. जेणकरून भविष्यात तुम्हाला अडचण येणार नाही.


५) डॉक्युमेंट :- जर तुम्ही होमलोन वर घर घेणार असाल तर तुम्हाला तुमच्या कामाचे डॉक्युमेंट बँकेला द्यावे लागतील. उदाहरणार्थ; बँक स्टेटमेंट, पगाराची पावती, इन्कम टॅक्स रिटर्न, इत्यादी कागदपत्राची आवश्यकता भासेल. तसेच घराची नोंदणी तुमच्या नावावर करण्यासाठी स्टॅम्प ड्युटी ची गरज असते. हे डॉक्युमेंट तुम्ही नजिकच्या सरकारी कार्यालयात जाऊन मिळवू शकता.


तर अशाप्रकारे तुम्ही घरामध्ये गुंतवणूक करून भविष्य हे अधिक चांगले बनवू शकता. पण एक गोष्ट लक्षात ठेवा गुंतवणूक करताना आपल्या नातेवाईकशी  आणि आपल्या सलागराशी चर्चा नक्की करा. जेवढी अधिक तुमच्याकडे माहिती असेल तेवढे चांगले तुम्हाला परिणाम दिसतील. तर  गुंतवणूक करा पण दक्षता पाळा.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने