चक्र पैशाचे.


आजच्या आधुनिक जगात पैसा हा मानवी जीवनाचा एक अविभाज्य भाग बनला आहे. जगाच्या सुरवातीपसून माणसांना पैशाची गरज नव्हती सगळे आर्थिक व्यवहार हे देवाण घेवाण मध्ये होत होते. उदाहरणार्थ; तांदळाच्या बदल्यात गहू  पण कालांतराने या मध्ये बदल होत गेले आणि हळूहळू मानवी जीवनात पैशाचे महत्त्व वाढू लागले.


पैसा हा आज प्रत्येक माणसाची प्राथमिक गरज आहे मानवाच्या बेसिक गरज भागवण्यासाठी तसेच स्वतःचे स्टँडअर्ड ऑफ लिव्हिंग बदलण्यासाठी आज प्रत्येक माणूस हा शिक्षण घतो कारण चांगले शिक्षण असले तर चांगली नोकरीही मिळते. आणि नोकरी मिळाली म्हणजे चांगले पैसे भेटतात.


खरं तर पैशाचेही ही खूप प्रकार आहेत कागदी पैसा, प्लास्टिक पैसा, ई- पैसा, आणि काही इतर.  पैशाच्या किमतीत आंतरराष्ट्रीय पातळीवर सतत बदल होत असतात. प्रत्येक देशाचे चलनी नोटा आणि नाणी हे वेगळे असतात त्यामुळे बाजार भावानुसारा त्यामध्ये सतत बदल होतात.


पैसा बनवण्यासाठी प्रत्येक देशाचे सरकार हे खूप महाग प्रकारचे कागदाचा उपयोग करतात तसेच नानी बनवण्यासाठी तांबा किंवा स्टेनलेस स्टीलचा वापर करतात. प्रत्येक देशाच्या सरकारांनी त्यांच्या देशात होऊन गेलेले नेता किंवा राजा- महराजा यांचे छायाचित्र नाणी आणि चलनी नोटा यावर छापलेले दिसते.


कधी कधी काही लोकं चुकीच्या मार्गाने पैसे कमवतात आणि सरकारला त्याची माहिती किंवा कर देत नाहीत त्याला काळा पैसा महणतात. ह्या पैशाचा गैरवापर टाळणयासाठी सरकारलाविमुद्रीकरन करावे लागते जेणेकरून ज्या लोकांनी काळा पैसा लपवला आहे तो बाहेर काढण्यासाठी मदत होते.


पैसा हा स्वतःच्या देशपूर्ती मर्यादित असतो उदाहरणार्थ; जर तुम्ही दुसऱ्या देशात व्यापार किंवा फिरायला गेलात तर तिथे तुमच्या देशाच्या चलनी नोटा किंवा नाणी चालनार नाही त्यासाठी तुम्हाला तुमचे चलन त्यांच्या चलन मध्ये बदलून घ्यावे लागेल. यासाठी चलन एक्सचेंज सुविधा उलब्ध असते.


प्रत्येक देशात किती पैसा आहे याचे निरीक्षण IMF आंतररा्ट्रीय नाणेनिधी संघटना करत असते. तसेच जेव्हा कुठलीही आर्थिक, नेसर्गिक, आरोग्य बाबत जर एखादी घटना एखाद्या देशात घडली तर आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संघटना त्या देशाच्या मदतीला पुढाकार घेते आणि त्या देशाला मदतीचा हात देते.


अर्थातच पैसा हा कसाही असला तरीही तो मौलाचा असतो. जर आपण आज पैसा वाचवला किंवा पैशाची बचत केली तर भविष्यात येणाऱ्या गरजांवर आपण मात करू शकतो.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने