भरघोस कमाई करा अमेझॉन मार्फत.


सध्याच्या आधुनिक काळात लोक ऑनलाईन शॉपिंग ला जास्त प्राधान्य देताना दिसत आहे. तर आपल्या सगळ्यांना माहित आहे की अमेझॉन एक ऑनलाईन शॉपिंग प्लॅटफॉर्म आहे आणि आपण सर्व या माध्यमादवारे शॉपिंग करत असतो. अमेझॉन ची सेवा खूप साऱ्या देशामध्ये सुरू आहे. त्यामुळे अमेझॉन मध्ये दिवसाला कोट्यवधीची रुपयांची उलाढाल होत असते.


तुम्ही देखील ह्या इंडस्ट्री मध्ये आपलं व्यवसाय स्थापित करू शकता. फक्त चांगली आयडिया आणि उत्तम गुंतवणूक करावी लागेल. तर सगळ्यात आधी अमेझॉन सोबत तुम्हाला कुठला व्यवसाय सुरू करायचा आहे याचा विचार करा. उदाहरणार्थ; जर तुम्हाला कपड्यांचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्हाला त्याबाबत थोडीफार माहिती असणे गरजेचे आहे. 


१) संशोधन :- तुम्ही मार्केट मध्ये कपड्याबाबत संशोधन सुरू करा. कपड्यांचे डीलर आणि सप्लायर याच्यासोबत डीलींग करा. चांगल्या प्रकारचा माल विकत घ्या. डीलींग करत असताना माल रिटर्न होईल असाच माल घ्या कारण जर माल खराब निघाला तर तुम्ही रिटर्न करू शकता.


२) भांडवल :- कुठलेही व्यवसाय सुरू करण्यासाठी भांडवल असणे गरजेचे आहे. जर तुम्ही चांगल्या प्रकारे पैशाचे व्यवस्थापन केले तर भांडवलाच्या बाबतीत तुम्हाला जास्त त्रास होणार नाही आणि तुम्ही निसंकोच पणे काम करू शकता.


३) जागा आणि उपकरण :- अमेझॉन सोबत काम करण्यासाठी तुमच्या कडे दुकान किवा ऑफिस असणे गरजेचे नाही. हे काम तुम्ही घरातून देखील सुरू करू शकता त्यासाठी तुमच्या कडे लॅपटॉप किंवा संगणक असणे आवश्यक आहे. तसेच इत्यादी उपकरणाची आवश्यकता भासेल.


४) कर्मचारी :- जर तुम्ही व्यवसायाला सुरुवात करणार असाल तर स्वतः आधी काम करा जेणेकरून तुमचे प्रॉफिट वर परिणाम कमी होईल. पण जर तुम्हाला वाटत असेल की व्यवसाय हा वाढीस लागला आहे तर तुम्ही कर्मचारी देखील ठेवू शकता.


५) जीएसटी नोंदणीकरण :- आपण कुठलेही वस्तू जर अमेझॉन वर विकायला सुरुवात केली तर आपल्याला त्या वस्तूचा कर भरावा लागतो. हा कर भरण्यासाठी तुम्हाला जीएसटी नोंदणी करने आवश्यक आहे. जीएसटी नोंदणीकरण ही सुविधा ऑनलाईन सहजरीत्या उपलब्ध आहे.


६) अमेझॉन नोंदणीकरण :- जीएसटी नोंदणीकरण पूर्ण झाल्यावर तुम्हाला अमेझॉन नोंदणीकरण करावे लागणार हे नोंदणीकरण देखील ऑनलाईन सहजरीत्या उपलब्ध आहे. त्यासाठी अमेझॉन तुमच्याकडे विविध डॉक्युमेंटची मागणी करेल यामध्ये बँक खात्याचा अकाउंट नंबर देखील समवेश आहे. आपल्याला हे सर्व डॉक्युमेंट तयार ठेवावे लागतील. तुम्ही फॉर्म सबमिट केल्या नंतर अमेझॉन तुमच्या डॉक्युमेंट ची पडताळणी करतो. आणि जो काही निर्णय आहे तो तुमच्या पर्यंत पोचवतो.


७) प्रॉडक्ट लिस्टिंग आणि सेलिंग :- अमेझॉननी जर तुम्हाला प्रॉडक्ट विकायची परवानगी दिल्यावर तुम्ही तुमचे प्रॉडक्ट अमेझॉन वर पब्लीश करू शकता आणि  प्रॉडक्टला  किंमत लावून सेल करू शकता.


८) पार्सल पॅकिंग आणि शिपिंग :- तुम्हाला ऑर्डर मिळायला सुरुवात झाल्यानंतर तुम्हाला त्या पार्सलला पॅकिंग आणि शिपिंग करावे लागते. त्यासाठी तुम्ही थर्ड पार्टी शिपिंग कंपनीची मदत घेवू शकता किंवा जर तुम्हाला अमेझॉन मार्फत प्रॉडक्ट शिफ्ट करायचे असल्यास तो पर्याय देखील उपलब्ध आहे.


९) पेमेंट :- कुठलीही वस्तू तुम्ही अमेझॉन वर विकायला काढली तर तुम्हाला त्या वस्तूची काही किंमत ही कमिशिनच्या स्वरूपात अमेझॉनला द्यावी लागेल. अमेझॉन वर तुम्हाला पेमेंट हा दर आठड्याला  थेट तुमच्या बँक खात्यात जमा केला जातो.


तर अशाप्रकारे तुम्ही जगातल्या सर्वात मोठ्या इकॉमर्स कंपनी सोबत काम करू शकता आणि चांगली कमी करू शकता. सुरवातीला फक्त थोडी मेहनत घ्यावी लागेल त्यानंतर एकदा का तुम्हाला यश आले की तूम्ही चांगल्या प्रकारे आपल्या व्यवसायाचा विस्तार करू शकता.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने